जागतिक दौरा सन्मानाचा: पंतप्रधान मोदींना या 29 देशांनी केले आहे सन्मानित - हे आहे त्याचे कारण!

July 07th, 04:59 pm

कुवेत, फ्रान्स, पापुआ न्यू गिनी आणि अन्य दोन डझनहून अधिक देशांकडून भारताच्या पंतप्रधानांना त्यांच्या देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते, तेव्हा त्यातून राजनैतिक सदिच्छेपेक्षाही बरेच काही प्रतिबिंबित होते. हे देशाचा वाढता प्रभाव, त्याची मूल्ये आणि नेतृत्वाला जगन्मान्यता मिळत असल्याचे द्योतक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'श्रीलंका मित्र विभूषण' प्रदान

April 05th, 02:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते 'श्रीलंका मित्र विभूषण' हा सन्मान प्रदान करण्यात आला. आभार मानताना पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ मैत्री आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे.

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन

April 05th, 11:30 am

आज राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांच्या हस्ते ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही, तर हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा भारत आणि श्रीलंकेतील नागरिकांमधील ऐतिहासिक संबंधांचा आणि दाट मैत्रीचा सन्मान आहे.