पंतप्रधान 2 जून रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सहभागी होणार
June 01st, 08:01 pm
जागतिक दर्जाची हवाई वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आणि हवाई वाहतूक जोडणीचा विस्तार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जून रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA - International Air Transport Association) 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.