UDF and LDF are causing double damage by encouraging fundamentalist forces and engaging in corruption: PM Modi
April 02nd, 05:00 pm
PM Modi interacted with BJP karyakartas across Keralam under the “Mera Booth Sabse Mazboot” initiative, energising grassroots organisation and expressing confidence that the state is ready for a historic political shift. Extending greetings to the people of Keralam, he noted that the ongoing election campaign reflects a strong wave in favour of BJP-NDA.PM Modi interacts with BJP Karyakartas from Keralam under “Mera Booth Sabse Mazboot” campaign
April 02nd, 04:30 pm
PM Modi interacted with BJP karyakartas across Keralam under the “Mera Booth Sabse Mazboot” initiative, energising grassroots organisation and expressing confidence that the state is ready for a historic political shift. Extending greetings to the people of Keralam, he noted that the ongoing election campaign reflects a strong wave in favour of BJP-NDA.पंतप्रधानांकडून संस्कृत सुभाषित सामायिक; डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामींना वाहिली आदरांजली.
April 01st, 10:37 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील स्वामीजींचे अतुलनीय योगदान राष्ट्राच्या प्रत्येक पिढीला निस्वार्थ सेवेसाठी प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांना वाहिली आदरांजली
April 01st, 10:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते करुणा, नम्रता आणि मानवतेसाठी अखंड सेवाभावाचे मूर्तिमंत रूप म्हणून लोकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. स्वामीजींनी आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या उत्थानासाठी समर्पित केले. खरे मोठेपण हे दुसऱ्यांच्या सेवेतच असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अतुलनीय असून समाजावर त्याचा कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे, असे मोदी यांनी नमूद केले. शिक्षण, सामाजिक कल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे समाजावर दीर्घकालीन ठसा उमटला आहे.आजही त्यांचे जीवन असंख्य व्यक्तींना निःस्वार्थीपणा आणि सेवाभावाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे.मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
February 08th, 08:35 am
गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी माझी मलेशिया भेट होऊ शकली नव्हती. परंतु, मी माझ्या मित्राला लवकरच मलेशियात येण्याचे आश्वासन दिले होते.India Malaysia Joint Statement on the occasion of the Official visit by Prime minister of India to Malaysia
February 08th, 08:30 am
At the invitation of Prime Minister of Malaysia, His Excellency, Dato’ Seri Anwar Ibrahim, His Excellency, Shri Narendra Modi, Prime Minister of the Republic of India, undertook an official visit to Malaysia from 7 to 8 February 2026. The visit reflected the deep-rooted friendship and enduring people-to-people ties, based on civilizational connections between the two countries. It reaffirmed the shared commitment of the two Leaders to further consolidate and expand the India–Malaysia Comprehensive Strategic Partnership.आव्हानात्मक जागतिक वातावरणात देशाची स्थिर प्रगती दर्शवणारे आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे 'सुधारणेच्या एक्सप्रेसचे सर्वसमावेशक चित्र’ असल्याचे पंतप्रधानांनी केले अधोरेखित
January 29th, 08:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाने भारताच्या 'सुधारणेच्या एक्सप्रेसचे सर्वसमावेशक चित्र’ सादर केले आहे. आव्हानात्मक जागतिक वातावरणातही देशाची स्थिर प्रगती या सर्व्हेक्षणातून दिसून येते. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, आर्थिक सर्व्हेक्षण मजबूत समग्र आर्थिक मूलभूत तत्त्वे, शाश्वत वाढीची गती आणि राष्ट्र उभारणीमध्ये नवोन्मेष, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांची वाढती भूमिका अधोरेखित करते. हे सर्वेक्षण सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व अधोरेखित करते, त्यामध्ये शेतकरी, एमएसएमई, युवा रोजगार आणि सामाजिक कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. हे उत्पादन मजबूत करण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि विकसित भारत बनण्याच्या दिशेने आपला प्रवास वेगवान करण्यासाठीचा आराखडा देखील मांडते, असे मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी सुभाषिताच्या माध्यमातून समाजकल्याणासाठी कल्याणकारी विचारांच्या शक्तीवर दिला भर
December 31st, 09:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या कल्याणासाठी कल्याणकारी विचारांच्या महत्त्वावर भर दिला आहे. मोदी यांनी अधोरेखित केले की, उदात्त हेतू आणि सकारात्मक संकल्पाची जोपासना केल्यास सर्व प्रयत्न यशस्वी होतात; वैयक्तिक सदाचार सामूहिक प्रगतीसाठी हातभार लावतो, हा शाश्वत संदेश त्यांनी पुन्हा दृढ केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
December 12th, 10:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आपले जीवन सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करणारे एक अनुभवी नेते, म्हणून त्यांचे वर्णन केले.अंतराळ संशोधनावरील (स्पेस एक्सप्लोरेशन) जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलेले संबोधन
May 07th, 12:00 pm
ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (अंतराळ संशोधन परिषद) 2025 मध्ये आपल्या सर्वांबरोबर सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. अंतराळ हा केवळ एक टप्पा नसून, जिज्ञासा, साहस आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. भारताचा अंतराळ प्रवास याच भावनेचे प्रतिबिंब आहे. 1963 मध्ये एक छोटे रॉकेट प्रक्षेपित करण्यापासून ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्यापर्यंतचा आमचा प्रवास उल्लेखनीय आहे. आमची रॉकेट केवळ पेलोडच नव्हे तर एक अब्ज चाळीस कोटी भारतीयांची स्वप्ने सोबत घेऊन जातात. भारताची कामगिरी हे एक महत्वाचे वैज्ञानिक यश आहे. शिवाय मानवी आकांक्षा गुरुत्वाकर्षणाचा प्रतिरोध करू शकते, याचा हा पुरावा आहे. भारताने 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचून इतिहास रचला होता. चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी सहाय्य केले. चांद्रयान-2 ने आपल्याला चंद्राची सर्वाधिक रिझोल्यूशनची (स्पष्ट) छायाचित्र पाठवली. चांद्रयान -3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत आपल्याला अधिक माहिती पुरवली. आम्ही विक्रमी वेळेत क्रायोजेनिक इंजिन तयार केले. आम्ही एकाच मोहिमेत 100 उपग्रह प्रक्षेपित केले. आम्ही आमच्या प्रक्षेपण वाहनां द्वारे 34 देशांचे 400 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यावर्षी आम्ही दोन उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले, जे एक मोठे पाऊल आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला केले संबोधित
May 07th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला संबोधित केले. जगभरातील प्रतिष्ठित प्रतिनिधी, वैज्ञानिक आणि अंतराळवीरांचे त्यांनी स्वागत केले. GLEX 2025 मध्ये त्यांनी भारताचा उल्लेखनीय अंतराळ प्रवास अधोरेखित केला. ते म्हणाले की, अंतराळ हे केवळ एक गंतव्यस्थान नाही तर कुतूहल, धैर्य आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनी केलेले भाषण
April 21st, 11:30 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी डॉ जितेंद्र सिंह जी, शक्तीकांत दास जी,डॉ. सोमनाथ जी, इतर वरिष्ठ अधिकारी वर्ग, देशभरातून जोडले गेलेले नागरी सेवेतील सर्व मित्र, महिला आणि सद्गृहस्थ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
April 21st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नागरी सेवकांना संबोधित केले. त्यांनी लोक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचे पंतप्रधान पुरस्कारदेखील प्रदान केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले आणि संविधानाचे 75 वे वर्ष आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती असल्याने या वर्षीच्या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. सरदार पटेल यांनी 21 एप्रिल1947 रोजी नागरी सेवकांना 'भारताची पोलादी चौकट' असे संबोधले होते. त्या संस्मरणीय संबोधनाची आठवण करून देताना, पंतप्रधान मोदी यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणारी आणि अत्यंत समर्पणाने देशाची सेवा करणारी सनदी सेवा, या सरदार पटेल यांच्या दृष्टिकोनावर भर दिला. विकसित भारत निर्माण करण्याच्या भारताच्या संकल्पाच्या संदर्भात त्यांनी सरदार पटेल यांच्या आदर्शांची प्रासंगिकता अधोरेखित केली आणि सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीला आणि वारशाला मनापासून अभिवादन केले.पंतप्रधानांनी दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधीमंडळाशी साधला संवाद
April 17th, 08:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानी दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधी मंडळाशी संवाद साधला.पीएम-सूरज पोर्टलच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 13th, 04:30 pm
सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमारजी, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले विविध सरकारी योजनांचे लाभार्थी, स्वच्छता कर्मचारी बंधू भगिनी, इतर मान्यवर, सभ्य स्त्री-पुरुषहो, देशातील 470 जिल्ह्यांतून जवळजवळ 3 लाख लोक आज या कार्यक्रमाशी थेट जोडले गेले आहेत. मी सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित घटकांना कर्जाचे पाठबळ देण्यासाठीच्या देशव्यापी संपर्क मोहिमे निमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
March 13th, 04:00 pm
मध्य प्रदेश मधील इंदूर येथील नरेंद्र सेन हे क्लाऊड कॉम्प्युटिंगशी संबंधित इंटरनेट कंपनीचे संस्थापक आहेत. सायबर कॅफेचा मालक, ते कोडिंग शिकणे आणि पुढे कंपनीचे संस्थापक होण्यापर्यंतचा आपला प्रवास त्यांनी पंतप्रधानांसमोर उलगडला. त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की सूक्ष्म-लघु-मध्यम (MSME) उद्योगांचे डिजिटलायझेशन करून त्यांचे सक्षमीकरण करणे, हे त्यांचे ध्येय आहे. दुसऱ्या नरेंद्रची कहाणी जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी हलक्याफुलक्या संवादा द्वारे केलेल्या विनंतीवर, सेन यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले की ते एका खेडेगावातील आहेत, पण त्यांच्या कुटुंबाने इंदूरला स्थलांतर केले, आणि वाणिज्य क्षेत्रातील पार्श्वभूमी असूनही त्यांना तंत्रज्ञानामध्ये खूप रस आहे. ते पुढे म्हणाले की नॅसकॉमच्या एका कार्यक्रमामधील पंतप्रधानांचे भाषण आणि भारतातील क्लाऊड गोदामाची मागणी, यामुळे त्यांना क्लाऊड कॉम्प्युटिंगवर काम करण्याची प्रेरणा मिळाली. “गावात बसलेल्या एका नरेंद्रला दुसऱ्या नरेंद्राकडून प्रेरणा मिळाली”, सेन म्हणाले. सरकारी स्तरावरील आव्हाने आणि मदतीबद्दल पंतप्रधानांनी विचारल्यावर सेन म्हणाले की त्यांच्या मदतीची विनंती तत्कालीन माहिती तंत्रज्ञान सचिवांनी मंजूर केली, ज्यामुळे भारतातील पहिले डेटा सेंटर पार्क विकसित झाले. सेन आणि इतर तरुणांनी स्टार्टअप्समध्ये रस घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली, तसेच त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
November 29th, 02:26 pm
हा एक ऐतिहासिक निर्णय असून या योजनेने जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनांमध्ये स्थान मिळवले आहे. या योजनेचे उद्दिष्ट 81.35 कोटी लोकांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे असून 5 वर्षांसाठी खर्च अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये आहे.पंतप्रधानांनी देशव्यापी महा-सायक्लोथॉनमधील सहभागीतांचे केले कौतुक
February 15th, 10:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रव्यापी महा-सायक्लोथॉन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांनी निरोगी जीवनाच्या महत्वाबाबत जनजागृती केल्याबद्दल कौतुक केले आहे.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
February 09th, 02:15 pm
राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होऊन मी आदरणीय राष्ट्रपतीजींचे आदरपूर्वक आभार मानतो. आदरणीय राष्ट्रपतीजींचे अभिनंदन करतो. आदरणीय सभापतीजी, दोन्ही सदनांना संबोधित करत त्यांनी विकसित भारताची रुपरेषा आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी एक पथदर्शक आराखडा सादर केला आहे.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिले उत्तर
February 09th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला उत्तर दिले. आपल्या अभिभाषणात ‘विकसित भारता’चे दर्शन सादर करत दोन्ही सभागृहांना मार्गदर्शन केल्याबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानून, पंतप्रधानांनी उत्तराची सुरुवात केली.