Prime Minister reaffirms the timeless significance of Somnath

January 09th, 09:37 pm

Prime Minister Shri Narendra Modi today reaffirmed the timeless significance of Somnath, describing it as the eternal embodiment of India’s spiritual strength and devotion.

PM shares a Subhashitam emphasising how true strength lies in collective solidarity

January 05th, 09:17 am

In a heartfelt tribute to India’s timeless culture and spiritual heritage, PM Modi today shared a Sanskrit verse reflecting how India’s civilisational journey has endured through the collective strength of its people, who have protected the nation’s cultural legacy with unwavering commitment.

भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद

January 03rd, 12:00 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन

January 03rd, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत

November 19th, 01:46 pm

साई रामचा दिव्य मंत्रोच्चार होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पोहोचले आणि तेथील हार्दिक स्वागताचा त्यांनी स्वीकार केला.

श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा

November 05th, 10:26 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरु नानक देव जी यांचे जीवन आणि संदेश मानवतेला अनंत काळ ज्ञानाचे मार्गदर्शन करत आहेत,असे मोदी यांनी म्हटले आहे. करुणा, समानता, नम्रता आणि सेवा यांची त्यांनी दिलेली शिकवण खूप प्रेरणादायी आहेत, असे मोदी यांनी पुढे म्हटले आहे .

नवा रायपूर येथे शांती शिखर- ब्रह्माकुमारी ध्यान केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 01st, 11:15 am

ॐ शांती! छत्तीसगडचे राज्यपाल रमन डेका जी, राज्याचे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री विष्णू देव साय जी, राजयोगिनी भगिनी जयंती जी, राजयोगी मृत्युंजय जी, सर्व ब्रह्मकुमारी भगिनी, येथे उपस्थित असलेले इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!

पंतप्रधानांच्या हस्ते छत्तीसगढमधील नवा रायपूर येथील ‘शांती शिखर’ या ध्यान केंद्राचे उद्‌घाटन, ब्रह्मकुमारींनाही केले संबोधित

November 01st, 11:00 am

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज छत्तीसगढमधील नवा रायपूर येथे आध्यात्मिक शिक्षण, शांतता आणि ध्यानधारणेसाठीच्या ‘शांती शिखर’ या आधुनिक केंद्राचे उद्‌घाटन झाले. यावेळी त्यांनी ब्रह्मकुमारींना संबोधितही केले. छत्तीसगढच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली असल्याने आजचा दिवस अत्यंत विशेष आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केले. आज देशभरातील अनेक राज्ये आपला राज्य स्थापना दिवस साजरा करत असल्याचे सांगून, छत्तीसगढसोबतच, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांच्या स्थापनेलाही 25 वर्षे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्व राज्यांच्या नागरिकांना त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. राज्यांचा विकास राष्ट्राच्या प्रगतीला चालना देतो, या मार्गदर्शक तत्त्वानेच प्रेरित होऊन आपण विकसित भारताच्या निर्मितीच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले

October 31st, 06:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये रोहिणी येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, आत्ताच ऐकलेल्या मंत्रांची ऊर्जा आपल्या सर्वांना अजूनही जाणवत आहे. आपण जेव्हा अशा संमेलनात येतो तेव्हा आपल्याला दैवी आणि विलक्षण अनुभव येतो, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी या भावनेचे श्रेय स्वामी दयानंद यांच्या आशीर्वादाला दिले. पंतप्रधानांनी स्वामी दयानंद यांच्या आदर्शांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व विचारवंतांबरोबरच्या अनेक दशकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आपल्याला वारंवार त्यांच्यामध्ये येण्याची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते त्यांना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि एक अनोखी प्रेरणा निर्माण होते.

Let’s take a pledge together — Bihar will stay away from Jungle Raj! Once again – NDA Government: PM Modi in Chhapra

October 30th, 11:15 am

In his public rally at Chhapra, Bihar, PM Modi launched a sharp attack on the INDI alliance, stating that the RJD-Congress bloc, driven by vote-bank appeasement and opposed to faith and development, can never respect the beliefs of the people. Highlighting women empowerment, he said NDA initiatives like Drone Didis, Bank Sakhis, Lakhpati Didis have strengthened women across Bihar and this support will be expanded when NDA returns to power.

This election will bring RJD-Congress their biggest defeat ever, and NDA’s biggest victory: PM Modi in Muzaffarpur, Bihar

October 30th, 11:10 am

PM Modi addressed a massive public meeting in Muzaffarpur, Bihar and began by saying that this was his first public meeting after the Chhath Mahaparv. He said Chhath is the pride of Bihar and the nation, a festival celebrated across India and even around the world. PM Modi also launched a campaign to promote Chhath songs across the nation. He said, “The public will choose the best tracks, and their creators will be awarded - boosting the preservation of Chhath tradition.”

PM Modi’s grand rallies electrify Muzaffarpur and Chhapra, Bihar

October 30th, 11:00 am

PM Modi addressed two massive public meetings in Muzaffarpur and Chhapra, Bihar. Beginning his first rally, he noted that this was his first public meeting after the Chhath Mahaparv. He said that Chhath is the pride of Bihar and of the entire nation—a festival celebrated not just across India, but around the world. PM Modi also announced a campaign to promote Chhath songs nationwide, stating, “The public will choose the best tracks, and their creators will be awarded - helping preserve and celebrate the tradition of Chhath.”

नवी दिल्ली येथे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय आर्यन शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार

October 29th, 10:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीमध्ये रोहिणी येथे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय आर्यन शिखर परिषदेत दुपारी पावणेतीन वाजता सहभागी होणार आहेत. ही परिषद महर्षी दयानंद सरस्वती जी यांची 200 वी जयंती आणि आर्य समाजाच्या सामाजिक सेवाकार्याची 150 वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित ज्ञानज्योती महोत्सवाचा भाग असणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांशी संवाद देखील साधतील.

छठ पूजेच्या संध्या अर्घ्य विधीसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

October 27th, 02:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना छठ पूजेच्या संध्या अर्घ्य विधीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

नहाय-खाय या पवित्र विधीने झालेल्या छठ महापर्वाच्या शुभारंभाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

October 25th, 09:06 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ महापर्वाच्या पवित्र प्रसंगी जगभरातील आणि देशभरातील भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत, ज्या महापर्वाची आज पारंपरिक ‘नहाय-खाय’(स्नानादि कर्मे) या पारंपरिक विधीने सुरुवात झाली. सर्व व्रतींच्या अढळ भक्तिभावाला पंतप्रधानांनी अभिवादन केले आहे आणि या चार दिवसांच्या उत्सवाचे सखोल सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले आहे.

छठ महोत्सवानिमित्त भक्तिगीते पाठविण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन

October 24th, 10:39 am

देशभरात पवित्र छठ महोत्सवाच्या तयारीला उत्साहाचे स्वरूप आले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना श्रद्धा आणि सांस्कृतिक ऐक्याच्या भावनेने छठी आईला अर्पण केलेली भक्तिगीते सामायिक करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

October 20th, 09:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाच्या राष्ट्रपतींसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत केलेले निवेदन

October 14th, 01:15 pm

मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे सहा वर्षांनंतर भारतात आगमन होणे ही एक विशेष बाब आहे. भारत आणि मंगोलिया आपल्या राजनैतिक संबंधांची 70 वर्ष तसेच धोरणात्मक भागीदारीची 10 वर्षे साजरी करत असताना ही भेट होत आहे. या निमित्ताने आम्ही आमचा सामायिक वारसा, वैविध्य आणि घनिष्ठ नागरी संबंधांचे प्रतीक म्हणून एक संयुक्त टपाल तिकीट जारी केले आहे.

पंतप्रधानांनी सर्वांना सौख्य लाभण्यासाठी देवी मातेची प्रार्थना केली

September 29th, 09:43 am

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी मातेला मनःपूर्वक वंदन केले आहे आणि सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी तिला दैवी आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी देवी मातेची प्रार्थना केली, सर्वांसाठी शक्ती आणि कल्याणाचे वरदान मागितले

September 28th, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देवी मातेच्या चरणी मनःपूर्वक नमन केले आणि देशाकरिता दैवी आशिर्वादांचे साकडे घातले. आध्यात्मिक उत्साह आणि सामूहिक सद्भावनेने भरलेल्या संदेशात, पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी, धैर्यासाठी आणि आंतरिक सामर्थ्यासाठी प्रार्थना केली.