It is the need of the hour that we transform 'Vocal for Local' into a mass movement: PM Modi in Vadodara
May 11th, 06:15 pm
Addressing a special gathering during the inauguration of Sardardham Hostel in Vadodara, PM Modi said education, skill development and women’s empowerment are key to shaping India’s future workforce and entrepreneurial growth. Highlighting the impact of global economic challenges and the West Asia crisis, he urged citizens to support “Vocal for Local”, reduce dependence on imports, conserve foreign exchange and strengthen self-reliance through collective responsibility and everyday actions.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन
May 11th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा, गुजरात इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन केले. वडोदरा इथल्या सरदारधाममध्ये एका प्रतिष्ठित मेळाव्याला संबोधित करताना, ज्या दिवशी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला गेला, त्याच दिवशी शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाचा आध्यात्मिक स्मरणाशी असलेल्या शुभ योगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यावेळी डॉ. दुष्यंत आणि दक्षा पटेल संकुलाचे उद्घाटन, अध्यापन सहाय्य योजनेचा शुभारंभ तसेच अनेक शैक्षणिक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी या विविध उपक्रमांचे वर्णन तरुणांच्या भावी करिअरसाठी 'लाँचिंग पॅड्स' असे केले. काही तासांपूर्वी मी प्रभास पाटण येथे सोमनाथ अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि आता आपण इथे परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करत आहोत, हा समन्वय वारसा आणि प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाते याचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोमनाथ येथे वायुसेनेच्या 'सूर्यकिरण' पथकाची थरारक प्रात्यक्षिक
May 11th, 04:13 pm
सोमनाथ अमृत महोत्सवाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय वायुसेनेच्या 'सूर्यकिरण' (Suryakiran Aerobatic Team) या चित्तथरारक हवाई कसरतींच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील सोमनाथ मंदिरात महापूजा आणि कुंभाभिषेक केला
May 11th, 03:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सोमनाथ मंदिरात महापूजा आणि कुंभाभिषेक केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात घेतले दर्शन
May 11th, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.प्रभास पाटण, गुजरात येथील सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 11th, 10:20 am
आज प्रभास पाटणचे हे पवित्र क्षेत्र एका अद्भुत तेजाने उजळून निघाले आहे. महादेवाचा हे साक्षात दर्शन, हे सौंदर्य, धरती आणि आसमंतातून झालेली पुष्पवृष्टी, भगव्या ध्वजांची ही छटा, कला, संगीत आणि नृत्याची अप्रतिम सादरीकरणे, वेदमंत्रांचा उच्चार, गर्भगृहात होणारा शिव पंचाक्षरीचा अखंड पाठ आणि या सर्वांसोबत सागराच्या लाटांचा जयघोष; असे वाटत आहे जणू ही सृष्टी एका सुरात बोलत आहे- जय सोमनाथ! जय-जय सोमनाथ!PM Modi participates in Somnath Amrut Mahotsav, marking 75 years since the inauguration of the restored Somnath Temple, Gujarat
May 11th, 10:15 am
Addressing the Somnath Amrut Mahotsav at Somnath Temple, PM Modi described the 75th anniversary of the temple’s reconstruction as a milestone in Bharat’s civilisational journey and a symbol of India’s enduring spiritual consciousness. He said Somnath reflects the nation’s resilience, cultural continuity and unwavering faith, while also highlighting the importance of preserving heritage alongside development and modern progress.