First the product, then components and now the semiconductor; this is the definitive next phase of Make in India: PM Modi in Sanand, Gujarat
July 04th, 05:15 pm
PM Modi inaugurated the CG Semi OSAT facility in Sanand, Gujarat and lauded the joint efforts of Indian, Japanese and Thai industry partners. He praised the transition into active commercial production capable of delivering 20 crore units annually, while expressing confidence in the team's ambitious target of reaching 500 crore units. He reiterated that, with a complete commitment to ease of doing business, 140 crore Indians will definitely make the nation developed by 2047.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातच्या साणंद येथील 'सीजी सेमी'च्या 'आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट' (ओसॅट) सुविधेचे उद्घाटन
July 04th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साणंद येथे सीजी सेमी'च्या आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट' (ओसॅट) सुविधेचे उद्घाटन केले. या प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी हा उद्घाटन सोहळा म्हणजे देशाने निर्धारित केलेली उद्दीष्टे पूर्ण करण्याप्रती दृढ कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे उद्गार काढले. देशाने केलेले दृढ संकल्प कोणत्याही प्रकारे न डगमगता प्रत्यक्ष वास्तवात उतरवणे गरजेचे असल्याच्या मुदद्यावर त्यांनी भर दिला. भारत जेव्हा एखादा संकल्प करतो, तेव्हा तो पूर्णत्वास नेतोच; आजचा कार्यक्रम हा त्याचाच पुरावा असल्याचे मोदी म्हणाले.It is the need of the hour that we transform 'Vocal for Local' into a mass movement: PM Modi in Vadodara
May 11th, 06:15 pm
Addressing a special gathering during the inauguration of Sardardham Hostel in Vadodara, PM Modi said education, skill development and women’s empowerment are key to shaping India’s future workforce and entrepreneurial growth. Highlighting the impact of global economic challenges and the West Asia crisis, he urged citizens to support “Vocal for Local”, reduce dependence on imports, conserve foreign exchange and strengthen self-reliance through collective responsibility and everyday actions.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन
May 11th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा, गुजरात इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन केले. वडोदरा इथल्या सरदारधाममध्ये एका प्रतिष्ठित मेळाव्याला संबोधित करताना, ज्या दिवशी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला गेला, त्याच दिवशी शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाचा आध्यात्मिक स्मरणाशी असलेल्या शुभ योगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यावेळी डॉ. दुष्यंत आणि दक्षा पटेल संकुलाचे उद्घाटन, अध्यापन सहाय्य योजनेचा शुभारंभ तसेच अनेक शैक्षणिक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी या विविध उपक्रमांचे वर्णन तरुणांच्या भावी करिअरसाठी 'लाँचिंग पॅड्स' असे केले. काही तासांपूर्वी मी प्रभास पाटण येथे सोमनाथ अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि आता आपण इथे परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करत आहोत, हा समन्वय वारसा आणि प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाते याचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी नमूद केले.लखनौ इथे राष्ट्र प्रेरणा स्थळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 25th, 06:16 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी आणि लखनौचे खासदार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान पंकज चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी,महिला आणि पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन
December 25th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.नामवंत शिल्पकार राम सुतार जींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
December 18th, 12:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम सुतार जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. श्री राम सुतार जी हे एक असामान्य शिल्पकार होते. त्यांच्या शिल्पकलेमधील कुशलतेमुळेच केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीसह देशाचे सर्वोच्च मानबिंदू असलेल्या काही कलाकृती भारताला लाभल्या. भारताचा इतिहास, संस्कृती आणि एकजुटीच्या भावनेची सामर्थ्यशाली अभिव्यक्ती असलेल्या कलाकृती म्हणून त्यांच्या कलाकृतींची नेहमीच प्रशंसा होत राहील आणि या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी भावी पिढ्यासांठी राष्ट्रीय अभिमान अजरामर केला आहे. त्यांच्या कलाकृती कलाकार आणि नागरिक या दोघांनाही नेहमीच प्रेरणा देत राहतील.लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
December 15th, 08:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सरदार पटेलांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला एकसंध करण्यासाठी आणि भारताला एकतेच्या सूत्रात गुंफण्यासाठी समर्पित केले.नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 31st, 07:00 pm
सर्वप्रथम, मला यायला विलंब झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज सरदार साहेबांची 150 वी जयंती आहे. एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्याचा विशेष कार्यक्रम होता, त्यामुळे मला उशीर झाला आणि मी वेळेवर पोहोचू शकलो नाही, आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी इथे आलो, त्यावेळी जे मंत्र ऐकले होते, त्यांची ऊर्जा आपल्याला आताही जाणवत आहे. जेव्हा जेव्हा मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळते, आणि जेव्हा जेव्हा मी येतो, तेव्हा तो एक दिव्य अनुभव असतो, एक अद्भुत अनुभव असतो. आणि हा स्वामी दयानंदजींचा आशीर्वाद आहे, त्यांच्या आदर्शांबद्दल आपल्या सर्वांना आदर आहे, तुम्हा सर्व विचारवंतांशी माझी अनेक दशकांची जवळीक आहे, त्यामुळे मला तुमच्यामध्ये पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळते. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटतो, तुमच्याशी संवाद साधतो, तेव्हा मला एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच प्रेरणा मिळते. आणि मला नुकतेच सांगण्यात आले की अशी आणखी नऊ सभागृहे बांधण्यात आली आहेत. तेथे आपले सर्व आर्य समाज सदस्य हा कार्यक्रम व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून पाहत आहेत. मी त्यांना पाहू शकत नाही, पण मी इथूनच त्यांना प्रमाण करतो.संपूर्ण भारतातील लोकांना जोडणाऱ्या जनआंदोलनातून बांधलेली ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ही प्रतिमा सरदार पटेल यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे: पंतप्रधान
October 31st, 12:43 pm
भारतातील नागरिक, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक ज्याद्वारे जोडले गेले आहेत अशा जनचळवळीचे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हे उल्लेखनीय उदाहरण आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहिलेल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले आहेPrime Minister pays tributes to Sardar Vallabhbhai Patel at the Statue of Unity in Kevadia
October 31st, 12:41 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to Sardar Vallabhbhai Patel at the ‘Statue of Unity’ in Kevadia.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात दिलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
October 31st, 09:00 am
सरदार पटेल यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीच्या या ऐतिहासिक दिवशी, एकता नगरची ही दिव्य प्रभात , हे विहंगम दृश्य, सरदार साहेबांच्या चरणांशी आमची उपस्थिती, आज आपण सर्व जण एका महान क्षणाचे साक्षीदार आहोत. देशभरात आयोजित एकता दौड, रन फॉर युनिटी , कोट्यवधी भारतीयांचा उत्साह, नूतन भारताच्या संकल्पशक्तीचा आपणा सर्वाना साक्षात्कार होतो आहे. नुकतेच इथे जे कार्यक्रम झाले, काल संध्याकाळी जे अद्भुत सादरीकरण झाले, त्यांच्यातही भूतकाळातील परंपरा होती, वर्तमानातील श्रम व शौर्य होते, आणि भविष्यकाळातील सिद्धतेची झलकही होती. सरदार साहेबांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ विशेष नाणे आणि विशेष टपाल तिकिटदेखील जारी केले गेले आहे. मी सर्व 140 कोटी देशवासियांना सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले
October 31st, 08:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. सरदार पटेल यांची 150 वी जयंती हा ऐतिहासिक सोहळा असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. एकता नगरमधील सकाळ दिव्य असून इथले विहंगम दृश्य विस्मयकारक असल्याचे सांगून मोदी यांनी सरदार पटेल यांच्या चरणी सामूहिक उपस्थिती असल्याचा उल्लेख केला आणि देश आज एका महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार होत असल्याचे सांगितले. त्यांनी देशव्यापी एकता दौड आणि कोट्यवधी भारतीयांच्या उत्साहपूर्ण सहभागाचा उल्लेख केला, आणि नव्या भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकारत असल्याचे अधोरेखित केले. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांचा आणि आदल्या संध्याकाळी झालेल्या उल्लेखनीय सादरीकरणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की यामधून भूतकाळातील परंपरा, वर्तमानातील श्रम आणि शौर्य तसेच भविष्यातील कामगिरीची झलक प्रतिबिंबित होत आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीच्या स्मृती प्रीत्यर्थ एक नाणे आणि विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशातील सर्व 140 कोटी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (127 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
October 26th, 11:30 am
अशा कठीण काळात सुमारे वीस वर्षांचा एक युवक या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. आज मी या तरुणाबद्दल एका खास कारणासाठी चर्चा करत आहे. त्याचे नाव उघड करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एकही शब्द बोलणे गुन्हा मानले जात असे, तेव्हा या तरुणाने सिद्दीकी नावाच्या निजामाच्या अधिकाऱ्याला उघडपणे आव्हान दिले. निजामाने सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचं पीक जप्त करण्यासाठी पाठवलं होते. परंतु अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीची हत्या केली. तो अटकेपासून स्वतः ला वाचवण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या जुलमी पोलिसांपासून सुटका करून घेऊन तो तरुण शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममध्ये पोहोचला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथे ‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
September 20th, 11:00 am
आपल्या भावनगरने तर अगदी ‘धमाका‘च केला आहे, हे आत्ता लक्षात आले. आज इथे मला मंडपाबाहेर जनसागर - जणू माणसांचा समुद्र दिसतोय. इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी आले आहात, त्यासाठी आपल्या सर्वांचा खूप-खूप आभारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमाला केले संबोधित; भावनगर, गुजरात येथे 34,200 कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भावनगर इथे 34,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमात केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सर्व मान्यवर आणि उपस्थित जनतेचे स्वागत केले. 17 सप्टेंबर रोजी मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा उल्लेख करत, लोकांकडून मिळालेले प्रेम हा उर्जेचा मोठा स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वकर्मा जयंतीपासून गांधी जयंतीपर्यंत, म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत, देश 'सेवा पंधरवडा' साजरा करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांत गुजरातमध्ये अनेक सेवाभावी उपक्रम झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. शेकडो ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, आतापर्यंत एक लाख व्यक्तींनी रक्तदान केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अनेक शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून, लाखो नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यभरात 30,000 हून अधिक आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत, तिथे सामान्य जनतेला आणि विशेषतः महिलांना वैद्यकीय तपासणी आणि उपचार पुरवले जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी देशभरातील सेवा उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले आणि आभार मानले.गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.गुजरातमधील केवडिया येथील प्रतिष्ठित स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिल्याबद्दल पंतप्रधानांनी ओमर अब्दुल्ला यांचे कौतुक केले.
July 31st, 11:05 pm
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गुजरातमधील साबरमती नदीकिनाऱ्याला आणि केवडिया येथील प्रतिष्ठित स्टॅच्यू ऑफ युनिटीला नुकत्याच दिलेल्या भेटीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.गुजरात नगर विकास उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 27th, 11:30 am
मी दोन दिवस गुजरातमध्ये आहे. काल वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि आज सकाळी गांधीनगरला, मी जिथे जिथे गेलो तिथे असे वाटले की, देशभक्ती म्हणजे गर्जना करणारा सिंदूरिया सागर, सिंदूरिया सागराची गर्जना आणि फडकणारा तिरंगा ध्वज, लोकांच्या हृदयात मातृभूमीबद्दलचे अपार प्रेम, हे एक दृश्य होते, आणि हे फक्त गुजरातमध्येच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शरीर कितीही निरोगी असले तरी, जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर अस्वस्थ राहते. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.