पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.

सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले अभिनंदन

January 01st, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले.

75 लाख सूर्यनमस्कार घालण्याच्या आव्हानाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

January 14th, 10:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदृढ आरोग्याचे महत्व अधोरेखित करत 75 लाख सूर्यनमस्कार घालण्याच्या आव्हानाची प्रशंसा केली आहे.