पंतप्रधानांनी सुखदेव सिंग धिंडसा जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

पंतप्रधानांनी सुखदेव सिंग धिंडसा जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

May 28th, 09:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुखदेव सिंग धिंडसा जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते एक प्रगल्भ, उत्तुंग राजकारणी होते आणि सार्वजनिक सेवेप्रति त्यांची अढळ बांधिलकी होती. त्यांचा नेहमीच पंजाब, तेथील लोक आणि संस्कृतीशी मूलभूत संबंध होता, असे मोदी यांनी नमूद केले.