रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
December 05th, 02:00 pm
आज भारत आणि रशियाच्या तेविसाव्या शिखर परिषदेत राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आमचे द्विपक्षीय संबंध अनेक ऐतिहासिक टप्प्यांदरम्यान वाटचाल करत आहेत. बरोबर 25 वर्षांपूर्वी राष्ट्रपती पुतीन यांनी आमच्या धोरणात्मक भागीदारीचा पाया घातला होता. 15 वर्षांपूर्वी 2010 मध्ये आमच्या भागीदारीला विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाला होता.PM Modi’s remarks during the joint press meet with Russian President Vladimir Putin
December 05th, 01:50 pm
PM Modi addressed the joint press meet with President Putin, highlighting the strong and time-tested India-Russia partnership. He said the relationship has remained steady like the Pole Star through global challenges. PM Modi announced new steps to boost economic cooperation, connectivity, energy security, cultural ties and people-to-people linkages. He reaffirmed India’s commitment to peace in Ukraine and emphasised the need for global unity in the fight against terrorism.पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार
November 27th, 12:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमाराला पंतप्रधान कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार आहेत. त्यांनतर ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दुपारी सव्वा तीनच्या सुमारास येथे भेट देणार आहेत.गुजरातमधील सूरत येथे भारताच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेला संवाद
November 16th, 03:50 pm
“तुम्हाला काय वाटतं? कामाची गती योग्य आहे का? तुम्ही ठरवलेल्या वेळापत्रकानुसार काम सुरू आहे का की काही अडचणी येत आहेत?”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सूरत येथे भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला
November 16th, 03:47 pm
गुजरातमधील सूरत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहणी केली. त्यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला आणि प्रकल्पाची प्रगती, विशेषतः निश्चित वेग आणि वेळापत्रकाच्या लक्ष्यांचे पालन याबाबत माहिती घेतली. कामगारांनी यावेळी पंतप्रधानांना प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविनाच सुरळीतपणे पुढे जात असल्याची खात्री दिली.पंतप्रधान 4 ऑक्टोबर रोजी 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करणार
October 03rd, 03:54 pm
युवा विकासासाठीचा एक महत्वाचा उपक्रम म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सकाळी 11 वाजता 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करतील. यामुळे देशभरात शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला निर्णायक चालना मिळेल. या कार्यक्रमात कौशल दीक्षांत समारंभ देखील आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, आयोजित होत असलेला हा चौथा राष्ट्रीय कौशल्य दीक्षांत समारंभ असेल. यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी करणाऱ्या 46 विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल.पंतप्रधान 27 सप्टेंबरला ओडिशाच्या दौऱ्यावर
September 26th, 09:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर 2025 रोजी ओडिशाचा दौरा करणार आहेत. 27तारखेला पंतप्रधान सकाळी 11.30 वाजता झारसुगुडा येथे 60,000 कोटी रूपया यांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. याप्रसंगी ते एका सार्वजनिक सभेला संबोधित देखील करतील. हे प्रकल्प दूरसंचार, रेल्वे, उच्च शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास, ग्रामीण गृहनिर्माण यांच्यासह इतर विविध क्षेत्रांमधील आहेत.देशभरातील पदव्युत्तर आणि पदवी वैद्यकीय शिक्षण क्षमता विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 24th, 05:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सध्याच्या राज्य सरकारी/केंद्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालये/स्वतंत्र पदव्युत्तर संस्था/सरकारी रुग्णालये यांच्या सक्षमीकरण आणि अद्ययावतीकरणासाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 5,000 जागा वाढवल्या जातील. तसेच एमबीबीएसच्या 5,023 जागा वाढवण्यासाठी विद्यमान सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अद्ययावतीकरणासाठी सुरू असलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा विस्तार करत प्रत्येक जागेसाठी 1.50 कोटी रुपयांच्या वाढीव खर्च मर्यादा देण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे वैद्यकीय पदवी शिक्षण घेत असलेल्यांची संख्या वाढून परिणामी अशा स्वरुपातील वैद्यकीय क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल, अतिरिक्त पदव्युत्तर जागा निर्माण झाल्यामुळे तज्ञांची उपलब्धता वाढेल, आणि सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये नवीन तज्ञांची सेवा सुरू करता येईल. यामुळे देशभरातील डॉक्टरांची एकूण उपलब्धता बळकट होऊ शकणार आहे.नवी दिल्ली 7 लोक कल्याण मार्ग इथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
September 04th, 05:35 pm
आपल्याकडे शिक्षकांप्रति नैसर्गिक आदर, सन्मानाची भावना असते आणि ते समाजाची मोठी ताकद असतात. शिक्षकांना आशीर्वाद देणे, हे अयोग्य/पाप आहे. त्यामुळे मी हे पाप करू इच्छित नाही. मी आपल्याशी जरूर संवाद साधू इच्छितो. माझ्यासाठी हा एक खूपच छान अनुभव होता की तुम्हा सगळ्यांना... खरं तर तुम्हा सगळ्यांना नाही तर तुम्हांला मला भेटणे, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची एक कहाणी असेल, त्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकला नसतात. पण इतका वेळ काढणे कठीण असते. तरीही मला तुमच्या सर्वांकडून तुमच्याबद्दल थोडंफार जाणून घेण्याची संधी मिळाली, ती नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणे हा शेवट असू शकत नाही. आपल्या सर्वांवर सगळ्यांचे लक्ष असेल, या पुरस्कारानंतर सर्वांचे लक्ष असेल. याचा अर्थ आपल्या सर्वांची पोहोच वाढली आहे. यापुर्वी तुमचे प्रभाव क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र असेल ते या पुरस्कारानंतर वृद्धिंगत होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले
September 04th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले. शिक्षक वर्गाला राष्ट्र-उभारणीतील मजबूत शक्ती संबोधत पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकांना भारतीय समाजात दिल्या जात असलेल्या नैसर्गिक सन्मानाचे कौतुक केले. शिक्षकांचा गौरव करणे ही केवळ एक रीत किंवा पद्धत नसून त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाला आणि प्रभावाला दिलेली मान्यता असते यावर त्यांनी अधिक भर दिला.भारत - जपान मानव संसाधन देवाणघेवाण आणि सहकार्य कृती आराखडा
August 29th, 06:54 pm
भारत आणि जपान यांच्या दरम्यान होत असलेल्या व्दिपक्षीय कार्यक्रमामध्ये 5 वर्षात 500,000 कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण होईल. यामध्ये भारतातील 50,000 कुशल कर्मचारी आणि संभाव्य प्रतिभावंतांचा समावेश असणार आहे. भारत-जपान यांच्यामधील 2025 च्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान उभय देशांच्या पंतप्रधानांनी भेटी आणि देवाणघेवाणीद्वारे त्यांच्या नागरिकांमध्ये सखोल समज वाढवण्याची, मूल्ये सह-निर्माण करण्याची आणि संबंधित राष्ट्रीय प्राधान्यक्रम लक्षात घेवून कार्य करण्यासाठ, मानवी संसाधनांसाठी सहयोगी मार्ग शोधण्याच्या आवश्यकतेविषयी सहमती दर्शविली.अहमदाबाद येथील कन्या वसतिगृह - सरदारधाम दुस-या टप्प्याच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 24th, 10:39 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, गुजरात सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार, सरदारधामचे प्रमुख गगजी भाई, विश्वस्त व्ही. के. पटेल, आणि इतर सर्व मान्यवर, आणि माझ्या प्रिय बंधून भगिनींनो, विशेषत्वाने प्रिय कन्या !!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबादच्या सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह येथील भूमिपूजन सोहळ्यातील भाषण
August 24th, 10:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह भूमिपूजन सोहळ्यास व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. उपस्थितांना उद्देशून बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सरदारधाम हे नाव जितके पवित्र आहे तितकेच त्याचे कार्यही पवित्र आहे. मुलींच्या शिक्षण व सेवेसाठी समर्पित अशा या वसतिगृहाच्या उद्घाटनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या वसतिगृहात राहणाऱ्या मुली आपल्या सोबत स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन येतील व त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर संधी येथे उपलब्ध होतील. या मुली आत्मनिर्भर आणि सक्षम झाल्यानंतर स्वाभाविकपणे राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतील तसेच त्यांचे कुटुंबही सक्षम होईल, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी या वसतिगृहात प्रवेश मिळविणाऱ्या सर्व मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.आसाममध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थापनेबद्दल पंतप्रधानांनी आसामच्या जनतेचे केले अभिनंदन
August 20th, 07:48 pm
आसाममध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) स्थापन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
August 12th, 04:34 pm
64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. शतकानुशतके, भारतीय आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ, 5 व्या शतकात, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते असे सांगणारे ते पहिलेच होते. अक्षरशः त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला!,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाडला केले संबोधित
August 12th, 04:33 pm
भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी, अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. भारतीय शतकानुशतकांपासून आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत, असे मोदी म्हणाले. त्यांनी आर्यभट्ट यांचे उदाहरण दिले, ज्यांनी 5 व्या शतकात शून्याचा शोध लावला आणि पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते असे विधान प्रथम केले. शब्दशः, त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला! असे पंतप्रधानांनी नमूद केले.Prime Minister extends greetings on World Sanskrit Day, Reiterates commitment to preserving and promoting Sanskrit heritage
August 09th, 10:13 am
The Prime Minister, Shri Narendra Modi today conveyed his greetings to the nation on the occasion of World Sanskrit Day, observed on Shravan Poornima. Calling Sanskrit “a timeless source of knowledge and expression”, the Prime Minister underlined its enduring influence across perse fields.उत्तरप्रदेशात सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
May 14th, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला मंजुरी देण्यात आली.सीबीएसई इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा
May 13th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीबीएसईच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वाययुजीएम (युग्म) बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 29th, 11:01 am
आज येथे सरकार, शिक्षण क्षेत्र, विज्ञान आणि संशोधनाशी संबंधित विविध क्षेत्रातील मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ही एकजूट, हे ऐक्य, यालाच युग्म असे म्हणतात. हे एक असे युग्म आहे ज्यामध्ये विकसित भारताच्या भविष्यकालीन तंत्रज्ञानाशी संबंधित भागधारक एकत्र आले आहेत, एकजूट झाले आहेत. भारताची नवोन्मेष क्षमता आणि गहन-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारताचे स्थान बळकट करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्यांना या कार्यक्रमाच्या आयोजनाद्वारे आणखी बळकटी मिळेल असा विश्वास मला वाटतो. आज आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई या संस्थांमध्ये कृत्रिम प्रज्ञा , गुप्तहेर यंत्रणा आणि जैवविज्ञान, जैव तंत्रज्ञान तसेच आरोग्य आणि वैद्यकीय सेवा यांच्याशी संबंधित सुपर हब्सची सुरुवात होत आहे. आज वाधवानी नवोन्मेष नेटवर्कची देखील सुरुवात झाली आहे. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेसोबत मिळून संशोधनाला चालना देण्याचा देखील निर्धार करण्यात आला आहे. या प्रयत्नासाठी वाधवानी प्रतिष्ठानचे, आमच्या आयआयटी संस्थांचे, आणि इतर सर्व भागधारकांचे मी अभिनंदन करतो. तुमची समर्पणवृत्ती आणि सक्रियतेमुळे खासगी आणि सरकारी क्षेत्राने एकत्र येऊन देशाच्या शिक्षण प्रणालीमध्ये अनेक सकारात्मक बदल केले आहेत.