आसाम राज्य स्थापनादिनानिमित्त पंतप्रधानांनी आसामच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
December 02nd, 03:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्य स्थापनादिनानिमित्त आसाममधील बंधु आणि भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वर्गदेव चाओलुंग सुकाफा यांचे स्वप्न पूर्ण करण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा आजचा दिवस आहे; असे मोदी म्हणाले. गेल्या काही वर्षांत, केंद्र आणि आसाममधील रालोआ सरकार आसामच्या प्रगतीला चालना देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 06th, 02:00 pm
तमिळनाडूचे राज्यपाल एन. रवि, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, तमिळनाडू सरकारचे मंत्री, खासदार, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन
April 06th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलै रोजी पंतप्रधान कारगिलला भेट देणार
July 25th, 10:28 am
25व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी सकाळी 9.20 च्या सुमारास कारगिल युध्द स्मारकाला भेट देऊन देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शिंकून ला या लष्करी बोगद्याच्या कामासाठी सुरुंगाची शुभारंभी वात लावली जाईल.नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र (आयईसीसी) संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 26th, 11:28 pm
माझ्या समोर एक अद्भुत दृश्य आहे. ते भव्य आहे, विराट आहे आणि विहंगम आहे. आणि आजचा हा जो प्रसंग आहे, त्यामागे जी कल्पना आहे आणि आपल्या डोळ्यांसमोर ते स्वप्न साकार होत असलेले पाहताना मला एका प्रसिद्ध कवितेतील ओळी गुणगुणाव्याशा वाटत आहेत :पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन
July 26th, 06:30 pm
पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी जी-20 नाणे आणि जी-20 टपाल तिकिटाचे अनावरण देखील केले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत ड्रोनच्या सहाय्याने या संमेलन केंद्राचे ‘भारत मंडपम’ असे नामकरण करण्यात आले तसेच या सोहळ्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेतून तसेच 2700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आलेले प्रगती मैदानावरील हे नवे आयईसीसी संकुल भारताला जागतिक व्यापार केंद्र म्हणून प्रसिध्द करण्यासाठी उपयुक्त ठरेल.रोजगार मेळावाअंतर्गत नव्याने भरती झालेल्यांना सुमारे 70000 नियुक्ती पत्रांचे वितरण करताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 13th, 11:00 am
स्वातंत्र्याचा अमृत काळ नुकताच सुरू झाला आहे. पुढल्या 25 वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य तुमच्यासमोर आहे. वर्तमानासोबतच देशाच्या उज्वल भविष्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करायचे आहेत. आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व युवकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो आणि खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला केले संबोधित
June 13th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि विविध सरकारी विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 70,000 जणांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. देशभरातून निवडलेले कर्मचारी वित्तीय सेवा विभाग, टपाल विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, रेल्वे मंत्रालय, लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग आणि गृह मंत्रालयासह विविध विभागांमध्ये सरकारमध्ये रुजू होतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान देशभरातील 43 ठिकाणे मेळाव्याशी जोडली गेली होती.गुवाहाटी येथील एम्स रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 14th, 12:45 pm
आसामचे राज्यपाल श्री गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया जी आणि डॉ. भारती पवार जी, आसाम सरकारचे मंत्री केशब महंता जी, वैद्यकीय जगतातील सर्व मान्यवर व्यक्ती, विविध ठिकाणांहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडलेले सर्व मान्यवर आणि आसामच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधानांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे 3400 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांची केली पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
April 14th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे 3400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आणि विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी एम्स गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी आसाम ऍडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोवेशन इन्स्टीट्युटची(AAHII) देखील पायाभरणी केली आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) कार्ड वितरित करून ‘आपके द्वार आयुष्मान’ या मोहिमेचा शुभारंभ केला.आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशा द्वारे केलेले संबोधन
April 04th, 09:46 am
आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. भारतामध्ये आपलं स्वागत आहे! सर्वात प्रथम, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी एकत्र आल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. पाचवी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषद, आयसीडीआरआय-2023 नक्कीच विशेष आहे.पंतप्रधानांनी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील 5व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
April 04th, 09:45 am
सारे जग एकमेकांशी जोडलेले असताना आपत्तींचा प्रभाव फक्त स्थानिक राहत नाही त्यामुळे जागतिक दृष्टीकोनातून सीडीआरआयची निर्मिती झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे, आपला प्रतिसाद एकाकी न ठेवता एकीकृत केला पाहिजे,असे ते म्हणाले. अवघ्या काही वर्षांत, प्रगत आणि विकसनशील देशांतील, लहान-मोठे, जगाच्या दक्षिण किंवा उत्तर भागातले 40 हून अधिक देश सीडीआरआयचा भाग बनले आहेत असे त्यांनी नमूद केले. सरकार व्यतिरिक्त, जागतिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि तज्ञ देखील यात सहभागी आहेत हे उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले.कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे आयोजित इंडिया एनर्जी वीक 2023 मध्ये पंतप्रधानांचे भाषण
February 06th, 11:50 am
आता या वेळी आपल्या सर्वांच्या नजरा तुर्कस्तानमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपाकडे लागल्या आहेत. अनेक लोक मृत्यूमुखी पडले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत. तुर्कस्तानच्या आजूबाजूच्या देशांमध्येही नुकसान होईल, अशी शक्यता आहे. भारतातील 140 कोटी जनतेची सहानुभूती या भूकंपग्रस्तांना आहे. या भूकंपग्रस्तांची सर्वतोपरी मदत करायला भारत तत्पर आहे.पंतप्रधानांच्या हस्ते बेंगळूरू येथे भारत उर्जा सप्ताह 2023 चे उद्घाटन
February 06th, 11:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरू येथे भारत उर्जा सप्ताह (आयईडब्ल्यू)2023 चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय तेल महामंडळाच्या ‘अनबॉटल्ड’उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या गणवेशांचे अनावरण केले. हे गणवेश पुनर्प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आले आहेत. भारतीय तेल महामंडळाद्वारे निर्मित अंतर्गत सौर कुकिंग प्रणालीच्या ट्वीन कुकटॉप मॉडेलचे देखील पंतप्रधानांनी लोकार्पण केले आणि या मॉडेलच्या व्यावसायिक पातळीवरील विक्रीचा प्रारंभ केला.पंतप्रधानांचे मुंबई येथे विकासकामांचा आरंभ आणि पीएम-स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजूर कर्ज हस्तांतरणाप्रसंगीचे भाषण
January 19th, 05:15 pm
आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी आज झाली आहे. मुंबईसाठी अत्यंत आवश्यक मेट्रो असो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं आधुनिकीकरणाचे काम असो, रस्त्यांच्या सुधारणांचा मोठा प्रकल्प असो आणि बाळासाहेब ठाकरे जी यांच्या नावानं 'आपला दवाखानाची' सुरुवात असो, हे मुंबई शहराला अधिक चांगले करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. थोड्या वेळापूर्वी मुंबईतल्या पदपथ फेरीवाल्यांच्या बँक खात्यात पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पैसे जमा झाले. या सर्व लाभार्थिंना आणि सर्व मुंबईकरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रात मुंबई येथे बहुविध विकास उपक्रमांच्या 38,800 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
January 19th, 05:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत बहुविध विकास उपक्रमांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या प्रकल्पांमध्ये, मुंबई मेट्रो रेल्वे 2A आणि 7 या मार्गांचे लोकार्पण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे आणि सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन, 20 ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन आणि मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्पाची पायाभरणी यांचा समावेश आहे.गोव्यात मोपा इथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 11th, 06:45 pm
गोव्याच्या जनतेचे आणि देशातील जनतेचे नव्याने उभारण्यात आलेल्या या दिमाखदार विमानतळासाठी खूप खूप अभिनंदन. गेल्या 8 वर्षात जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली आहे त्यावेळी मी एका गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. तुम्ही जे प्रेम, जे आशीर्वाद आम्हाला दिले त्याची मी व्याजासकट परतफेड करेन, विकास करून परतफेड करेन. हे आधुनिक एयरपोर्ट टर्मिनल त्याच प्रेमाची परतफेड करण्याचा एक प्रयत्न आहे. या विमानतळाला माझे प्रिय सहकारी आणि गोव्याचे लाडके, दिवंगत मनोहर पर्रिकर जी यांचे नाव देण्यात आले आहे, या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत आहे. आता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाच्या माध्यमातून पर्रिकरजींचे नाव या ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात राहील.PM inaugurates greenfield International Airport in Mopa, Goa
December 11th, 06:35 pm
PM Modi inaugurated Manohar International Airport, Goa. The airport has been named after former late Chief Minister of Goa, Manohar Parrikar Ji. PM Modi remarked, In the last 8 years, 72 airports have been constructed compared to 70 in the 70 years before that. This means that the number of airports has doubled in the country.