आयसीसी महिला विश्वचषक विजेत्या संघांशी पंतप्रधानांनी साधलेल्‍या संवादाचा मजकूर

November 06th, 10:15 am

माननीय पंतप्रधान महोदय, खूप खूप धन्यवाद. आम्हाला येथे येणे हा मोठा सन्मान आणि अभिमानाचा क्षण वाटतो. फक्त या मोहिमेबद्दल एक सांगू इच्छितो, या मुलींनी कमाल केली आहे, देशाच्या मुलींनी कमाल केली आहे. दोन वर्षांपासून मेहनत करत होत्या, सर, इतकी मेहनत की काय सांगू, प्रत्येक सराव सत्रामध्ये जोमाने खेळल्या, प्रत्येक सरावात तेवढ्याच ऊर्जेने मैदानात उतरल्या. इतकी मेहनत घेतली की आज त्या मेहनतीचं फळ मिळाले आहे.

पंतप्रधानांनी आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत साधला संवाद

November 06th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत संवाद साधला. भारतीय संघाने रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात केली होती. पंतप्रधानांनी काल देव दिवाळी आणि गुरुपूरब असल्याने हा दिवस विशेष असल्याचे सांगून सर्व उपस्थितांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांबरोबर साधलेला संवाद

July 05th, 04:00 pm

पंतप्रधान: मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही विश्‍वचषक जिंकून आपल्या देशामध्ये उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण तयार केले आहे. आणि देशवासियांच्या सर्व आशा -आकांक्षांना तुम्ही जिंकले आहे. माझ्यावतीने तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! सर्वसाधारणपणे रात्री खूप उशीरपर्यंत मी कार्यालयामध्ये काम करीत असतो. विशेष म्हणजे यावेळी तर टी.व्हीसुद्धा सुरू होता आणि एकीकडे मी फायलीही पहात होतो. परंतु यावेळी त्या फायलींकडे माझे लक्ष केंद्रीत होत नव्हते. तुम्ही मंडळींनी आपल्यातील अतिशय उत्कृष्ट संघभावनेचे प्रदर्शन केले. आपल्यातील प्रतिभा दाखवली आणि तुमच्यामध्ये असलेले धैर्य स्पष्ट दिसून येत होते. मी सामना पहात होतो, तुमच्यामध्‍ये ‘पेशन्स’ होता, अजिबात गडबड नव्हती. पूर्ण आत्मविश्वास तुमच्यामध्ये होता. तुम्हा सर्वांचे माझ्यावतीने खूप-खूप अभिनंदन, मित्रांनो!!