श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ च्या मोठ्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
February 24th, 04:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांविषयक मंत्रिमंडळ समितीने आज श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ च्या विस्तार - विकासाला मान्यता दिली. या कार्यासाठी सुमारे खर्च 1,677 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काश्मीर खोऱ्यात हवाई वाहतुकीची पायाभूत सुविधा आणि संपर्क यंत्रणा मजबूत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. या प्रकल्पात सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी बॅरेक्स बांधण्याचाही समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) बडगाम हवाई तळाअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे या विमानतळाचे कार्यान्वयन केले जाते. वर्ष 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून सुविधा उपलब्ध करून दिलेले हे विमानतळ, श्रीनगर शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे.