महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
January 31st, 05:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या आणि हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील, असे मोदी म्हणाले.