गुजरातमधील सूरत येथे भारताच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेला संवाद
November 16th, 03:50 pm
“तुम्हाला काय वाटतं? कामाची गती योग्य आहे का? तुम्ही ठरवलेल्या वेळापत्रकानुसार काम सुरू आहे का की काही अडचणी येत आहेत?”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सूरत येथे भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला
November 16th, 03:47 pm
गुजरातमधील सूरत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहणी केली. त्यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला आणि प्रकल्पाची प्रगती, विशेषतः निश्चित वेग आणि वेळापत्रकाच्या लक्ष्यांचे पालन याबाबत माहिती घेतली. कामगारांनी यावेळी पंतप्रधानांना प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविनाच सुरळीतपणे पुढे जात असल्याची खात्री दिली.The Congress has now turned into ‘MMC’ - the Muslim League Maowadi Congress: PM Modi at Surat Airport
November 15th, 06:00 pm
Addressing a large gathering at Surat Airport following the NDA’s landslide victory in the Bihar Assembly Elections, Prime Minister Narendra Modi said, “Bihar has achieved a historic victory and if we were to leave Surat without meeting the people of Bihar, our journey would feel incomplete. My Bihari brothers and sisters living in Gujarat, especially in Surat, have the right to this moment and it is my natural responsibility to be part of this celebration with you.”PM Modi greets and addresses a gathering at Surat Airport
November 15th, 05:49 pm
Addressing a large gathering at Surat Airport following the NDA’s landslide victory in the Bihar Assembly Elections, Prime Minister Narendra Modi said, “Bihar has achieved a historic victory and if we were to leave Surat without meeting the people of Bihar, our journey would feel incomplete. My Bihari brothers and sisters living in Gujarat, especially in Surat, have the right to this moment and it is my natural responsibility to be part of this celebration with you.”पंतप्रधान 15 नोव्हेंबर रोजी सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देणार
November 14th, 11:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी 10 वाजता ते सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देऊन मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिका या देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतील. हा प्रकल्प भारताच्या उच्च-गती रेल्वे युगात पदार्पणाचे प्रतीक मानला जातो. मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर सुमारे 508 किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी 352 किलोमीटरचा भाग गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगरहवेलीमधून, तर 156 किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात येतो. हा कॉरिडॉर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी महत्त्वाची शहरे जोडणार आहे. हा प्रकल्प भारताच्या वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारा ठरणार आहे.ओडिशातील झारसुगुडा येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
September 27th, 11:45 am
येथे काही तरुण बांधव अनेक कलाकृती घेऊन आलेले आहेत. ओडिशातील कला प्रेम जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. आपण दिलेली ही भेट मी आदरपूर्वक स्वीकारतो. माझे एसपीजी सहकारी या सर्व कलाकृती आपल्याकडून गोळा करतील. जर तुम्ही मागे तुमचे नाव व पत्ता लिहून दिलात, तर माझ्याकडून तुम्हाला पत्र अवश्य मिळेल. मागे एक लहान मूलही कलाकृती घेऊन उभे आहे, त्याचे हात दुखत असतील, कृपया त्याचीही मदत करा आणि वस्तू गोळा करून घ्या. मी या स्नेहपूर्ण भेटीसाठी आणि या कलाकृती भेट देणाऱ्या सर्व युवक-युवती व बालकांचे मनःपूर्वक आभार मानतो.ओदिशात झारसुगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 27th, 11:30 am
सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओदिशातील जनतेने त्यावेळी विकसित ओदिशा या ध्येयाने पुढे जाण्याचा दृढ संकल्प केला होता. आज केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ओदिशा वेगाने प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले. पंतप्रधानांनी ओदिशा तसेच देशाच्या विकासासाठी हजारो कोटींच्या विविध प्रकल्पांची सुरुवात झाल्याची घोषणा केली. या प्रसंगी त्यांनी बीएसएनएलच्या स्वदेशी 4G सेवांचा शुभारंभ करत बीएसएनएलचा नवा अवतार जनतेसमोर सादर केला. याशिवाय, देशभरातील आयआयटी संस्थांच्या विस्तारालाही आज औपचारिक सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. ओदिशामध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि संपर्क सुविधा यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. बेरहमपूर ते सुरत या मार्गावर धावणाऱ्या आधुनिक अमृत भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी जनतेसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात मधील सुरत येथून दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. या सर्व विकास उपक्रमांबद्दल ओदिशातील जनतेचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.गुजरातमध्ये सूरत इथे सूरत अन्न सुरक्षा संपृक्तता मोहिमेचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 07th, 05:34 pm
आज देशातील आणि गुजरातच्या जनतेने मला तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली आहे हे माझे सद्भाग्य आहे. आणि त्यानंतर, ही माझी सुरतची पहिली भेट आहे. गुजरातने जे काही निर्माण केले, ते देशाने प्रेमाने स्वीकारले. मी तुमचा कायम ऋणी राहीन, माझे आयुष्य घडवण्यात तुम्ही खूप मोठे योगदान दिले आहे. आज, जेव्हा मी सुरतला आलो आहे, तेव्हा मला सुरतचा आत्मा जाणवत नाही किंवा तो मला दिसत नाही हे कसे शक्य आहे? काम आणि दान, या दोन गोष्टी सुरतला अधिक विशेष बनवतात. एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे, सर्वांच्या विकासाचा आनंद साजरा करणे, हे आपल्याला सुरतच्या ठायी ठायी आढळते. आजचा हा कार्यक्रम सुरतच्या याच आत्म्याला,या भावनेला पुढे नेणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूरत अन्न सुरक्षा संतृप्तता अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ
March 07th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सूरत मधील लिंबायत येथे सूरत अन्न सुरक्षा संतृप्तता अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ केला. पंतप्रधानांनी 2.3 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ वितरित केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी सूरत शहराच्या अनोख्या स्वभावावर भर देताना तेथील कामाचा आणि औदार्याचा मजबूत पाया अधोरेखित केला. शहराचे सार विसरता येत नाही कारण ते सामूहिक समर्थनाद्वारे आणि सर्वांचा विकास साजरा करण्यातून परिभाषित केले आहे असे ते म्हणाले.पंतप्रधान 7 आणि 8 मार्च रोजी दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांना तसेच गुजरात राज्याला भेट देणार
March 07th, 07:10 am
पंतप्रधान 7 आणि 8 मार्च रोजी म्हणजेच आज आणि उद्या दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांना तसेच गुजरात राज्याला भेट देत आहेत. दिनांक 7 मार्च रोजी ते सिल्वासा येथे पोहोचतील आणि दुपारी 2 च्या सुमारास तेथे उभारण्यात येत असलेल्या नमो रुग्णालय प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. दुपारी पावणेतीन वाजता सिल्वासा येथेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2,580 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरतला प्रयाण करतील आणि संध्याकाळी 5 वाजता ते सुरत अन्न सुरक्षा संपृक्तता अभियानाची सुरुवात करतील. उद्या दिनांक 8 मार्च रोजी पंतप्रधान नवसारी येथे पोहोचतील आणि तेथील लखपती दिदींशी संवाद साधतील. यानंतर होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचे उद्घाटन होईल.The BJP government in Gujarat has prioritised water from the very beginning: PM Modi in Amreli
October 28th, 04:00 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.PM Modi lays foundation stone and inaugurates various development projects worth over Rs 4,900 crore in Amreli, Gujarat
October 28th, 03:30 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत येथील #HarGharTiranga मोहिमेबद्दल व्यक्त केला अभिमान
August 12th, 09:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज #HarGharTiranga मोहिमेत सूरतमधील लोकांनी उत्कट भावनेने घेतलेल्या सहभागाबद्दल अभिमान व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे केले उद्घाटन
December 17th, 04:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी नवीन टर्मिनल इमारतीची फिरून प्रत्यक्ष पाहणी देखील केली.गुजरातमधील सुरत येथे सुरत हिरे बाजाराचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 17th, 12:00 pm
सुरत म्हणजे सुरत! सुरतकडे इतिहासाचा अनुभव आहे, वर्तमानाचा वेग आहे आणि भविष्याची दूरदृष्टी आहे, या सर्वांचे नाव आहे सुरत!! आणि हे सुरत माझे सुरत आहे. कोणत्याही कामामध्ये एकही कसर सोडली जात नाही, असे हे सुरत आहे. त्याच प्रमाणे सर्व गोष्टींच्या बाबतीत सुरतकरांना कितीही घाई, गडबड असली तरी, भोजन तसेच खाण्या-पिण्याच्या दुकानामध्ये जर अर्धा तास रांग लावावी लागत असेल तरीही त्यांच्या मते काही हरकत नाही, त्यांच्याकडे तितका धीर नक्कीच आहे. प्रचंड पाऊस असो आणि अगदी गुडघ्यापर्यंत पाणी भरलेले असो, परंतु पकोडे -भजीच्या दुकानामध्ये जायचं आहे म्हणजे जायचंच. शरद पौर्णिमा, चंडी पाडवा, या दिवशी जगातले सगळे लोक घराच्या गच्चीवर जातात. आणि इथं, आमचे सुरतकर रस्त्याच्या कडेला संपूर्ण कुटुंबाबरोबर घारी म्हणजे मिठाई खात असतात. आणि त्यामध्ये त्यांना आनंद इतका मिळत असतो की, हे साहेब जवळच्या कोणत्याही स्थळांना फिरायला जात नाहीत, मात्र संपूर्ण विश्वामध्ये फिरतात. मला आठवते की, 40-45 वर्षांपूर्वी सौराष्ट्रातील बंधू सुरतच्या दिशेने गेले, त्यावेळी मी सोराष्ट्रातील आमच्या जुन्या मित्रांना विचारत होतो की, तुम्ही सौराष्ट्र सोडून सुरतेमध्ये आला आहात, तर कसे वाटते? त्यावेळी ते म्हणत होते सुरतमध्ये आणि आमच्या काठियावाडमध्ये खूपच फरक आहे. ही गोष्ट मी 40-45 वर्षांपूर्वींची सांगतोय. मी विचारत होतो, काय फरक आहे? तर ते सांगत होते, काठियावाडमध्ये जर समोरा-समोर मोटारसायकलींची धडक झाली तर दोघांमध्ये तलवार बाहेर काढण्यापर्यंत वितंडवाद होत असे. मात्र सुरतमध्ये अशा प्रकारे मोटारसायकलींची धडक झाली तर, लगेच म्हणतात, असं आहे भाई, चूक तर तुझी आहे आणि माझीही चूक आहे, आता दे सोडून! इतके अंतर आहे.पंतप्रधानांनी सूरत हिरे बाजाराचे केले उद्घाटन
December 17th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे सूरत हिरे बाजाराचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांनी पंचतत्व उद्यानाला भेट दिली, सुरत हिरे बाजार आणि स्पाइन-4 च्या हरित इमारतीची पाहणी केली तसेच तेथील अभ्यागत पुस्तिकेवर स्वाक्षरी देखील केली. आदल्या दिवशी पंतप्रधानांनी सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले.येत्या 17-18 डिसेंबरला पंतप्रधान सुरत आणि वाराणसीला भेट देणार
December 16th, 10:39 am
येत्या 17-18 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सुरतला आणि उत्तरप्रदेशात वाराणसीला भेट देणार आहेत. 17 डिसेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमाराला ते सुरत विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. तर सव्वाअकराच्या सुमाराला पंतप्रधानांच्या हस्ते सुरत हिरे सराफा बाजाराचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते वाराणसीकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास 'विकसित भारत संकल्प यात्रेत' पंतप्रधान सहभागी होणार आहेत. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास नमो घाटावर ते काशी तमिळ संगमम-2023 चे उद्घाटन करणार आहेत.महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग इथे नौदल दिन 2023 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
December 04th, 04:35 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान रमेश जी, मुख्यमंत्री एकनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी राजनाथ सिंह जी, नारायण राणे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजीत पवार जी, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, नौदल प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार, नौदलाचे सर्व मित्र आणि माझ्या कुटुंबियांनो,महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे आयोजित नौदल दिन 2023 कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती
December 04th, 04:30 pm
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला , वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि 4 डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 26th, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.