पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेला दिल्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा
December 01st, 06:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नागा संस्कृतीत सेवा, शौर्य आणि करुणाभावनेची मूळे घट्टपणे रुजलेली असून, ही बाब अनुकरणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागालँडच्या जनतेने अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. येत्या काळात हे राज्य समृद्धी आणि प्रगतीसह वाटचाल करत राहो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा
November 15th, 08:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेली झारखंड ही एक वैभवशाली भूमी आहे ,असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांच्या वारशाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, या पवित्र भूमीचा इतिहास धैर्य, संघर्ष आणि प्रतिष्ठेच्या प्रेरणादायी कथांनी भरलेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या उत्कल दिनाच्या शुभेच्छा
April 01st, 08:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्कल दिनाच्या निमित्ताने ओदिशाच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला ओदिशाचा इतिहास, साहित्य आणि संगीताचा अभिमान वाटतो असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र तसेच ओदिशा सरकार राज्याच्या प्रगतीसाठी प्रचंड काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी नागालँडला राज्य दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
December 01st, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडच्या राज्य दिनानिमित्त नागालँडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की नागा संस्कृती कर्तव्य आणि करुणेच्या भावनेसाठी ओळखली जाते.मिझोराम राज्य स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
February 20th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मिझोरामच्या निरंतर प्रगती, शांतता आणि समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशातील जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
January 25th, 09:42 am
हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेचे राज्य स्थापना दिनानिमित्त केले अभिनंदन
January 21st, 09:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य स्थापना दिनानिमित्त मणिपूरच्या जनतेला अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत.