79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
August 15th, 03:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. त्यांचे हे भाषण 103 मिनिटांचे असून लाल किल्ल्यावरील सर्वात जास्त काळ चाललेले आणि महत्त्वाचे भाषण ठरले. या भाषणात, त्यांनी 2025 पर्यंत विकसित भारतासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्णता, आणि नागरिकांचे सक्षमीकरण यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकेकाळी दुसऱ्यांवर अवलंबून असलेला देश, आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने भरलेला, तंत्रज्ञानाने प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण
August 15th, 07:00 am
स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा... भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो वाळवंटी भाग असो, किंवा हिमालयाची शिखरे असोत, सागर किनारे असोत, किंवा दाट लोकसंख्येचे भाग, प्रत्येक भागातून एकच आवाज घुमत आहे, एकच जयघोष आहे, आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय मातृभूमीचे जयगान आहे …भारतात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा
August 15th, 06:45 am
79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना घटना समिती, स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली. भारत नेहमीच आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्याच्या उद्देशाने GST सुधारणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि सुदर्शन चक्र मिशन या प्रमुख उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंचायत सदस्य आणि ड्रोन दीदी सारख्या विशेष अतिथींनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला हजेरी लावली.अंतराळ संशोधनावरील (स्पेस एक्सप्लोरेशन) जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलेले संबोधन
May 07th, 12:00 pm
ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (अंतराळ संशोधन परिषद) 2025 मध्ये आपल्या सर्वांबरोबर सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. अंतराळ हा केवळ एक टप्पा नसून, जिज्ञासा, साहस आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. भारताचा अंतराळ प्रवास याच भावनेचे प्रतिबिंब आहे. 1963 मध्ये एक छोटे रॉकेट प्रक्षेपित करण्यापासून ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्यापर्यंतचा आमचा प्रवास उल्लेखनीय आहे. आमची रॉकेट केवळ पेलोडच नव्हे तर एक अब्ज चाळीस कोटी भारतीयांची स्वप्ने सोबत घेऊन जातात. भारताची कामगिरी हे एक महत्वाचे वैज्ञानिक यश आहे. शिवाय मानवी आकांक्षा गुरुत्वाकर्षणाचा प्रतिरोध करू शकते, याचा हा पुरावा आहे. भारताने 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचून इतिहास रचला होता. चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी सहाय्य केले. चांद्रयान-2 ने आपल्याला चंद्राची सर्वाधिक रिझोल्यूशनची (स्पष्ट) छायाचित्र पाठवली. चांद्रयान -3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत आपल्याला अधिक माहिती पुरवली. आम्ही विक्रमी वेळेत क्रायोजेनिक इंजिन तयार केले. आम्ही एकाच मोहिमेत 100 उपग्रह प्रक्षेपित केले. आम्ही आमच्या प्रक्षेपण वाहनां द्वारे 34 देशांचे 400 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यावर्षी आम्ही दोन उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले, जे एक मोठे पाऊल आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला केले संबोधित
May 07th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला संबोधित केले. जगभरातील प्रतिष्ठित प्रतिनिधी, वैज्ञानिक आणि अंतराळवीरांचे त्यांनी स्वागत केले. GLEX 2025 मध्ये त्यांनी भारताचा उल्लेखनीय अंतराळ प्रवास अधोरेखित केला. ते म्हणाले की, अंतराळ हे केवळ एक गंतव्यस्थान नाही तर कुतूहल, धैर्य आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे.The World This Week on India
April 22nd, 12:27 pm
From diplomatic phone calls to groundbreaking scientific discoveries, India’s presence on the global stage this week was marked by collaboration, innovation, and cultural pride.श्रीहरीकोटा येथे इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरे लाँच पॅड स्थापित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
January 16th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरे लाँच(प्रक्षेपण) पॅड स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली.अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले इस्रोचे अभिनंदन
January 16th, 01:36 pm
अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि संपूर्ण अंतराळ संशोधन समुदायाचे अभिनंदन केले आहे.आगामी काळात भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.केरळमध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
February 27th, 12:24 pm
केरळचे राज्यपाल श्री आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन जी, राज्यमंत्री, माझे सहकारी श्री वी. मुरलीधरन जी, इस्रो परिवारातील सर्व सदस्य, यांना माझा नमस्कार!केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) पंतप्रधानांनी दिली भेट
February 27th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळातील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) ला भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील एसएलव्ही इंटिग्रेशन फॅसिलिटी (पीआयएफ); महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये नवीन ‘सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज टेस्ट सुविधा’; आणि तिरुवनंतपुरम येथील व्हीएसएससीमध्ये ‘ट्रायसोनिक विंड टनल’ हे ते तीन प्रकल्प आहेत.15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 23rd, 03:30 pm
पंधराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे भव्य आयोजन आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल मी माझे प्रिय मित्र राष्ट्रपति रामाफोसा यांचे पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.PM Modi interacts with the Indian community in Paris
July 13th, 11:05 pm
PM Modi interacted with the Indian diaspora in France. He highlighted the multi-faceted linkages between India and France. He appreciated the role of Indian community in bolstering the ties between both the countries.The PM also mentioned the strides being made by India in different domains and invited the diaspora members to explore opportunities of investing in India.केंद्र-राज्य विज्ञान परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 10th, 10:31 am
21व्या शतकात भारताच्या विकासात विज्ञान ही एक उर्जा आहे ज्यात प्रत्येक क्षेत्रात विकासाला, प्रत्येक राज्याच्या विकासाला मोठा वेग देण्याचं सामर्थ्य आहे. आज जेव्हा भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, तर त्यात भारताची विज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित लोकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. अशा परिस्थितीत धोरणकर्त्यांचे, शासन - प्रशासनाशी संबंधित लोकांची जबाबदारी आणखीनच वाढते. मला आशा आहे, अहमदाबाद सायंस सिटी मध्ये होत असलेले हे विचार मंथन, आपल्याला एक नवी प्रेरणा देईल, विज्ञानाला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात उत्साह जागवेल.PM inaugurates ‘Centre-State Science Conclave’ in Ahmedabad via video conferencing
September 10th, 10:30 am
PM Modi inaugurated the ‘Centre-State Science Conclave’ in Ahmedabad. The Prime Minister remarked, Science is like that energy in the development of 21st century India, which has the power to accelerate the development of every region and the development of every state.10 जून रोजी पंतप्रधान देणार गुजरातला भेट
June 08th, 07:23 pm
येत्या 10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी 10:15 च्या सुमारास नवसारी येथे 'गुजरात गौरव अभियानात' विविध विकासकामांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. त्यानंतर अंदाजे 12:15 वाजता ते नवसारीमध्येच ए.एम.नाईक आरोग्यसेवा संकुलाचे आणि निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. नंतर अंदाजे दुपारी 3:45 वाजता अहमदाबादमध्ये बोपाल येथे आयएन-एसपीएसीइ म्हणजे इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरच्या मुख्यालायचेही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.पंतप्रधानांनी, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
May 11th, 09:29 am
1998 मध्ये पोखरण चाचण्या यशस्वी होऊ शकल्या त्या आपल्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञ आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.गुजरातमध्ये 11व्या क्रीडा महाकुंभच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 12th, 06:40 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल जी, माझे संसदेतील सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील जी, गुजरात सरकारमधील क्रीडा राज्यमंत्री हर्ष संघवी जी, संसदेतील माझे सहकारी हसमुख भाई पटेल जी. , नरहरी अमीन आणि अहमदाबादचे महापौर किरीट कुमार परमार जी, इतर मान्यवर आणि गुजरातच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे तरुण मित्र!11 व्या खेळ महाकुंभाचे उद्घाटन झाल्याची पंतप्रधानांनी केली घोषणा
March 12th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे 11 व्या खेळ महाकुंभाची सुरुवात करून दिली. याप्रसंगी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
August 29th, 11:30 am
आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण
June 16th, 04:00 pm
या व्यासपीठातून फ्रान्सची तंत्रज्ञानविषयक दूरदृष्टी प्रतिबिंबित होते. भारत आणि फ्रान्स विविध विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत. त्यापैकी तंत्रज्ञान आणि डिजिटल ही सहकार्याची उदयोन्मुख क्षेत्रे आहेत. हे सहकार्य असेच पुढे वाढत राहणे ही काळाची गरज आहे. यामुळे केवळ आपल्या देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला मदत होईल.