कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती परिषद 2025 मध्ये पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
November 20th, 12:30 pm
ही सगळी उत्पादनं वाया जाणाऱ्या गोष्टींपासून बनवली आहेत साहेब. केळ्यांच्या शेतीमधील टाकाऊ गोष्टींपासून तयार केलेली ही उत्पादनं केळीच्या पिकाचं मूल्यवर्धन करणारी आहेत साहेबतामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
November 20th, 12:16 pm
तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना अभिवादन करुन पंतप्रधान मोदी यांनी केळी उत्पादनाचे निरीक्षण केले तसेच केळ्यांच्या वाया अवशेषांच्या वापराबद्दल चौकशी केली. शेतकऱ्याने सांगितले की तेथे मांडण्यात आलेल्या सर्व वस्तू म्हणजे केळी पिकाच्या वाया अवशेषांचे मूल्यवर्धन केलेली उत्पादने आहेत. ही उत्पादने भारतभरात ऑनलाईन पद्धतीने विकली जातात का असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारल्यानंतर शेतकऱ्याने होकार दिला. तो शेतकरी पुढे म्हणाला की, तो आणि त्याच्यासोबतचे शेतकरी एफपीओज म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यामातून तसेच व्यक्तिगत योगदानकर्ते म्हणून संपूर्ण तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करत आहेत. या शेतकऱ्यांची उत्पादने ऑनलाईन विकली जातात, निर्यात करण्यात येतात तसेच ही उत्पादने स्थानिक बाजारांमध्ये आणि देशभरातील सुपरमार्केट्समध्ये देखील उपलब्ध आहेत असे त्याने सांगितले. प्रत्येक एफपीओमध्ये किती लोक एकत्र काम करतात या पंतप्रधानांच्या प्रश्नावर, शेतकऱ्याने उत्तर दिले की साधारणतः एक हजार जण यात सहभागी असतात. त्याच्या उत्तराची नोंद घेत पंतप्रधानांनी विचारले की जमिनीच्या एका भागावर केवळ केळीची लागवड केली जाते की त्यामध्ये मिश्र पिके देखील घेतात. वेगवेगळी विशिष्ट उत्पादने हे वेगवेगळ्या भागांचे वैशिष्ट्य असून त्यांच्याकडे जीआय टॅग प्राप्त उत्पादने देखील आहेत.पंतप्रधानांचे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मधील भाषण
November 19th, 07:01 pm
व्यासपीठावर उपस्थित तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल मुरुगन जी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के. रामासामी जी, निरनिराळ्या कृषी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आलेले सर्व मान्यवर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधीवर्ग, माझे प्रिय शेतकरी बांधव आणि भगिनी तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासोबत सहभागी झालेले देशभरातील लाखो शेतकरी, त्यांनाही मी येथून वणक्कम म्हणतो, नमस्कार करतो आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांची आणि देशभरातून जमलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींची क्षमा मागतो. मला इथे येण्यासाठी जवळ जवळ एक तास उशीर झाला आहे, कारण मी आज पुट्टपर्थी इथे सत्य साई बाबांच्या कार्यक्रमात होतो, तिथला कार्यक्रम जरा जास्त वेळ लांबला, त्यामुळे मला यायला उशीर झाला, तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, मला दिसते आहे की देशभरातील अनेक लोक इथे थांबून आहेत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
November 19th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी सांगितले. हे शहर दक्षिण भारताच्या उद्योजकीय शक्तीचे एक ऊर्जा केंद्र असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. इथले वस्त्रोद्योग क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. कोईम्बतूरचे माजी खासदार सी.पी. राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती म्हणून देशाला मार्गदर्शन करत आहेत, यामुळे आता या शहराला आणखी महत्त्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा करणार दौरा
November 18th, 11:38 am
पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा दौरा करणार आहेत.