Together, we can build global solutions: PM Modi at the Economic Roadmap Business Reception in Melbourne, Australia
July 09th, 06:15 am
PM Modi participated in the Australia-India CEOs Forum and the Economic Roadmap Business event in Melbourne. Addressing the CEOs Forum, he highlighted India's strong economic growth, policy reforms, digital transformation and expanding innovation ecosystem. Addressing the Economic Roadmap Business event, he expressed satisfaction at the growth of trade and investment ties based on ECTA and called for early conclusion of the proposed CECA.Prime Minister addresses Australia-India CEOs Forum and Economic Roadmap Business event
July 09th, 06:00 am
PM Modi participated in the Australia-India CEOs Forum and the Economic Roadmap Business event in Melbourne. Addressing the CEOs Forum, he highlighted India's strong economic growth, policy reforms, digital transformation and expanding innovation ecosystem. Addressing the Economic Roadmap Business event, he expressed satisfaction at the growth of trade and investment ties based on ECTA and called for early conclusion of the proposed CECA.List of Outcomes: Prime Minister’s visit to Indonesia
July 07th, 01:03 pm
The state visit of PM Modi to Indonesia resulted in the signing of 14 agreements, strengthening India-Indonesia cooperation across key sectors. Major announcements include the restoration of Prambanan Temple, the Tagore-Dewantara Year of Cultural and Educational Diplomacy, an IIM Bangalore campus in Indonesia and the launch of the Indonesia Open Network in India.दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती
April 20th, 03:57 pm
जहाजबांधणी, नौवहन आणि सागरी लॉजिस्टिक्समधील भागीदारीसाठी भारत-दक्षिण कोरिया सर्वसमावेशक आराखडाTMC came to power by lying in the name of “Maa, Maati, Manush”: PM Modi in Dakshin Dinajpur, West Bengal
April 11th, 11:40 am
PM Modi addressed a massive rally Dakshin Dinajpur, West Bengal. In his speech, he prioritised women’s safety, justice, and empowerment, outlining measures like fast-tracking cases, increasing women police recruitment, and financial support initiatives. He remarked that while the BJP believes in Sabka Saath, Sabka Vikas, it will also ensure that ‘hisaab’ is fulfilled in West Bengal.The BJP’s resolve is a declaration to end TMC’s jungle raj and syndicate rule: PM Modi in Jangipur, West Bengal
April 11th, 11:38 am
PM Modi addressed a massive rally in Jangipur, West Bengal. In his speech, he lauded BJP’s manifesto, outlining six key guarantees focused on ending syndicate raj, ensuring women’s empowerment, boosting education infrastructure, and delivering transparent governance. He also promised employment opportunities and benefits for government employees.Massive public meetings in Purba Bardhaman, Jangipur & Dakshin Dinajpur, West Bengal
April 11th, 11:30 am
Tapping into the growing momentum in West Bengal, PM Modi addressed a massive public gathering in Purba Bardhaman, highlighting BJP’s vision for a fear-free, Viksit Bengal while launching a sharp attack on the TMC government over corruption, lawlessness and appeasement politics.राष्ट्रकुल देशांतील लोकसभांचे सभापती तसेच अध्यक्ष यांच्या 28 व्या परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 15th, 11:00 am
लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंशजी, आंतर-संसदीय संघाच्या अध्यक्ष तुलिया अॅकसन, राष्ट्रकुल संसदीय संघटनेचे अध्यक्ष ख्रिस्तोफर कलीला, राष्ट्रकुल सदस्य देशांचे सभापती आणि अध्यक्ष, इतर प्रतिनिधी आणि सभ्य स्त्रीपुरुषहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे केले उद्घाटन
January 15th, 10:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील संसद भवन परिसरातील संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये राष्ट्रकुल देशांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे (सीएसपीओसी) उद्घाटन केले. संसदीय लोकशाहीमध्ये सभापतींची भूमिका अद्वितीय असते, असे पंतप्रधान मोदी याप्रसंगी बोलताना म्हणाले. सभापतींना जास्त बोलण्याची संधी मिळत नाही, परंतु त्यांची जबाबदारी इतरांचे ऐकणे आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याची संधी मिळेल याची खात्री करणे ही असते, हे त्यांनी अधोरेखित केले. गोंगाट करणाऱ्या किंवा अतिउत्साही सदस्यांनाही हसतमुखाने हाताळणे हा सभापतींचा समान गुणधर्म आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.आंध्र प्रदेशातील अमरावती येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि प्रकल्पांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 02nd, 03:45 pm
आंध्र प्रदेशचे राज्यपाल सैयद अब्दुल नजीर जी, मुख्यमंत्री आणि माझे मित्र चंद्राबाबू नायडू जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी मंत्री, उत्साही उप-मुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारचे मंत्री, सर्व खासदार आणि आमदार आणि आंध्र प्रदेशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशात अमरावती येथे, 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांची केली पायाभरणी आणि उद्घाटन
May 02nd, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात अमरावती येथे 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. अमरावतीच्या या पवित्र भूमीवर उभे राहून, आपल्याला केवळ एक शहर दिसत नाही, तर एक स्वप्न साकार होताना दिसत आहे—एक नवीन अमरावती, एक नवीन आंध्र, अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. अमरावती ही एक अशी भूमी आहे जिथे परंपरा आणि प्रगती या परस्परांसोबत वाटचाल करतात, बौद्ध वारशाची शांतता आणि एका विकसित भारताची ऊर्जा या दोहोंचा अंगिकार केला जातो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे, ते प्रकल्प केवळ काँक्रीटच्या संरचना नाहीत, तर आंध्र प्रदेशच्या आकांक्षा आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीकोनाचा मजबूत पाया आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान वीरभद्र, भगवान अमरलिंगेश्वर आणि तिरुपती बालाजी यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनाही शुभेच्छा दिल्या.इंडिया स्टील 2025 कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
April 24th, 02:00 pm
आज आणि पुढील दोन दिवस, आपण भारताच्या सनराईज सेक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलाद क्षेत्राच्या सामर्थ्य आणि संधींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. हे एक असे क्षेत्र आहे, जे भारताच्या प्रगतीचा आधार आहे, विकसित भारताचा मजबूत पाया आहे, आणि जो भारतात मोठा बदल घडवून आणणाऱ्या नव्या युगाची गाथा लिहीत आहे. मी इंडिया स्टील 2025 मध्ये आपले मन:पूर्वक स्वागत करतो. मला विश्वास आहे की हा कार्यक्रम नव्या कल्पनांची देवाणघेवाण, नव्या भागीदारींची निर्मिती आणि नवप्रवर्तनाला चालना देणाऱ्या एका नव्या प्लॅटफॉर्मची भूमिका पार पाडेल. पोलादक्षेत्रात एका नव्या पर्वाची ही सुरुवात ठरेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमाला केले संबोधित
April 24th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत झालेल्या इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढचे दोन दिवस भारताच्या उदयोन्मुख क्षेत्राची - स्टील अर्थात पोलाद उद्योग क्षेत्राची क्षमता आणि संधी यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. हे क्षेत्र भारताच्या प्रगतीचा पाया आहे, हे क्षेत्र विकसित भारताचा पाया मजबूत करणारे क्षेत्र आहे, तसेच हे क्षेत्र देशाच्या परिवर्तनाचा नवा अध्याय लिहीत आहे, असे ते म्हणाले. आपल्या संबोधनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. हा कार्यक्रम परस्परांसोबत नवीन कल्पना सामायिक करण्यासाठी, नवीन भागीदाऱ्या स्थापित करण्यासाठी तसेच नवोन्मेषाला चालना देण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून कामी येईल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम पोलाद उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या नव्या अध्यायाशी संबंधित पाया रचेल असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मधील भाषण
March 06th, 08:05 pm
एक प्रकारे युवकांच्या सहभागाने आपण सर्व बंधने तोडू शकतो, सीमा ओलांडून जाऊ शकतो, आणि मग असे कोणतेही लक्ष्य शिल्लक राहत नाही जे साध्य करता येणार नाही . असे कोणतेही ध्येय उरत नाही ज्यापर्यंत पोहोचता येणार नाही. रिपब्लिक टीव्हीने या शिखर परिषदेसाठी एका नवीन संकल्पनेवर काम केले आहे. या शिखर परिषदेच्या यशासाठी मी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो, तुमचे अभिनंदन करतो. बरं, यात माझाही थोडासा स्वार्थ आहे, एक तर गेल्या काही दिवसांपासून माझा प्रयत्न आहे की मला एक लाख तरुणांना राजकारणात आणायचं आहे आणि ते एक लाख असे असतील ज्यांच्या कुटुंबातील कुणीही आजवर राजकारणात आलेले नसतील, ते युवकच प्रथम येणारे असतील, त्यामुळे एक प्रकारे हा कार्यक्रम माझ्या या उद्दिष्टाला अनुरूप पार्श्वभूमी तयार करत आहे. दुसरे म्हणजे, माझा वैयक्तिक फायदा असा आहे की जे 2029 मध्ये मतदान करण्यासाठी जातील त्यांना माहित नाही की 2014 पूर्वी वर्तमानपत्रातील मथळे काय असायचे , हे त्यांना माहीत नाही . 10-10, 12-12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे व्हायचे हे त्यांना माहीत नाही आणि जेव्हा ते 2029 मध्ये मतदान करायला जातील तेव्हा त्यांच्यासमोर तुलना करण्यासाठी काहीही नसेल आणि म्हणूनच मला ती कसोटी पार करायची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे जे वातावरण तयार होत आहे , ही जी पार्श्वभूमी तयार होत आहे ती हे काम नक्की करेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 ला संबोधित केले
March 06th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे आयोजित रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मध्ये भाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मुलभूत पातळीवर युवकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि महत्त्वाची हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यासाठी रिपब्लिक टीव्ही या वाहिनीने स्वीकारलेल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाबद्दल वाहिनीच्या संचालकांचे अभिनंदन केले. जेव्हा देशातील तरुण राष्ट्रीय चर्चांमध्ये सहभागी होतात तेव्हा त्यातून संकल्पनांमध्ये नाविन्य निर्माण होते आणि संपूर्ण वातावरण तरुणांच्या उर्जेने भरून जाते, असे मत त्यांनी नोंदवले. ही उर्जा आत्ता या कार्यक्रमात जाणवते आहे हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. पंतप्रधान पुढे म्हणाले की, तरुणांचा सहभाग सर्व प्रकारचे अडथळे पार करण्यात आणि बंधनांच्या पलीकडचा विचार करण्यात सहाय्यक ठरतो आणि त्यामुळे प्रत्येक ध्येय साध्य करण्याजोगे आणि प्रत्येक इच्छित लक्ष्य गाठ्ण्याजोगे होऊन जाते. अशा पद्धतीच्या परिषदेची नवी संकल्पना राबवल्याबद्दल त्यांनी रिपब्लिक टीव्ही वाहिनीची प्रशंसा केली आणि या उपक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख युवकांना भारताच्या राजकारणात आणण्याच्या त्यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला.विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पाचे आंध्र प्रदेशच्या जनतेच्या हृदयात आणि मनात विशेष स्थान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
January 17th, 05:45 pm
विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पाचे आंध्र प्रदेशच्या जनतेच्या हृदयात आणि मनात विशेष स्थान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भागभांडवली सहाय्य देण्याचा निर्णय घेतला गेला अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.ओडिशा पर्ब कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 24th, 08:48 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री धर्मेंद्र प्रधान जी, श्री अश्विनी वैष्णव जी, ओडिया समाजाचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ प्रधान जी, ओडिया समाजाचे इतर अधिकारी, ओदिशातील सर्व कलाकार, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो !पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ओदिशा पर्व 2024’ सोहळ्यात झाले सहभागी
November 24th, 08:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित ‘ओदिशा पर्व 2024’ सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ओदिशातील सर्व बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावर्षी स्वभाव कवी गंगाधर मेहेर यांच्या पुण्यतिथीचे शताब्दी वर्ष आहे असे सांगत त्यांनी मेहेर यांना आदरांजली वाहिली . यावेळी त्यांनी भक्त दासिया भौरी , भक्त सालबेगा आणि उडिया भागवतचे लेखक जगन्नाथ दास यांना श्रद्धांजली वाहिली.हरित हायड्रोजनवरच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेतला पंतप्रधानांचा व्हिडीओ संदेश
September 11th, 10:40 am
वैज्ञानिक वर्ग आणि नवप्रवर्तक , उद्योग जगतातले दिग्गज आणि माझ्या प्रिय मित्रांनो, मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.हरित हायड्रोजनवरच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपणा सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
September 11th, 10:20 am
हरित हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की जगभरात महत्त्वपूर्ण परिवर्तन होत आहे. हवामान बदल ही केवळ भविष्याची बाब नसून त्याचा प्रभाव आता जाणवू शकतो ही जाणीव आज वाढताना दिसत आहे यावर त्यांनी भर दिला. आता आणि हीच कृती करण्याची वेळ आहे , असे मोदी म्हणाले. ऊर्जा संक्रमण आणि शाश्वतता जागतिक धोरणात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.