भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीच्या द्विशताब्दी सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

January 23rd, 02:12 pm

आपण सगळेच आज एका विशेष समारंभात सहभागी झालो आहोत. भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेला हा सोहळा आणि या पावन सोहळ्यातील आपला सहभाग हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आजच्या या पावन दिनी सर्व संतांना माझे नमन. भगवान स्वामी नारायण यांच्या करोडो भक्तांना या द्विशताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाला केले संबोधित

January 23rd, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्‍य प्रणालीव्दारे संदेश सामायिक करत शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. आपण सर्वजण भगवान स्वामीनारायण यांच्या शिक्षापत्रीला 200 वर्षे पूर्ण होत असल्याचा, एक विशेष प्रसंग अनुभवत आहोत. हा द्विशताब्दी महोत्सव आणि या पवित्र क्षणांचा भाग होणे हा सर्वांसाठीच भाग्याचा प्रसंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संतांना वंदन केले, तसेच भगवान स्वामीनारायण यांच्या कोट्यवधी अनुयायांना द्विशताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्वादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 11th, 12:00 pm

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, तडफदार युवा उपमुख्यमंत्री हर्ष संघवी जी, गुजरात सरकारमधील मंत्री जीतू भाई वाघाणी, अर्जून भाई मोढवाड़िया, डॉ प्रद्युम्न वाजा, कौशिक भाई वेकरिया, खासदार राजेश भाई, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत , त्यांनाही माझ्याकडूनही जय सोमनाथ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व ला केले संबोधित

January 11th, 11:41 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा काळ अद्भुत आहे, हे वातावरण अद्भुत आहे आणि हा सोहळा देखील अद्भुत आहे. एका बाजूला स्वतः भगवान शंकर आहेत तर दुसरीकडे हा महासागर, सूर्याच्या हजारो किरणांच्या साक्षीने मंत्रांच्या जयघोषात श्रद्धेची लाट आहे. या अतिशय पवित्र वातावरणात, भगवान सोमनाथांच्या सर्व भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच दैवी आणि भव्य अनुभूती देणारा झाला आहे. सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष या नात्याने आपल्याला सोमनाथ स्वाभिमान पर्व समारंभात सक्रिय सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण अतिशय भाग्यवान आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी 72 तास अखंड चाललेला ओंकाराचा जप आणि 72 तास चाललेले मंत्रांचे अखंड पठण याची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की काल संध्याकाळी वेदिक गुरुकुलातील हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हजारो ड्रोननी सोमनाथच्या हजारो वर्षांची गाथा साकार केली आणि आज 108 अश्वांसह मंदिरात शौर्य यात्रेचे आगमन झाले. मंत्र आणि भजन यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण हे शब्दातीत असून हा अनुभव केवळ काळच टिपू शकतो.

Prime Minister shares glimpses of his visit to Somnath

January 10th, 11:00 pm

PM Modi shared glimpses of his visit to Somnath in Gujarat, where he received a warm welcome from the people during #SomnathSwabhimanParv. Later, the PM participated in Omkar Mantra chanting and witnessed a drone show. He also chaired a meeting of the Shree Somnath Trust, reviewing various aspects related to infrastructure upgradation in the temple complex.

गुजरातमधील सोमनाथ येथे 10-11 जानेवारी रोजी सोमनाथ स्वाभिमान पर्वमध्ये पंतप्रधान होणार सहभागी

January 09th, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10-11 जानेवारी 2026 रोजी गुजरातमधील सोमनाथ येथे सोमनाथ स्वाभिमान पर्व मध्ये सहभागी होणार आहेत.10 जानेवारी रोजी म्हणजे उद्या रात्री 8 वाजता ते ओंकार मंत्र जपात सहभागी होतील. त्यानंतर सोमनाथ मंदिरात ड्रोन शो पाहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरात दौऱ्यावर

January 09th, 12:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरातला भेट देणार आहेत. सोमनाथ येथे पंतप्रधानांचे 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास आगमन होईल. पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित ओंकार मंत्रपठण कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतर सोमनाथ मंदिरातील ड्रोन शो बघतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राच्या एकत्रित भावनेला जागृत करणाऱ्या, सोमनाथ धामचे कालातीत माहात्म्य सांगणारे सुभाषित सामायिक केले

January 09th, 08:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र सोमनाथ धाम ला वंदन केले आणि राष्ट्राच्या एकत्रित भावनेला जागृत करणाऱ्या सोमनाथ धामचे कालातीत माहात्म्य सांगणारे सुभाषित सामायिक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभाबद्दल राष्ट्राला शुभेच्छा दिल्या

January 08th, 10:22 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभाबद्दल राष्ट्राला शुभेच्छा दिल्या असून गेल्या हजारो वर्षांपासून लाखो लोकांच्या हृदयात सोमनाथ मंदिराला जिवंत ठेवणाऱ्या कालातीत सांस्कृतिक भावनेचे स्मरण केले आहे.