नवी दिल्लीत सोल लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 21st, 11:30 am

भूतानचे पंतप्रधान, माझे बंधू दाशो शेरिंग तोबगे जी, सोल बोर्डाचे अध्यक्ष सुधीर मेहता, उपाध्यक्ष हसमुख अढिया, उद्योग विश्वातील दिग्गज, जे आपल्या जीवनात, आपापल्या क्षेत्रात नेतृत्व देण्यात यशस्वी झाले आहेत, अशा अनेक मान्यवरांना मी येथे पाहात आहे आणि भविष्य ज्यांची प्रतीक्षा करत आहेत, अशा माझ्या युवा सहकाऱ्यांना देखील येथे पाहात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोल (SOUL) लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेच्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन

February 21st, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित येथे स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप (School of Ultimate Leadership - SOUL) कॉन्क्लेव्ह 2025 या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी परिषदेसाठी आलेल्या सर्व मान्यवर नेत्यांचे तसेच भविष्यातील उदयोन्मुख युवा नेत्यांचेही स्वागत केली. आपल्याला काही कार्यक्रम अतिशय आवडतात, आणि आजचा हा कार्यक्रम अशाच कार्यक्रमांपैकी एक असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत चांगल्या नागरिकांची जडणघडण गरजेची असते, त्याच प्रमाणे प्रत्येक क्षेत्रासाठी उत्कृष्ट नेतृत्वाची जडणघडण होणेही अत्यावश्यक असते असे मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक क्षेत्रासाठी उत्कृष्ट नेतृत्वाची जडणघडण होणे ही आजच्या काळाची गरज असल्याची बाबही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केली. त्यामुळेच स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप सारखा उपक्रम हा विकसीत भारताच्या विकासाच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले. सोल (SOUL) हे काही या संस्थेचे केवळ संक्षिप्त स्वरुपातील नाव नाही, तर या नावातून प्रतित होणारा आत्मा हा अर्थ, हा खऱ्या अर्थाने भारताच्या सामाजिक जीवनाचाही आत्मा असणार असल्याची बाब पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केली. SOUL या शब्दांत अतिशह सुंदरपणे आध्यात्मिक अनुभवाचे सारही सामावलेली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी सोल सोबत जोडल्या गेलेल्या सर्व भागधारकांना शुभेच्छा दिल्या. लवकरच गुजरातमधील गिफ्ट सिटी इथे सोलचे एक नवे, विस्तीर्ण प्रांगण - संकुल उभारले जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.