It is the need of the hour that we transform 'Vocal for Local' into a mass movement: PM Modi in Vadodara

May 11th, 06:15 pm

Addressing a special gathering during the inauguration of Sardardham Hostel in Vadodara, PM Modi said education, skill development and women’s empowerment are key to shaping India’s future workforce and entrepreneurial growth. Highlighting the impact of global economic challenges and the West Asia crisis, he urged citizens to support “Vocal for Local”, reduce dependence on imports, conserve foreign exchange and strengthen self-reliance through collective responsibility and everyday actions.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन

May 11th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा, गुजरात इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन केले. वडोदरा इथल्या सरदारधाममध्ये एका प्रतिष्ठित मेळाव्याला संबोधित करताना, ज्या दिवशी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला गेला, त्याच दिवशी शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाचा आध्यात्मिक स्मरणाशी असलेल्या शुभ योगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यावेळी डॉ. दुष्यंत आणि दक्षा पटेल संकुलाचे उद्घाटन, अध्यापन सहाय्य योजनेचा शुभारंभ तसेच अनेक शैक्षणिक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी या विविध उपक्रमांचे वर्णन तरुणांच्या भावी करिअरसाठी 'लाँचिंग पॅड्स' असे केले. काही तासांपूर्वी मी प्रभास पाटण येथे सोमनाथ अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि आता आपण इथे परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करत आहोत, हा समन्वय वारसा आणि प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाते याचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी बडोद्याला जाताना विमानातून सोमनाथ मंदिराचे टिपलेले विलोभनीय छायाचित्र केले सामायिक

May 11th, 05:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथहून बडोद्याला जात असताना विमानातून टिपलेले सोमनाथ मंदिराचे एक खास छायाचित्र सर्वांबरोबर सामायिक केले आहे. प्रभास पाटणच्या समुद्रकिनाऱ्यावर दिमाखात उभे असलेले सोमनाथ मंदिर हे भक्ती, इतिहास आणि आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे देदीप्यमान प्रतीक असल्याचे मोदी यांनी म्हणले आहे. या शाश्वत मंदिराने अमानुष हल्ले, आक्रमणे आणि शतकांचा काळ सोसला असूनही ते आजही तितक्याच भक्कमतेने उभे आहे. सोमनाथ प्रत्येक भारतीयाला शक्ती, धैर्य आणि नवी आशा देण्याचे कार्य करते, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोमनाथ येथे वायुसेनेच्या 'सूर्यकिरण' पथकाची थरारक प्रात्यक्षिक

May 11th, 04:13 pm

सोमनाथ अमृत महोत्सवाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय वायुसेनेच्या 'सूर्यकिरण' (Suryakiran Aerobatic Team) या चित्तथरारक हवाई कसरतींच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील सोमनाथ मंदिरात महापूजा आणि कुंभाभिषेक केला

May 11th, 03:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सोमनाथ मंदिरात महापूजा आणि कुंभाभिषेक केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात घेतले दर्शन

May 11th, 12:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

प्रभास पाटण, गुजरात येथील सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर

May 11th, 10:20 am

आज प्रभास पाटणचे हे पवित्र क्षेत्र एका अद्भुत तेजाने उजळून निघाले आहे. महादेवाचा हे साक्षात दर्शन, हे सौंदर्य, धरती आणि आसमंतातून झालेली पुष्पवृष्टी, भगव्या ध्वजांची ही छटा, कला, संगीत आणि नृत्याची अप्रतिम सादरीकरणे, वेदमंत्रांचा उच्चार, गर्भगृहात होणारा शिव पंचाक्षरीचा अखंड पाठ आणि या सर्वांसोबत सागराच्या लाटांचा जयघोष; असे वाटत आहे जणू ही सृष्टी एका सुरात बोलत आहे- जय सोमनाथ! जय-जय सोमनाथ!

PM Modi participates in Somnath Amrut Mahotsav, marking 75 years since the inauguration of the restored Somnath Temple, Gujarat

May 11th, 10:15 am

Addressing the Somnath Amrut Mahotsav at Somnath Temple, PM Modi described the 75th anniversary of the temple’s reconstruction as a milestone in Bharat’s civilisational journey and a symbol of India’s enduring spiritual consciousness. He said Somnath reflects the nation’s resilience, cultural continuity and unwavering faith, while also highlighting the importance of preserving heritage alongside development and modern progress.

गुजरातच्या जामनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींचे विशेष भाषण

May 10th, 09:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जामनगर, गुजरात येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. गुजरातच्या उल्लेखनीय विकास प्रवासाचा उल्लेख करत ते म्हणाले की, हा राज्य एकेकाळी केवळ मीठ उत्पादनासाठी ओळखले जाण्यापासून आता सेमीकंडक्टर्स, मेट्रो कोचेस, रेल्वे इंजिन, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि उदयोन्मुख विमान निर्मितीचे केंद्र बनले आहे. त्यांनी राज्याच्या निरंतर वाढीचे आणि प्रगतीचे श्रेय गुजरातची जनता आणि भाजप कार्यकर्त्यांना दिले.

पंतप्रधान 10 आणि 11 मे रोजी गुजरातच्या दौऱ्यावर

May 09th, 11:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 मे 2026 रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 10 मे रोजी उशिरा रात्री त्यांचे जामनगरमध्ये आगमन होईल. त्यानंतर, 11 मे रोजी सकाळी साधारण 10:15 वाजता पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होतील. तिथला कार्यक्रम आटोपून पंतप्रधान वडोदरासाठी रवाना होतील. संध्याकाळी साधारण 6 वाजता त्यांच्या हस्ते सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन होईल. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्वादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 11th, 12:00 pm

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, तडफदार युवा उपमुख्यमंत्री हर्ष संघवी जी, गुजरात सरकारमधील मंत्री जीतू भाई वाघाणी, अर्जून भाई मोढवाड़िया, डॉ प्रद्युम्न वाजा, कौशिक भाई वेकरिया, खासदार राजेश भाई, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत , त्यांनाही माझ्याकडूनही जय सोमनाथ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व ला केले संबोधित

January 11th, 11:41 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा काळ अद्भुत आहे, हे वातावरण अद्भुत आहे आणि हा सोहळा देखील अद्भुत आहे. एका बाजूला स्वतः भगवान शंकर आहेत तर दुसरीकडे हा महासागर, सूर्याच्या हजारो किरणांच्या साक्षीने मंत्रांच्या जयघोषात श्रद्धेची लाट आहे. या अतिशय पवित्र वातावरणात, भगवान सोमनाथांच्या सर्व भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच दैवी आणि भव्य अनुभूती देणारा झाला आहे. सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष या नात्याने आपल्याला सोमनाथ स्वाभिमान पर्व समारंभात सक्रिय सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण अतिशय भाग्यवान आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी 72 तास अखंड चाललेला ओंकाराचा जप आणि 72 तास चाललेले मंत्रांचे अखंड पठण याची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की काल संध्याकाळी वेदिक गुरुकुलातील हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हजारो ड्रोननी सोमनाथच्या हजारो वर्षांची गाथा साकार केली आणि आज 108 अश्वांसह मंदिरात शौर्य यात्रेचे आगमन झाले. मंत्र आणि भजन यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण हे शब्दातीत असून हा अनुभव केवळ काळच टिपू शकतो.

Prime Minister shares glimpses of his visit to Somnath

January 10th, 11:00 pm

PM Modi shared glimpses of his visit to Somnath in Gujarat, where he received a warm welcome from the people during #SomnathSwabhimanParv. Later, the PM participated in Omkar Mantra chanting and witnessed a drone show. He also chaired a meeting of the Shree Somnath Trust, reviewing various aspects related to infrastructure upgradation in the temple complex.

गुजरातमधील सोमनाथ येथे 10-11 जानेवारी रोजी सोमनाथ स्वाभिमान पर्वमध्ये पंतप्रधान होणार सहभागी

January 09th, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10-11 जानेवारी 2026 रोजी गुजरातमधील सोमनाथ येथे सोमनाथ स्वाभिमान पर्व मध्ये सहभागी होणार आहेत.10 जानेवारी रोजी म्हणजे उद्या रात्री 8 वाजता ते ओंकार मंत्र जपात सहभागी होतील. त्यानंतर सोमनाथ मंदिरात ड्रोन शो पाहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरात दौऱ्यावर

January 09th, 12:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरातला भेट देणार आहेत. सोमनाथ येथे पंतप्रधानांचे 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास आगमन होईल. पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित ओंकार मंत्रपठण कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतर सोमनाथ मंदिरातील ड्रोन शो बघतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राच्या एकत्रित भावनेला जागृत करणाऱ्या, सोमनाथ धामचे कालातीत माहात्म्य सांगणारे सुभाषित सामायिक केले

January 09th, 08:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र सोमनाथ धाम ला वंदन केले आणि राष्ट्राच्या एकत्रित भावनेला जागृत करणाऱ्या सोमनाथ धामचे कालातीत माहात्म्य सांगणारे सुभाषित सामायिक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभाबद्दल राष्ट्राला शुभेच्छा दिल्या

January 08th, 10:22 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभाबद्दल राष्ट्राला शुभेच्छा दिल्या असून गेल्या हजारो वर्षांपासून लाखो लोकांच्या हृदयात सोमनाथ मंदिराला जिवंत ठेवणाऱ्या कालातीत सांस्कृतिक भावनेचे स्मरण केले आहे.

गुजरात नगर विकास उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 27th, 11:30 am

मी दोन दिवस गुजरातमध्ये आहे. काल वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि आज सकाळी गांधीनगरला, मी जिथे जिथे गेलो तिथे असे वाटले की, देशभक्ती म्हणजे गर्जना करणारा सिंदूरिया सागर, सिंदूरिया सागराची गर्जना आणि फडकणारा तिरंगा ध्वज, लोकांच्या हृदयात मातृभूमीबद्दलचे अपार प्रेम, हे एक दृश्य होते, आणि हे फक्त गुजरातमध्येच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शरीर कितीही निरोगी असले तरी, जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर अस्वस्थ राहते. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.

गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

May 27th, 11:09 am

गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आज गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी शहरी विकास वर्ष 2005 ची 20 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून शहरी विकास वर्ष 2025 ला सुरुवात केली. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि गांधीनगरच्या त्यांच्या भेटीदरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जयघोष आणि फडकणारे तिरंगी ध्वज या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह त्यांना अनुभवायला मिळाला आहे. ही दृश्य संस्मरणीय असून, ही भावना केवळ गुजरातमध्येच नाही तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होती, असे ते म्हणाले.भारताने दहशतवादाचा काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दृढनिश्चयाने तो पूर्ण केला , असे पंतप्रधान म्हणाले.

गुजरातमधील दाहोद येथे विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 26th, 11:45 am

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, आमदार आणि इतर सर्व मान्यवर आणि दाहोदचे माझे प्रिय बंधू आणि भगिनी, कसे आहात आपण? जरा मोठय़ा आवाजात उत्तर द्या, आता दाहोदचा प्रभाव वाढला आहे. आज 26 मे आहे. 2014 मध्ये आजच्याच दिवशी मी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तिरंगा झेंडा हवा आहे, तुम्ही गुजरातच्या जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला आणि नंतर देशातील कोट्यवधी जनतेनेही मला आशीर्वाद देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावर मी दिवसरात्र देशवासीयांच्या सेवेत आहे. या वर्षांमध्ये देशाने असे निर्णय घेतले, जे अकल्पनीय होते, ते अभूतपूर्व आहेत. या वर्षांमध्ये देशाने अनेक दशकांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. आज देश निराशेच्या अंधारातून बाहेर येऊन श्रद्धेच्या प्रकाशात तिरंगा झेंडा फडकवत आहे.