मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी
November 30th, 11:30 am
या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (127 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
October 26th, 11:30 am
अशा कठीण काळात सुमारे वीस वर्षांचा एक युवक या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. आज मी या तरुणाबद्दल एका खास कारणासाठी चर्चा करत आहे. त्याचे नाव उघड करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एकही शब्द बोलणे गुन्हा मानले जात असे, तेव्हा या तरुणाने सिद्दीकी नावाच्या निजामाच्या अधिकाऱ्याला उघडपणे आव्हान दिले. निजामाने सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचं पीक जप्त करण्यासाठी पाठवलं होते. परंतु अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीची हत्या केली. तो अटकेपासून स्वतः ला वाचवण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या जुलमी पोलिसांपासून सुटका करून घेऊन तो तरुण शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममध्ये पोहोचला.NDA freed Bihar from Naxalism and Maoist terror — now you can live and vote fearlessly: PM Modi in Begusarai
October 24th, 12:09 pm
Addressing a massive public rally in Begusarai, PM Modi stated, On one side, there is the NDA, an alliance with mature leadership, and on the other, there is the 'Maha Lathbandhan'. He highlighted that nearly 90% of purchases in the country are of Swadeshi products, benefiting small businesses. The PM remarked that the NDA has freed Bihar from Naxalism and Maoist terror, and that every vote of the people of Bihar will help build a peaceful, prosperous state.We’re connecting Bihar’s heritage with employment, creating new opportunities for youth: PM Modi in Samastipur
October 24th, 12:04 pm
Ahead of the Bihar Assembly elections, PM Modi kickstarted the NDA’s campaign by addressing a grand public meeting in Samastipur, Bihar. He said, “The trumpet of the grand festival of democracy has sounded. The entire Bihar is saying, ‘Phir Ek Baar NDA Sarkar!’” Remembering Bharat Ratna Jan Nayak Karpoori Thakur ji, the PM said, “It is only due to his blessings that people like us, who come from humble and backward families, are able to stand on this stage today.”PM Modi addresses enthusiastic crowds in Bihar’s Samastipur and Begusarai
October 24th, 12:00 pm
Ahead of the Bihar Assembly elections, PM Modi kickstarted the NDA’s campaign by addressing massive gatherings in Samastipur and Begusarai, Bihar. He said, “The trumpet of the grand festival of democracy has sounded. The entire Bihar is saying, ‘Phir Ek Baar NDA Sarkar!’” Remembering Bharat Ratna Jan Nayak Karpoori Thakur ji, the PM remarked, “It is only due to his blessings that people like us, who come from humble and backward families, are able to stand on this stage today.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.मुंबईतील वेव्हज परिषदमध्ये पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
May 01st, 03:35 pm
वेव्हज परिषदे मध्ये उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, एल. मुरुगन जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सृजनशील विश्वातील सर्व मान्यवर, विविध देशांतून आलेले माहिती, संवाद, कला आणि संस्कृती विभागांचे मंत्री, विविध देशांचे राजदूत, जगभरातील सृजनशील विश्वातील चेहरे, इतर मान्यवर, बंधूंनो आणि भगिनींनोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन
May 01st, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सृजनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. 100 हून अधिक देशांचे कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, प्रतिभा आणि सृजनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी एकत्र आले आहेत यावर त्यांनी भर दिला. वेव्हज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे, असे त्यांनी नमूद केले. ही शिखर परिषद चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचे प्रदर्शन करते, तसेच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रसंगी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि देश-विदेशातील मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत केले.विकसित भारत घडवण्यात योगदान देणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा.पंतप्रधानांनी केला गौरव
March 08th, 11:54 am
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोपवून भारतातील महिलांच्या अफाट योगदानाचा गौरव करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सकाळपासून आपल्याला कर्तुत्ववान महिलांच्या प्रेरणादायी पोस्ट दिसत आहेत. या पोस्ट त्यांचा स्वतःचा प्रवास सांगत आहेत आणि इतर महिलांना प्रेरणा देत आहेत, असे मोदी म्हणाले, त्यांचा दृढनिश्चय आणि यश आपल्याला महिलांमध्ये असलेल्या अमर्याद क्षमतेची जाणीव करून देते. आज आणि दररोज, आम्ही विकसित भारत घडवण्यात त्यांचे योगदान साजरे करतो, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोपविले यशस्वी महिलांना
March 08th, 11:26 am
महिला शक्ती आणि कामगिरीला सलाम म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या यशस्वी महिलांना सोपवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (119 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
February 23rd, 11:30 am
काही वर्षांपूर्वी कुणी विचार केला असेल की या क्षेत्रात स्टार्ट-अप आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल ? जीवनात काहीतरी रोमांचक आणि थरारक गोष्टी करू इच्छिणाऱ्या आपल्या युवकांसाठी अंतराळ क्षेत्र हा एक उत्तम पर्याय बनत आहे.परीक्षेचा ताण आणि भीती यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या आणि या संदर्भात सर्वोत्तम तज्ज्ञ असलेल्या परीक्षार्थी योद्ध्यांचे विचार ऐकूया : पंतप्रधान
February 17th, 07:41 pm
परीक्षेचा ताण आणि भीती यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या तरुण परीक्षार्थी योद्ध्यांचा समावेश असलेला,‘परीक्षा पे चर्चा 2025’ या कार्यक्रमाचा विशेष भाग 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या विद्यार्थ्यांचे अनुभव, अभ्यासाची रणनीती आणि परीक्षेचा ताण, चिंता यांचा सामना करून दबावाखाली देखील शांत राहण्याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार या भागात आपल्याला ऐकायला मिळतील.भारत टेक्स 2025 मधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 16th, 04:15 pm
आज, भारत मंडपम्, दुसऱ्या भारत टेक्स प्रदर्शनाच्या आयोजनाचा साक्षीदार होते आहे. त्यामध्ये आपल्या परंपरांसोबतच विकसित भारताच्या संधींचे दर्शन होते आहे. आपण ज्या रोपाचे बीज रोवले, ते आज वटवृक्ष होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, ही देशासाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. भारत टेक्स आता एक मोठा जागतिक कार्यक्रम बनू पाहातो आहे. यावेळी मूल्य साखळीची संपूर्ण श्रेणी, त्याच्याशी निगडीत 12 समूह एकाच वेळी इथे सहभागी होत आहेत. अक्सेसरीज, कपडे, यंत्रसामग्री, रसायने आणि रंग देखील यामध्ये प्रदर्शित केले जात आहेत. जगभरातले धोरणकर्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग नेतृत्वासाठी सगहभाग, सहकार्य आणि भागीदारीसाठी, भारत टेक्स हे मजबूत व्यासपीठ होत आहे. या आयोजनासाठी सर्वच भागदारांचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आहेत, या कामाशी निगडीत असलेल्या सर्व लोकांना मनपासून खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत टेक्स 2025 मंचाला केले संबोधित
February 16th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स 2025 या वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भरवलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. आपल्या संबोधनातून त्यांनी भारत टेक्स 2025 या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे स्वागत केले. हे या उपक्रमाचे दुसरे पर्व असून, भारत मंडपम हा यंदाच्या पर्वाचा साक्षीदार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या वारशाचे दर्शन तर घडलेच, आणि त्याच वेळी विकसित भारताच्या भवितव्याची झलकही पाहायला मिळली, आपल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. भारत टेक्स आता भव्य स्वरुपातील जागतिक वस्त्रोद्योग सोहळा झाला असल्याच्या शब्दांत पंतप्रधानांनी या उपक्रमाचे महत्व अधोरेखीत केले. मूल्यसाखळीच्या परिघाशी जोडलेल्या सर्व बारा घटकांचे प्रतिनिधी यंदाच्या उपक्रमात सहभागी झाले असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. या उपक्रमाच्या निमित्ताने उपयुक्त पुरक साधने , कपडे, यंत्रसामुग्री, रसायने आणि कापडांसाठीचे रंग या आणि अशा इतर घटकांचे प्रदर्शन भरवले असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत टेक्स हा उपक्रम जगभरातील धोरणकर्ते, या उद्योग क्षेत्रातील अग्रणी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरता परस्पर सहकार्य आणि भागिदारी प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने परस्परांसोबत जोडून घेण्यासाठीचा एक मजबूत मंच बनला असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक हितधारकाने केलेल्या प्रयत्नांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी घडवून आणली MEGA भारत-अमेरिका भागीदारी
February 14th, 06:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेला दिलेली भेट ही दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ होत असल्याचे प्रतिबिंबित करणारा एक महत्त्वाचा प्रसंग होता. त्यांच्या मुक्कामात, पंतप्रधान मोदींनी संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि मुत्सेद्दीगिरी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भात, अमेरिकेतील नेते, व्यापारी आणि भारतीय समुदायातील यांच्याशी हाय-प्रोफाइल गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या. या भेटीने भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंधांवर शिक्कामोर्तब झाले तसेच नवीन जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात दोन्ही देशांची जागतिक भागीदार म्हणून प्रतिमा निर्माण झाली .जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 13th, 12:30 pm
नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितिन गडकरी जी, जितेंद्र सिंह जी, अजय टम्टा जी, उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी जी, विरोधी पक्षनेता सुनील शर्मा जी, सर्व खासदार, आमदार आणि जम्मू-कश्मीर च्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन
January 13th, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, आव्हाने असूनही आपला संकल्प डगमगला नाही. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार आणि बांधिलकीचे तसेच काम पूर्ण करताना आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 7 मजुरांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.उद्योजक निखील यांच्यासमवेत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठीतील अनुवाद
January 10th, 02:15 pm
निखिल कामत – दर महिन्याला मी एक दिवस एक पॉडकास्ट करतो आणि उरलेला महिना काहीच करत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक निखिल कामत यांच्यासोबत साधला संवाद
January 10th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक आणि गुंतवणूकदार निखिल कामत यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. अतिशय मोकळेपणाने झालेल्या या संवादात त्यांना त्यांच्या बालपणाबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या काळातील अनुभव आणि उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्याशा शहराशी त्यांचे फार पूर्वीपासून असलेले संबंध अधोरेखित केले.. त्यांनी नमूद केले की, गायकवाड राज्यातील वडनगर हे गाव तलाव, पोस्ट ऑफिस आणि लायब्ररी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांसह शिक्षणाच्या बांधिलकीसाठी ओळखले जात होते. गायकवाड राज्य प्राथमिक शाळा आणि भागवताचार्य नारायणाचार्य हायस्कूलमधील शालेय दिवसांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. वडनगरमध्ये बराच काळ व्यतीत करणारा चिनी तत्ववेत्ता झुआंगझांग यांच्यावरील चित्रपटाबद्दल त्यांनी एकदा चिनी दूतावासाला कसे लिहिले याची एक मनोरंजक कथा त्यांनी सामाईक केली. त्यांनी 2014 मध्ये आलेल्या एका अनुभवाचाही उल्लेख केला, ज्यावेळी ते भारताचे पंतप्रधान झाले आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झु आंग झांग आणि त्यांच्या दोन मूळ शहरांमधील ऐतिहासिक संबंधाचा हवाला देत गुजरात आणि वडनगरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की हे बंध दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि मजबूत संबंधांना अधोरेखित करत आहेत.संविधान हा आपला मार्गदर्शक दीपस्तंभ: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
December 29th, 11:30 am
मित्रांनो, पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा !