नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 18th, 04:44 pm
मी गेल्या वर्षीच नॉर्वेच्या दौऱ्यावर येणार होतो, मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तो दौरा मला स्थगित करावा लागला. त्या कठीण कालखंडात नॉर्वेने दहशतवादाविरोधात भारतासोबत खंबीरपणे उभे राहून खऱ्या मैत्रीची प्रचिती दिली. आज नॉर्वेमध्ये आलेलो असताना, त्या वेळी दाखवलेल्या एकजुटीबाबत मी मनापासून आभार व्यक्त करतो.स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणि स्केटिंगमध्ये जागतिक विजेता म्हणून पहिला भारतीय होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या आनंदकुमार वेलकुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 16th, 08:47 am
स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये पुरुषांच्या वरिष्ठ गटात 1000 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आनंदकुमार वेलकुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. त्याची जिद्द, वेग आणि उत्साहामुळे तो स्केटिंगमध्ये भारताचा पहिला जागतिक विजेता बनला आहे. त्याची कामगिरी असंख्य तरुणांना प्रेरणा देईल, असे पंतप्रधान म्हणाले.