2026-27 हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता 365 रुपये प्रति क्विंटल या वाजवी आणि किफायतशीर दराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
May 05th, 06:43 pm
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ऊस हंगाम 2026-27 (ऑक्टोबर - सप्टेंबर) साठी ऊसाचे वाजवी आणि किफायतशीर दर (एफआरपी) प्रतिक्विंटल 365 रुपये निश्चित करण्यास मंजुरी दिली आहे. हा दर 10.25% मूलभूत साखर उतारा गृहीत धरून निश्चित करण्यात आला आहे. 10.25% पेक्षा जास्त उतारा असेल तर प्रत्येक 0.1% उतारा वाढीसाठी प्रतिक्विंटल 3.56 रुपये अतिरिक्त प्रीमियम तसेच उताऱ्यात प्रत्येक 0.1% घट झाल्यास एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल 3.56 रुपये कपात करण्याची तरतूद आहे.