“कायदेविषयक मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 08th, 05:33 pm
सरन्यायाधीश बी आर गवई जी, न्यायाधीश सूर्यकांत जी, न्यायाधीश विक्रम नाथ जी, केंद्रातील माझे सहकारी अर्जुन राम मेघवाल जी, सर्वोच्च न्यायालयातील अन्य माननीय न्यायाधीशगण, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशगण, स्त्री आणि पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “कायदेविषयक मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
November 08th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयात “कायदेविषयक मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” यावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की या महत्त्वाच्या प्रसंगी सर्व उपस्थितांमध्ये उपस्थित राहणे खरोखरच विशेष होते. कायदेविषयक मदत वितरण यंत्रणा आणि कायदेशीर सेवा दिनाशी संबंधित कार्यक्रम मजबूत केल्यास भारताच्या न्यायव्यवस्थेला नवीन बळकटी मिळेल, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी 20 व्या राष्ट्रीय परिषदेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवर, न्यायव्यवस्थेचे सदस्य आणि कायदेविषयक सेवा अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांच्या हस्ते 8 नोव्हेंबर रोजी “कायदेविषयक मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन
November 06th, 02:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्वोच्च न्यायालय येथे आयोजित “कायदेशीर मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने (एनएएलएसए) तयार केलेल्या कम्युनिटी मेडीएशन ट्रेनिंग मोड्यूलच्या कार्याची सुरुवात करतील. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील.