पंतप्रधानांचे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मधील भाषण
November 19th, 07:01 pm
व्यासपीठावर उपस्थित तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल मुरुगन जी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के. रामासामी जी, निरनिराळ्या कृषी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आलेले सर्व मान्यवर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधीवर्ग, माझे प्रिय शेतकरी बांधव आणि भगिनी तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासोबत सहभागी झालेले देशभरातील लाखो शेतकरी, त्यांनाही मी येथून वणक्कम म्हणतो, नमस्कार करतो आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांची आणि देशभरातून जमलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींची क्षमा मागतो. मला इथे येण्यासाठी जवळ जवळ एक तास उशीर झाला आहे, कारण मी आज पुट्टपर्थी इथे सत्य साई बाबांच्या कार्यक्रमात होतो, तिथला कार्यक्रम जरा जास्त वेळ लांबला, त्यामुळे मला यायला उशीर झाला, तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, मला दिसते आहे की देशभरातील अनेक लोक इथे थांबून आहेत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
November 19th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी सांगितले. हे शहर दक्षिण भारताच्या उद्योजकीय शक्तीचे एक ऊर्जा केंद्र असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. इथले वस्त्रोद्योग क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. कोईम्बतूरचे माजी खासदार सी.पी. राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती म्हणून देशाला मार्गदर्शन करत आहेत, यामुळे आता या शहराला आणखी महत्त्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेच्या प्रारंभ प्रसंगी तसेच नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत विविध योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणीप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 11th, 12:30 pm
व्यासपीठावर विराजमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले राजीव रंजन सिंह जी, श्रीमान भागीरथ चौधरी जी, विभिन्न राज्यांचे मुख्यमंत्री, संसद सदस्य, आमदार, इतर महानुभाव आणि देशभरातून या कार्यक्रमात जोडले गेलेल्या माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो!!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील 35,440 कोटी रुपये खर्चाच्या दोन महत्त्वाच्या योजनांची सुरुवात
October 11th, 12:00 pm
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रातील 35,440 कोटी रुपये खर्चाच्या दोन महत्त्वाच्या योजनांचा प्रारंभ केला.यावेळी त्यांनी 24,000 कोटी रुपये खर्चाची पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सुरु केली. तसेच त्यांनी 11,440 कोटी रुपये खर्चाचे डाळींच्या क्षेत्रातील आत्मनिर्भरता अभियान देखील सुरु केले. पंतप्रधानांनी कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय तसेच अन्न प्रक्रिया या क्षेत्रांतील 5,450 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करून त्यांचे लोकार्पण देखील केले आणि सुमारे 815 कोटी रुपये खर्चाच्या अतिरिक्त प्रकल्पांची पायाभरणी केली.डाळींच्या उत्पादनातील आत्मनिर्भरता अभियानाला केंद्रिय मंत्रीमंडळाची मान्यता
October 01st, 03:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रिय मंत्रीमंडळाने डाळींमधील आत्मनिर्भरता अभियानाला मंजूरी दिली आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणारे आणि डाळींच्या उत्पादनातील स्वयंपूर्णतेच्या उद्देशाने सुरू केलेले हे एक महत्त्वाचे अभियान आहे. 2025-26 ते 2030-31 या सहा वर्षांच्या कालावधीत 11,440 कोटी रुपये खर्चाचे हे अभियान राबविले जाईल.नवी दिल्ली इथे एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेतले पंतप्रधानांचे संबोधन
August 07th, 09:20 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी शिवराज सिंह चौहान जी, एम एस स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ सौम्या स्वामिनाथन जी,नीती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद जी,स्वामिनाथन जी यांच्या कुटुंबातले सर्व जण इथे उपस्थित असलेले मी पाहत आहे, त्यांनाही माझा नमस्कार.सर्व वैज्ञानिक, इतर मान्यवर आणि महिला आणि पुरुषहो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
August 07th, 09:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक द्रष्टे होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. प्राध्यापक स्वामिनाथन हे एक थोर शास्त्रज्ञ होते ज्यांनी विज्ञानाला लोकसेवेचे माध्यम बनवले असे ते म्हणाले. राष्ट्राला अन्नसुरक्षा बहाल करण्यासाठी प्राध्यापक स्वामिनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे त्यांनी अधोरेखित केले. प्राध्यापक स्वामिनाथन यांनी एक अशी चेतना निर्माण केली जी भारताच्या पुढील अनेक शतकांच्या धोरणांमध्ये आणि प्राधान्यक्रमांमध्ये झळकत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. एम.एस.स्वामीनाथन शताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये दिलेले उत्तर
February 04th, 07:00 pm
आदरणीय राष्ट्रपति जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्यासाठी मी उपस्थित आहे. काल आणि आज,काल तर रात्री उशिरापर्यंत सर्व माननीय खासदारांनी आपले विचार मांडून हा आभार प्रस्ताव समृद्ध केला. अनेक माननीय अनुभवी खासदारांनीही आपले विचार व्यक्त केले आणि हे स्वाभाविक आहे, लोकशाहीची परंपराही आहे, जिथे आवश्यक होते तिथे प्रशंसा झाली, जिथे व्यथा जाणवली तिथे काही नकारात्मक गोष्टीही मांडल्या गेल्या आणि हे अतिशय स्वाभाविक आहे ! अध्यक्ष जी माझे मोठे भाग्य आहे की देशातल्या जनतेने मला या स्थानावर बसून राष्ट्रपती जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्याची 14 वेळा संधी दिली आणि म्हणूनच आज जनता जनार्दनाचेही अतिशय आदराने मी आभार मानतो आणि सदनातल्या चर्चेत जे-जे सदस्य सहभागी झाले,चर्चा समृद्ध केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत निवेदन
February 04th, 06:55 pm
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन केले. काल आणि आज झालेल्या चर्चेत सहभागी झालेल्या संसद सदस्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. लोकशाहीच्या परंपरेत जिथे आवश्यकता आहे तिथे कौतुकाची थाप आणि गरज असेल तिथे काही कानपिचक्या देणारी वक्तव्ये चर्चेत येणे साहजिक असल्याचे पंतप्रधान भाषणात म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शनाची संधी जनतेने चौदाव्यांदा देणे हा मी माझा सन्मान समजतो असे सांगून त्यांनी नागरिकांचेही आभार मानले आणि चर्चेत सहभागी झालेल्यांनी त्यांच्या विचारांनी आभारप्रस्तावाला नवी उंची गाठून दिली अशी टिप्पणी त्यांनी केली.शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला आणि स्वयंपूर्णतेसाठी अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी कृषीउन्नती योजनेला (KY) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 03rd, 09:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व केंद्र पुरस्कृत योजना (CSS) चे दोन छत्री योजनांमध्ये-पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम-आरकेव्हीवाय) आणि कृषीउन्नती योजना मध्ये सुसूत्रीकरण करण्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.वर्ष 2024-25 ते 2030-31 साठी ‘राष्ट्रीय खाद्यतेल - तेलबिया अभियान’ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 03rd, 09:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय खाद्यतेल (एनएमईओ) - तेलबिया अभियानाला मंजुरी दिली आहे. देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देणे आणि खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता (आत्मनिर्भर भारत) साध्य करण्याच्या उद्देशाने हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे . 2024-25 ते 2030-31 या सात वर्षांच्या कालावधीत 10,103 कोटी रुपये खर्चासह या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.सहकार क्षेत्रातील महत्वाच्या विविध उपक्रमांचा शिलान्यास तसेच उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 24th, 10:36 am
भारताच्या अमृत यात्रेमध्ये आज ‘भारत मंडपम्‘ विकसित आणखी एका मोठ्या कामगिरीचा साक्षीदार बनत आहे. ‘सहकार से समृद्धी’ म्हणजेच सहकारातून समृद्धीचा संकल्प देशाने केला आहे, तो साकार करण्याच्या दिशेने आज आपण आणखी पुढे जात आहोत. शेती आणि शेती व्यवसाय यांचा पाया भक्कम करण्यामध्ये सहकारी क्षेत्राच्या शक्तीची खूप मोठी भूमिका आहे. याचा विचार करून आम्ही स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली. आणि आता याच विचारातून आजचा हा कार्यक्रम होत आहे. आज आम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना सुरू केली आहे. या अंतर्गत देशातील काना-कोप-यामध्ये हजारों कृषीमाल गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. आज 18 हजार ‘पॅक्स’ च्या संगणकीकरणाचे एक मोठे काम पूर्ण झाले आहे. या सर्व कामांमुळे देशामध्ये कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांचा आणखी विस्तार होणार आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाने जोडले जाणार आहे. तुम्हां सर्वांचे या महत्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणा-या या कार्यक्रमांसाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. तसेच अनेक -अनेक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी
February 24th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 11 राज्यांमधल्या 11 प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये (पीएसीएस) उभारल्या जाणाऱ्या 'सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजने'च्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या उपक्रमांतर्गत गोदामे आणि इतर कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी देशभरात अतिरिक्त 500 प्राथमिक कृषी पतसंस्थाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या गोदामांना अन्न पुरवठा साखळीमध्ये विनासायास समाविष्ट करणे, अन्न सुरक्षा मजबूत करणे तसेच नाबार्डद्वारे समर्थित आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) नेतृत्वाखालील सहकार्याने देशातील आर्थिक विकासाला चालना देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ), कृषी विपणन पायाभूत सुविधा (एएमआय) अशा सध्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या तसेच छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सहकार से समृद्धी या सरकारच्या संकल्पनेला अनुसरून, देशभरातील 18,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण करण्याच्या प्रकल्पाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले.तेलंगणातील करीमनगर येथील सुशिक्षित शेतकऱ्याने संमिश्र शेतीचा दृष्टिकोन अवलंबत आपले उत्पन्न केले दुप्पट
January 18th, 03:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.PM Narendra Modi addresses public meetings in Pali & Pilibanga, Rajasthan
November 20th, 12:00 pm
Amidst the ongoing election campaigning in Rajasthan, PM Modi’s rally spree continued as he addressed public meetings in Pali and Pilibanga. Addressing a massive gathering, PM Modi emphasized the nation’s commitment to development and the critical role Rajasthan plays in India’s advancement in the 21st century. The Prime Minister underlined the development vision of the BJP government and condemned the misgovernance of the Congress party in the state.India & Greece have a special connection and a relationship spanning centuries: PM Modi
August 25th, 09:30 pm
PM Modi addressed the Indian community at Athens Conservatoire, in Athens. In his address, PM Modi emphasized the unprecedented transformation that India is currently undergoing and the strides being made in various sectors. He lauded the success of the Chandrayaan mission. Prime Minister highlighted the contribution of the Indian community in Greece in advancing the multi-faceted India-Greece relations and urged them to be a part of India’s growth story.Prime Minister’s interaction with the Indian Community in Athens
August 25th, 09:00 pm
PM Modi addressed the Indian community at Athens Conservatoire, in Athens. In his address, PM Modi emphasized the unprecedented transformation that India is currently undergoing and the strides being made in various sectors. He lauded the success of the Chandrayaan mission. Prime Minister highlighted the contribution of the Indian community in Greece in advancing the multi-faceted India-Greece relations and urged them to be a part of India’s growth story.पंतप्रधानांनी सिकर, राजस्थान येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन/पायाभरणी प्रसंगी केलेले भाषण
July 27th, 12:00 pm
राजस्थानचे राज्यपाल श्रीमान कलराज मिश्र जी, केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंहजी तोमर, अन्य सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, आमदार आणि अन्य सर्व मान्यवर, तसेच आज या कार्यक्रमात देशातील लाखो ठिकाणांहून कोट्यवधी शेतकरी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मी राजस्थानच्या भूमीतून देशातील त्या कोट्यवधी शेतकऱ्यांनाही नमन करतो. राजस्थानातील माझे प्रिय बंधू-भगीनीही आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत.राजस्थानमध्ये सिकर येथे पंतप्रधानांकडून विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 27th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये सिकर येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये 1.25 लाखांपेक्षा जास्त पीएम किसान समृद्धी केंद्रे(पीएमकेएसके), सल्फरचा थर दिलेल्या युरिया गोल्ड या युरियाच्या नव्या खत उत्पादनाचे उद्घाटन, 1600 कृषी उत्पादन संघटनांच्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) वर ऑनबोर्डिंग, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(पीएम-किसान) अंतर्गत 8.5 कोटी लाभार्थ्यांना 17,000 कोटी रुपयांच्या 14व्या हप्त्याचे वितरण, चितोडगड, धोलपूर, सिरोही, सिकर आणि श्री गंगानगर येथे 5 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन, बरन, बुंदी, करौली, झुनझुनु, सवाई माधोपूर. जैसलमेर आणि टांक या 7 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी, उदयपूर, बंसवारा, परतापगढ आणि डुंगरपूर या जिल्ह्यांमध्ये 6 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे उद्घाटन आणि तिवरी, जोधपूर येथे केंद्रीय विद्यालयाचे उद्धाटन यांचा समावेश होता.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
February 09th, 02:15 pm
राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होऊन मी आदरणीय राष्ट्रपतीजींचे आदरपूर्वक आभार मानतो. आदरणीय राष्ट्रपतीजींचे अभिनंदन करतो. आदरणीय सभापतीजी, दोन्ही सदनांना संबोधित करत त्यांनी विकसित भारताची रुपरेषा आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी एक पथदर्शक आराखडा सादर केला आहे.