सेशेल्सच्या अध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
June 28th, 02:02 pm
त्यांच्याकडून गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या पुरस्काराने सन्मानित होणे हा माझ्यासाठी आणि 140 कोटी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या सन्मानाचा मी विनम्रतेने स्विकार करत असताना तो त्या सर्व देशांना समर्पित करत आहे जे हवामान बदलाच्या आव्हानाशी लढत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाला भावी पिढ्यांप्रति आपली जबाबदारी मानत आहेत.फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा
June 14th, 09:32 pm
भारत-फ्रान्स नवोन्मेष मार्गदर्शक आराखडा 2030 स्वीकारलापंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत अधिकृत द्विपक्षीय चर्चा
June 14th, 08:37 pm
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली. द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या बाबतीत सर्वच पैलुंवर झालेली प्रगती आणि वाढलेल्या व्याप्तीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच संरक्षण विषयक मंच आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत संयुक्त डिझाईन, सह विकास, आणि सह उत्पादनावर भर देत हे सहकार्य अधिक वृद्धींगत करण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अंतराळ क्षेत्रातील परस्पर सहकार्याचा समृद्ध वारसा अधोरेखित केला. यासोबतच मानवी अंतराळ मोहीमा आणि अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता या क्षेत्रातील सहकार्य अधिक विस्तारण्याबाबतही चर्चा केली. अंतराळ क्षेत्राशी संबंधित खाजगी क्षेत्राच्या भागिदारीचा विस्तार करण्याच्या पर्यायांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात, भारताच्या शांती कायद्यामुळे लहान आणि प्रगत मॉड्युलर रिएक्टर्ससह सहकार्याच्या नवीन संधी निर्माण झाल्या असल्याची दखलही दोन्ही नेत्यांनी घेतली.युवा नेतृत्वाखालील विकास आणि बळकट नवोन्मेष परिसंस्थेला चालना देण्यासाठी सरकारच्या भक्कम प्रयत्नांवर पंतप्रधानांचा भर
June 13th, 11:44 am
युवा नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी सरकार ठामपणे कार्यरत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. गेल्या 12 वर्षांतील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील युवकांनी आपल्या आकांक्षांचा आत्मविश्वासाने पाठपुरावा करत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याचे त्यांनी नमूद केले. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आणि अटल इनोव्हेशन मिशन यांसारख्या उपक्रमांमुळे नवोन्मेष, उद्योजकता आणि उद्योगशीलतेला प्रोत्साहन देणारी सक्षम परिसंस्था विकसित झाली आहे, असे मोदी यांनी सांगितले. आज भारत हा जगातील आघाडीच्या स्टार्टअप केंद्रांपैकी एक बनला असून, या यशोगाथांपैकी अनेक आपल्या युवा शक्तीकडून लिहिल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या यशोगाथा लहान शहरे आणि गावांमधूनही घडत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.PM shares a Sanskrit Subhashitam highlighting that Nari Shakti is the cornerstone of nation-building and the true embodiment of power
June 12th, 12:39 pm
PM Modi shared a Sanskrit Subhashitam highlighting Nari Shakti as the cornerstone of nation-building and the true embodiment of power. Reflecting on 12 years of women-led development, he noted the growing role of women across sectors such as financial inclusion, entrepreneurship, education, healthcare, sanitation, housing, science, innovation and governance.नॉर्वे-भारत व्यापार आणि संशोधन शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 18th, 11:49 pm
नॉर्वे आणि भारताच्या व्यावसायिक आणि संशोधन समुदायांच्या दरम्यान आज येथे उपस्थित राहता मला अतिशय आनंद होत आहे. मला काही सहभागींचे म्हणणे ऐकण्याची संधी मिळाली, आणि त्यांचे विचार ऐकून आपल्या भागीदारीचा पाया अत्यंत मजबूत असल्याचा आत्मविश्वास मला मिळाला आहे.भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान झाले सहभागी
May 18th, 08:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओस्लो येथे भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेत सहभागी झाले. या शिखर परिषदेत महामहीम युवराज हाकोन आणि नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर देखील सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
May 18th, 08:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर यांच्यासोबत ओस्लो इथे द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि नॉर्वे यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून, पंतप्रधान स्टोर यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचे ओस्लो विमानतळावर आगमन झाल्यावर अत्यंत उत्साहाने स्वागत केले.लोक काँग्रेस आणि बीआरएसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत: पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये
May 15th, 07:56 am
पंतप्रधान मोदी 15-20 मे 2026 दरम्यान युएई (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रप्रमुखांची भेट घेतील आणि प्रमुख क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करतील. या दौऱ्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये स्वीडनमधील 'युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री' आणि ओस्लो येथील '3 री भारत-नॉर्डिक शिखर परिषद' यांमधील त्यांच्या सहभागाचा समावेश आहे.फिनलँडच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
March 05th, 11:55 am
फिनलँडचे राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती स्टुब्ब यांचे मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रपती स्टुब्ब हे केवळ एक प्रसिद्ध जागतिक नेतेच नाहीत, तर ते एक सन्माननीय विचारवंत आणि लेखक देखील आहेत.इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक चे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक
February 20th, 09:37 pm
नवी दिल्ली येथे 16-20 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भारत-एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक चे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.