पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींशी दूरध्वनीवरुन साधला संवाद
December 01st, 08:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले
November 28th, 03:37 pm
श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या श्रीलंकेच्या लोकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सर्व बाधित कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी आणि लवकरात लवकर प्रकृती ठीक होण्यासाठी प्रार्थना केली आहे.आयएनएस विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 20th, 10:30 am
आजचा हा दिवस अद्भुत आहे, आजचा हा क्षण संस्मरणीय आहे, हे दृश्य अद्भुत आहे. आज माझ्या एका बाजूला अथांग समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या वीर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. आज माझ्या एका बाजूला अनंत क्षितिज आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तींना सामावून घेणारे हे विशाल, विराट आयएनएस विक्रांत आहे. सागराच्या पाण्यावर सूर्याच्या किरणांची ही चमक एका प्रकारे वीर जवानांनी उजळवलेले दिवाळीचे दिवे आहेत. या आमच्या अलौकिक दीपमाळा आहेत, यावेळी नौदलाच्या तुम्हा सर्व शूर सैनिकांमध्ये मी दिवाळीचे पवित्र पर्व साजरे करत आहे हे माझे भाग्य आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रांतवर साजरी केली दिवाळी
October 20th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना सशस्त्र दलाच्या जवानांना संबोधित केले. आजचा दिवस म्हणजे एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आहे आणि समोर एक उल्लेखनीय दृश्य आहे असे नमूद करून, मोदी यांनी एका बाजूला विशाल महासागर आणि दुसरीकडे भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट शक्ती असल्याचे अधोरेखित केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे, तर दुसऱ्या बाजूला आयएनएस विक्रांतची प्रचंड शक्ती आहे, जी अनंत शक्तीचे मूर्त रूप आहे, असे त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाची चमक दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी लावलेल्या दिव्यांशी मिळती जुळती आहे, त्यामुळे दिव्यांची दिव्य माला तयार होते असं ते म्हणाले. भारतीय नौदलाच्या शूर जवानांमध्ये ही दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणे हा आपला बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.नवी दिल्लीत एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 17th, 11:09 pm
श्रीलंकेच्या पंतप्रधान महामहीम हरिणी अमरसूर्या महोदया, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, माझे मित्र टोनी ऍबट महोदय, यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक महोदय, मान्यवर अतिथी, स्त्री-पुरुषहो नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
October 17th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद उत्सवाच्या वातावरणात आयोजित केली जात आहे. त्यांनी सत्राची संकल्पना अजेय भारत ची प्रशंसा केली आणि ते खरोखरच समर्पक असल्याचे नमूद केले, कारण आज भारत थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. पंतप्रधान म्हणाले की भारत थांबणार नाही किंवा वेग कमीही करणार नाही, 140 कोटी भारतीय पूर्ण गतीने एकत्रितपणे पुढील वाटचाल करत आहेत.श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ. हरिनी अमरसूर्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
October 17th, 04:26 pm
श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ.हरिनी अमरसूर्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.स्वदेशी उत्पादने, व्होकल फॉर लोकल: सणांच्या हंगामाच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मन की बात मधून नागरिकांना आग्रहपूर्वक आवाहन
September 28th, 11:00 am
या महिन्याच्या मन की बातमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी भगतसिंग आणि लता मंगेशकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भारतीय संस्कृती, महिला सक्षमीकरण, देशभरात साजरे होणारे विविध सण, रा,स्व, संघाचा 100 वर्षांचा प्रवास, स्वच्छता आणि खादी विक्रीतील वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. स्वदेशीचा स्वीकार हाच देशाला स्वावलंबी बनवण्याचा मार्ग आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.तामिळनाडूतील गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात आदि तिरुवथिराई महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 27th, 12:30 pm
परम आदरणीय अधिनस्थ मठाधीशगण, चिन्मया मिशनचे स्वामीगण, तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवि जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. एल मुरुगन जी, स्थानिक खासदार थिरुमा-वलवन जी, मंचावर उपस्थित तामिळनाडूचे मंत्री, संसदेतील माझे सहकारी आदरणीय इलैयाराजा जी, सर्व ओदुवार, भक्त, विद्यार्थी, सांस्कृतिक इतिहासकार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ! नमः शिवायपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम येथे आदि थिरुवादिरई महोत्सवाला केले संबोधित
July 27th, 12:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम मंदिरात झालेल्या आदि थिरुवादिरई महोत्सवाला संबोधित केले. सर्वशक्तिमान भगवान शिव यांना त्यांनी वंदन केले. इलायराजा यांच्या संगीताच्या आणि ओदुवार यांच्या पवित्र मंत्रोच्चाराच्या साथीने, राजराजा चोल यांच्या पवित्र भूमीत दिव्य शिवदर्शनातून अनुभवायला मिळालेल्या गहन आध्यात्मिक ऊर्जेचे त्यांनी स्मरण केले. या आध्यात्मिक वातावरणामुळे आपले मन भारले गेल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
April 24th, 03:29 pm
जम्माू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात, अनेक निरपराध लोकांचा बळी गेला त्या घटनेनंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी जागतिक नेत्यांची रीघ लागली होती. साऱ्या जगातून मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच भारत दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून हुडकून काढेल असाही निर्धार व्यक्त केला.तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 06th, 02:00 pm
तमिळनाडूचे राज्यपाल एन. रवि, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, तमिळनाडू सरकारचे मंत्री, खासदार, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन
April 06th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीलंकेतील भारताच्या सहकार्याने उभारलेल्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन
April 06th, 12:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके हे दोन्ही नेते आज अनुराधापुरा इथे भारताच्या सहकार्याने बांधलेल्या दोन रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि शुभारंभ समारंभात सहभागी झाले होते.पंतप्रधानांनी जया श्री महा बोधी मंदिराला दिली भेट
April 06th, 11:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरात कुमार डिसानायके यांच्या सोबत अनुराधापुरा येथील पवित्र जया श्री महा बोधी मंदिराला भेट दिली आणि महाबोधी वृक्षाजवळ प्रार्थना केली. या वृक्षाची वाढ बो रोपापासून झाल्याचे मानले जाते, जो भारतातून तिसऱ्या शतकात इ.स.पूर्व संगमित्ता महा थेरि यांच्या कडून श्रीलंकेत आणण्यात आला होता.श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
April 05th, 10:59 pm
श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी (आयओटी ) आज कोलंबो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. श्रीलंका सरकारच्या सहकार्याने आयओटीसाठी 10,000 घरे, आरोग्य सुविधा, पवित्र स्थळ सीता एलिया मंदिर आणि इतर समुदाय विकास प्रकल्पांच्या बांधकामाला भारत सहयोग देईल अशी घोषणा मोदी यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची घेतली भेट
April 05th, 10:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो येथे श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी आदरणीय तमिळ नेते थिरु आर. संपंथन आणि थिरु मावई सेनाथिराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी श्रीलंकेतील विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली
April 05th, 10:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबोमध्ये श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांची भेट घेतली.1996 च्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या विशेष संवादाचा मजकूर
April 05th, 10:25 pm
मला बरं वाटतय की मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आणि मला वाटते की तुमचा संघ असा आहे की आजही भारतातील लोक तो लक्षात ठेवतात….कशी गोलंदाजांची धुलाई करुन तुम्ही आला होता, ते लोक विसरलेले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत साधला संवाद
April 05th, 10:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेत कोलंबो इथे श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत संवाद साधला. हा एक मनमोकळा अनौपचारिक संवाद होता. या संवादादरम्यान, क्रिकेटपटूंनी पंतप्रधानांना भेटून आनंद आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. पंतप्रधानही या संघाला भेटून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. या संघाची प्रभावी कामगिरी भारतीय नागरिकांच्या अद्यापही स्मरणात असल्याचे, विशेषत: कायमस्वरूपी छाप सोडलेला त्यांचा अविस्मरणीय विजय त्यांना अजूनही आठवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या संघाची कामगिरी आजही देशात गाजत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.