बंगळुरू येथील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांच्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 10th, 11:05 am
आजची ही सकाळ एक वेगळीच अनुभूती घेऊन आली आहे. मुलांच्या वैदिक मंत्रांनी झालेले स्वागत, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जींची 70 वर्षे आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ची 45 वर्षे; हे असे क्षण आहेत जे माझ्या स्मरणात कायम राहतील. या अद्भुत सोहळ्यात मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी
May 10th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक मधील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी झाले. हा सोहळा म्हणजे मंगलमय प्रसंग असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. सोहळ्याच्या आजच्या दिवशी सकाळी मुलांनी गायलेले वैदिक मंत्र, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जी यांचे 70 वे वर्ष आणि आर्ट ऑफ लिविंगच्या स्थापनेचा 45 वा वर्धापन दिन, अशा अनेक सुखद घडामोडींमुळे आजची सकाळ समृद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. हे क्षण सदैव आपल्या स्मरणात राहतील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.गुजरातमध्ये मायक्रॉन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 28th, 02:45 pm
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा,अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर, उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेनंतर आजआपण येथे आणखी एका ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार बनत आहोत. एआय परिषदेने जगाला भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेची ओळख करून दिली, आजचादिवस हा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाच्या वचनबद्धतेचा आणखीएक वस्तुपाठ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्ट अँड पॅकेजिंग (एटीएमपी) सुविधेचे उद्घाटन
February 28th, 02:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन एटीएमपी (असेंब्ली, टेस्ट, मार्किंग आणि पॅकेजिंग) सुविधेचे उद्घाटन केले. व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात हा जागतिक तंत्रज्ञानातील नेतृत्वाच्या दिशेने भारताच्या प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा आहे.पंतप्रधानांनी जेरुसलेम येथील तंत्रज्ञान प्रदर्शनाला दिली भेट
February 26th, 10:37 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह विविध क्षेत्रांमधील अग्रगण्य इस्रायली नवोपक्रमांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात कृषी-तंत्रज्ञान, जल-तंत्रज्ञान, हवामान-तंत्रज्ञान, आरोग्य-बायोटेक, स्मार्ट मोबिलिटी, एआय, सायबरसुरक्षा आणि क्वांटम तंत्रज्ञानात विशेष कार्य करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आणि संशोधन संस्थांचा समावेश होता.Uttar Pradesh is set to emerge as a major hub for the nation’s Semiconductor Ecosystem: PM Modi
February 21st, 05:30 pm
PM Modi participated in the groundbreaking ceremony of HCL-Foxconn Semiconductor Unit in Uttar Pradesh. Speaking via VC, he lauded the ceremony as a historic milestone in India’s journey toward becoming a global semiconductor hub. He remarked that India has accelerated its pace in 2026 and highlighted major milestones such as Viksit Bharat Young Leaders Dialogue, National Startup Day and India Energy Summit. The PM credited the Double-Engine Government for changing the identity of Uttar Pradesh.पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर युनिटच्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले सहभागी
February 21st, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर युनिटच्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. नवी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटच्या अनुषंगाने हा समारंभ म्हणजे जागतिक सेमीकंडक्टर हब बनण्याच्या भारताच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे.Congress has always followed the formula of divide and get power: PM Modi
October 09th, 01:09 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi laid the foundation stone for various development projects in Maharashtra worth over Rs 7600 crore via video conference today. The projects of today include the foundation stone laying of the upgradation of Dr Babasaheb Ambedkar International Airport, Nagpur and the New Integrated Terminal Building at Shirdi Airport. Shri Modi also launched the operationalization of 10 Government Medical Colleges in Maharashtra and inaugurated the Indian Institute of Skills (IIS), Mumbai and Vidya Samiksha Kendra (VSK) of Maharashtra.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली
October 09th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात सुमारे 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्कील्स(IIS), मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र (VSK) यांचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले.कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषद 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
December 12th, 05:20 pm
आणि यामुळेच या शिखर परिषदेची जोडल्या गेलेल्या प्रत्येक देशावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. मागच्या काही दिवसात मला अनेक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांशी भेटण्याची संधी मिळाली मी त्यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये सुद्धा या शिखर परिषदेविषयी चर्चा केली आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ते च्या प्रभावाखालून सध्याच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्या असे कोणीच सुटू शकणार नाही. आपल्याला खूपच सतर्क राहून आणि खूपच सावधानता बाळगून वाटचाल करावी लागणार आहे.आणि यासाठी मी समजतो की या शिखर परिषदेतून पुढे येणारे विचार या परिषदेतून मिळणाऱ्या सूचना संपूर्ण मानव जातीसाठी जे मूलभूत मूल्य आहे त्याचे संरक्षण करणे आणि त्याला योग्य दिशा देण्याचे काम करेल.पंतप्रधानांच्या हस्ते कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचे (जीपीएआय) उद्घाटन
December 12th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे (जीपीएआय) उद्घाटन केले. पंतप्रधानांनी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रदर्शनाचाही आढावा घेतला. जीपीएआय हा 29 सदस्य देशांसह एक बहु-हितधारक उपक्रम आहे. एआय संबंधित प्राधान्यक्रमांवरील अत्याधुनिक संशोधन आणि उपयोजित उपक्रमांना समर्थन देऊन एआय वरील सिद्धांत आणि सराव यांच्यातील अंतर कमी करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. वर्ष 2024 मध्ये भारत ‘ जीपीएआय’चे अध्यक्षस्थान भूषवेल.सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 27th, 10:56 am
सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांची भेट होणे हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव आहे. 21 व्या शतकात वेगाने बदलणाऱ्या जगात या कार्यक्रमात कोट्यवधी लोकांचे भाग्य बदलण्याची क्षमता आहे. एक काळ होता जेव्हा आपण भविष्याच्या गोष्टी करत असू, तर त्याचा अर्थ पुढचे दशक, किंवा 20-30 वर्षांनंतरचा काळ, किंवा मग पुढचे शतक असा असायचा. मात्र, आज प्रत्येक दिवशी तंत्रज्ञानात वेगाने होत जाणाऱ्या परिवर्तनामुळे आपण म्हणतो, ‘भविष्य आता इथेच अवतरले आहे.’पंतप्रधानांच्या हस्ते सातव्या भारत मोबाईल काँग्रेस(आयएमसी) चे उद्घाटन
October 27th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सातव्या भारत मोबाईल काँग्रेस 2023 संमेलनाचे उद्घाटन केले. भारत मोबाईल काँग्रेस (आयएमसी) या आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञानविषयक मंचाचे ‘जागतिक डिजिटल नवोन्मेष’ या संकल्पनेवर आधारित संमेलन 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. महत्त्वाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासक, उत्पादक आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान बळकट करणे हे या आयएमसी2023 च्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘5जी युज केस प्रयोगशाळां’ची देणगी दिली.With 5G, India is setting a global standard in telecom technology: PM Modi
October 01st, 07:06 pm
Ushering in a new technological era, PM Modi launched 5G services during 6th India Mobile Congress at Pragati Maidan in New Delhi. He said, New India will not remain a mere consumer of technology, but India will play an active role in the development and implementation of that technology.PM Modi inaugurates 6th India Mobile Congress at Pragati Maidan, New Delhi
October 01st, 12:05 pm
Ushering in a new technological era, PM Modi launched 5G services during 6th India Mobile Congress at Pragati Maidan in New Delhi. He said, New India will not remain a mere consumer of technology, but India will play an active role in the development and implementation of that technology.गुजरातमध्ये 11व्या क्रीडा महाकुंभच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 12th, 06:40 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल जी, माझे संसदेतील सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील जी, गुजरात सरकारमधील क्रीडा राज्यमंत्री हर्ष संघवी जी, संसदेतील माझे सहकारी हसमुख भाई पटेल जी. , नरहरी अमीन आणि अहमदाबादचे महापौर किरीट कुमार परमार जी, इतर मान्यवर आणि गुजरातच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे तरुण मित्र!11 व्या खेळ महाकुंभाचे उद्घाटन झाल्याची पंतप्रधानांनी केली घोषणा
March 12th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे 11 व्या खेळ महाकुंभाची सुरुवात करून दिली. याप्रसंगी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 06th, 05:17 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी, श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, श्री सुभाष देसाई जी, या विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एस. बी. मुजुमदार जी, मुख्य संचालिका डॉ विद्या येरवडेकर जी, सर्व प्राध्यापक वृंद, विशेष अतिथि आणि माझ्या युवा मित्रांनो !पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
March 06th, 01:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले.त्यांनी सिम्बॉयसिस आरोग्य धामचेही उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादी
October 09th, 03:54 pm
डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादी