पंतप्रधान येत्या 20 आणि 21 डिसेंबरला आसाम दौऱ्यावर
December 19th, 02:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 आणि 21 डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पंतप्रधान गुवाहाटी येथे पोहोचतील. तेथे ते लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची पाहणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.