भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबूबक्र अहमद यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

February 16th, 08:16 pm

भारताचे ग्रँड मुफ्ती- शेख अबूबक्र अहमद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली. सामाजिक सौहार्द आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी आणि देशभरात शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी ग्रॅन्ड मुफ्ती करत असलेल्या कौतुकास्पद प्रयत्नांची पंतप्रधानांनी विशेष दखल घेतली.

भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद

January 03rd, 12:00 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन

January 03rd, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय सौहार्दासाठी एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत पंतप्रधानांनी क्रोधावर नियंत्रण मिळवण्याच्या आवश्यकतेवर दिला भर

December 12th, 09:07 am

क्रोधाचे विनाशकारी स्वरुप आणि वैयक्तिक कल्याण आणि एकत्रित प्रगती यासाठी अंतर्गत संयमाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक गहन संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला. एका प्राचीन संस्कृत श्लोकाला उद्धृत करत क्रोध कशा प्रकारे निर्णयक्षमता कमकुवत करतो, सामाजिक सौहार्द बिघडवतो आणि मानवाची क्षमता कमी करतो याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आहे.

भूतानमध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल पंतप्रधानांकडून भूतानच्या नेत्यांचे आणि नागरिकांचे कौतुक

November 09th, 03:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून भूतानमध्ये गेलेल्या बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल, भूतानच्या जनतेचे आणि नेत्यांचे मनापासून कौतुक केले. हे अवशेष शांतता, करुणा आणि सौहार्दाचा कालातीत संदेश देत असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले आहे. भगवान बुद्धांची शिकवण ही उभय राष्ट्रांच्या सामाईक आध्यात्मिक वारसातील पवित्र दुवा आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

“कायदेविषयक मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 08th, 05:33 pm

सरन्यायाधीश बी आर गवई जी, न्यायाधीश सूर्यकांत जी, न्यायाधीश विक्रम नाथ जी, केंद्रातील माझे सहकारी अर्जुन राम मेघवाल जी, सर्वोच्च न्यायालयातील अन्य माननीय न्यायाधीशगण, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशगण, स्त्री आणि पुरुषहो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “कायदेविषयक मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

November 08th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयात “कायदेविषयक मदत वितरण प्रणालींचे मजबुतीकरण” यावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की या महत्त्वाच्या प्रसंगी सर्व उपस्थितांमध्ये उपस्थित राहणे खरोखरच विशेष होते. कायदेविषयक मदत वितरण यंत्रणा आणि कायदेशीर सेवा दिनाशी संबंधित कार्यक्रम मजबूत केल्यास भारताच्या न्यायव्यवस्थेला नवीन बळकटी मिळेल, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी 20 व्या राष्ट्रीय परिषदेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवर, न्यायव्यवस्थेचे सदस्य आणि कायदेविषयक सेवा अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यूएईमध्ये अबू धाबी येथे बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 14th, 07:16 pm

श्री स्वामी नारायण जय देव, महामहिम शेख नाहयान अल मुबारक, पूज्य महंत स्वामी जी महाराज, भारत, यूएई आणि जगातील विविध देशातून आलेले अतिथीगण आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासोबत जोडले गेलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!

PM Modi inaugurates BAPS Hindu Mandir in Abu Dhabi, UAE

February 14th, 06:51 pm

Prime Minister Narendra Modi inaugurated the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi, UAE. The PM along with the Mukhya Mahant of BAPS Hindu Mandir performed all the rituals. The PM termed the Hindu Mandir in Abu Dhabi as a symbol of shared heritage of humanity.

स्वामी विवेकानंद यांनी 130 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शिकागो येथे केलेल्या भाषणाचे पंतप्रधानांनी केले स्मरण

September 11th, 03:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की 130 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म संसदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण आजदेखील जागतिक एकात्मता आणि सौहार्द राखण्यासाठीचे आवाहन म्हणून ध्वनित होत आहे.

रिपब्लिक टीव्ही कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधानांचे भाषण

April 26th, 08:01 pm

अर्णब गोस्वामी जी, रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सर्व सहकारी, रिपब्लिक टीव्हीचे देश-विदेशातील सर्व प्रेक्षक, महिला -पुरुषगण , माझे म्हणणे मांडण्यापूर्वी मला तुम्हाला माझ्या लहानपणी जो विनोद ऐकायचो, तो सांगायचा आहे. एक प्राध्यापक होते आणि त्यांच्या मुलीने आत्महत्या केली, मी जीवनाला कंटाळले आहे, मला जगायचे नाही, म्हणून मी कांकरिया तलावात उडी मारून जीव देईन अशा आशयाची चिट्ठी तिने लिहून ठेवली होती . सकाळी पाहिले की मुलगी घरात नाही. तेव्हा पलंगावर चिट्ठी बघून वडिलांना खूप राग आला. ते म्हणाले, मी प्राध्यापक आहे, इतकी वर्षे मी शिकवले, तरीही कांकरिया स्पेलिंग चुकीचं लिहून गेली आहे. असो, मला आनंद आहे की अर्णब उत्तम हिंदी बोलू लागले आहेत . ते काय म्हणाले मी ऐकले नाही, मात्र हिंदी बरोबर आहे की नाही, हे मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो आणि कदाचित मुंबईत राहिल्यामुळे तुम्ही हिंदी चांगले शिकले असावेत .

नवी दिल्लीत आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधानांनी केले संबोधित

April 26th, 08:00 pm

नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.

सीतापूरचे खासदार राजेश वर्मा यांनी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

February 22nd, 10:11 am

सीतापूर (उत्तर प्रदेश ) येथील लोकसभा खासदार राजेश वर्मा यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 03rd, 11:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

फाळणी दरम्यान प्राण गमावलेल्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

August 14th, 09:08 am

फाळणीच्या वेदना स्मृतिदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या दरम्यान ज्यांनी आपले प्राण गमावले, त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

March 17th, 12:07 pm

फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल आपणा सर्व युवा मित्रांना खूप-खूप शुभेच्छा ! आज होळीचा सण आहे. देशवासियांना,आपणा सर्वाना, अकादमीच्या लोकांना आणि आपल्या कुटुंबियांना होळीच्या खूप-खूप शुभेच्छा !आज आपल्या अकादमी द्वारे सरदार वल्लभभाई पटेल जी, लाल बहादूर शास्त्री जी यांना समर्पित टपाल प्रमाणपत्रेही जारी करण्यात आली आहेत. आज नव्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन आणि हॅपी व्हॅली कॉम्प्लेक्सचे लोकार्पणही झाले आहे. या सुविधा संघ भावना, आरोग्य आणि फिटनेसची भावना बळकट करतील, प्रशासकीय सेवा अधिक नेटक्या आणि प्रभावी करण्यासाठी सहाय्य करतील.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 17th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले. नव्या क्रीडा संकुलाचे त्यांनी उद्‌घाटन केले आणि पुनर्रचित हॅपी व्हाली कॉम्प्लेक्स राष्ट्राला अर्पण केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी कच्छ येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 08th, 06:03 pm

तुम्हा सर्वांना, देशातल्या सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी अनेकानेक शुभेच्छा देतो. आजच्या महिला दिनानिमित्त देशातल्या महिला संत आणि साध्वींच्यावतीने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कच्छ येथे आयोजित चर्चासत्रात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

March 08th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कच्छ येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राला संबोधित केले.

BJP Govt in UP means control over Dangaraaj, Mafiaraaj, Gundaraaj: PM Modi in Sitapur

February 16th, 03:46 pm

Amidst the ongoing election campaigning in Uttar Pradesh, PM Modi’s rally spree continued as he addressed a public meeting in Sitapur today. PM Modi paid tribute to Sant Ravidas Ji on the occasion of his birth anniversary, he said, “For decades, the devotees of Sant Ravidas ji demanded development of his birthplace, but previous governments came here during elections, took photographs and left. It is a matter of happiness for me that I am the MP of Kashi where Sant Ravidas ji was born. We are redeveloping Sant Ravidas Ji’s birthplace.”