स्वामी चिद्भवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या किंडल आवृत्तीचे पंतप्रधान 11 मार्चला प्रकाशन करणार
March 10th, 05:00 pm
स्वामी चिद्भवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या किंडल आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्चला प्रकाशन करणार असून सकाळी 10.25 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत. स्वामी चिद्भवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या 5 लाख प्रतींची विक्री झाल्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.