Prime Minister Conferred with “Oliy Darajali Do’stlik” Order, Uzbekistan’s highest honour for foreign leaders

August 30th, 05:50 pm

PM Modi was conferred Uzbekistan’s highest honour for foreign leaders, the “Oliy Darajali Do’stlik” Order, in recognition of his contribution to strengthening friendship between India and Uzbekistan. Accepting the honour, he dedicated it to the 1.4 billion people of India and described it as a symbol of the enduring friendship and shared heritage between the two countries.

PM Modi calls on citizens to join the mission for a drug-free India in Mann Ki Baat

August 30th, 11:30 am

In this month’s Mann Ki Baat, PM Modi highlighted key events of August, including National Handloom Day, Independence Day and the Quit India Movement, along with upcoming festivals such as Janmashtami and Vishwakarma Puja, strengthening the resolve of patriotism and Vocal for Local. He also touched upon several important themes, including forest conservation, Indian history, cleanliness, women empowerment and more.

उझबेकिस्तानमधील युवा मित्रांच्या उत्साहाबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला

August 29th, 05:46 pm

उझबेकिस्तान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उझबेकिस्तान मधील तरुण मित्रांनी दाखवलेला उत्साह पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांचा हा उत्साह दर्शवणारा एक व्हिडिओ सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी हिंदी भाषेतून इतक्या सुंदररीत्या स्वतःला व्यक्त करताना पाहणे हृदयस्पर्शी होते.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

August 29th, 10:34 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले, खेळाडूंची समर्पण वृत्ती, निष्ठा, जिद्द आणि दृढनिश्चय यामुळे देशाची मान अभिमानाने उंचावते.

नॉर्वेचे राजे महामहीम हॅराल्ड पंचम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

August 28th, 04:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे राजे महामहीम हॅराल्ड पंचम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या वर्षाच्या सुरुवातीला नॉर्वेच्या दौऱ्यादरम्यान महामहीम राजांसमवेत झालेल्या भेटीचा आठवण काढत, मोदी यांनी त्यांच्यातील स्नेहभाव आणि नॉर्वेचे लोक आणि राष्ट्र यांच्याप्रती असलेली त्यांची निस्सीम सेवावृत्ती यांचे स्मरण केले.

पंतप्रधानांनी 7, लोक कल्याण मार्ग येथील रक्षाबंधन उत्सवाचे काही क्षण सामायिक केले

August 28th, 01:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7, लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या रक्षाबंधन उत्सवातील काही अविस्मरणीय क्षण सामायिक केले. हा सण लोकांमध्ये स्नेह आणि सौहार्दाचे बंध अधिक दृढ करो, तसेच सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, अशा शुभेच्छाही मोदी यांनी यावेळी दिल्या.

महात्मा अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

August 28th, 01:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा अय्यंकाली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.आपले जीवन वंचितांचे सक्षमीकरण आणि कल्याण यासाठी समर्पित करणाऱ्या महात्मा अय्यंकाली यांना मोदी यांनी सामाजिक न्यायाचे महान प्रणेते म्हणून स्मरले आहे. वंचितांना शैक्षणिक संधी मिळवून देणे, शेतमजुरांचे जीवनमान सुधारणे आणि गरिबांची सेवा करणे या त्यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी केला.

जनधन योजनेचा परिवर्तनकारक प्रभाव पंतप्रधानांनी केला अधोरेखित

August 28th, 12:12 pm

प्रधानमंत्री जनधन योजनेची गेल्या 12 वर्षांतील अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारक प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केला आहे. जनधन योजनेचा अतुलनीय प्रभाव पडला असून, या योजनेने आर्थिक समावेशन वाढवण्यात आणि देशभरातील लोकांना सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या रक्षा बंधनच्या शुभेच्छा

August 28th, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो, अशी सदिच्छा मोदी यांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या माध्यमातून साजरा केला जाणारा प्रेम, आपुलकी आणि परस्पर विश्वासाचा बंध सदैव मजबूत आणि अतूट राहो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली

पंतप्रधानांनी संरक्षणाच्या बंधनाचे महत्व सांगणारे संस्कृत सुभाषित शेअर केले

August 28th, 12:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रक्षा’, म्हणजेच संरक्षणाचे बंधन/धागा यामधील शुभ शक्ती आणि आशीर्वाद अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

जागतिक संस्कृत दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

August 28th, 12:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रावण पौर्णिमेनिमित्त 'जागतिक संस्कृत दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे ज्ञान, विचार आणि सर्जनशीलतेचे अखंड माध्यम राहिलेल्या संस्कृत भाषेच्या कालातीत समृद्धीचा आपण उत्सव साजरा करतो, असे मोदी यांनी नमूद केले आहे. या विशेष दिवशी, भारत आणि जगभरातील संस्कृत भाषेचा अभ्यास आणि अध्यापन करणाऱ्या, आणि या भाषेत सामावलेला कालातीत ठेवा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व लोकांची आपण प्रशंसा करतो, मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी परिश्रम, बुद्धिमत्ता आणि सदाचारावर भर देणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

August 27th, 11:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका श्रेष्ठ व गुणी समाजाच्या निर्मितीमध्ये बुद्धिमत्ता, परिश्रम आणि सदाचाराचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. हे सुभाषित प्रत्येकाने प्रकाश आणि ज्ञानाचा मार्ग अनुसरावा, आपल्या प्रयत्नांमध्ये सदैव दक्ष व ठाम रहावे आणि एका उन्नत व सुसंस्कृत समाजाच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेपाळच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून चर्चा

August 26th, 06:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधूभगिनींसोबत एकजुटीने उभी आहे, असे मोदी यांनी सांगितले.

दुसऱ्याचा आदर करून शिकण्यावर आणि ऐकून घेण्यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

August 26th, 10:05 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्याकडून शिकण्याच्या आणि ऐकून घेण्याच्या गुणवैशिष्ट्यांना अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. ते म्हणाले की, जे लोक एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि ऐकून घेण्यासाठी उत्सुक असतात, ज्ञानी लोकांकडून ज्यांची प्रशंसा केली जाते, जे व्यक्तिगत स्वार्थ आणि छुप्या हेतूंपासून मुक्त असतात, ते सर्वतोपरी आनंदाने समृद्ध होतात.

पंतप्रधानांनी दिल्या मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा

August 26th, 10:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मिलाद उन नबीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी दिल्या ‘ओणम्’ च्या शुभेच्छा

August 26th, 09:58 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम या सणाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम हा एक चैतन्यमय सण असून तो केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, असे मोदी यांनी सांगितले. हा सण समाजात आनंद, एकोपा आणि समृद्धीची भावना अधिक बळकट करो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य संगत आणि सुज्ञ सल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

August 25th, 11:09 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य संगतीचे आणि सुज्ञ सल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. या संदेशातून ज्ञानी व्यक्तींची संगत, उदात्त विचारांची चर्चा आणि निस्वार्थ मैत्री हे परिपूर्ण आणि शांततापूर्ण जीवनासाठी आवश्यक पाया आहेत, हा शाश्वत विचार मांडण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणा आणि समाधान यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले

August 24th, 08:08 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की करुणेमुळे स्वाभिमान प्राप्त होतो तर समाधानामुळे खरा आनंद मिळतो. या भावनेमुळे समाजातील सहकार्याचे आणि सौहार्द्राचे बंध अधिक दृढ होतात.

पंतप्रधानांनी निःस्वार्थ सेवा आणि समर्पण भावना अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

August 21st, 10:51 am

आपल्या क्षमतांचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी कसा करता येईल हे सातत्याने वाहणारा नदीचा प्रवाह आपल्याला शिकवतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. निःस्वार्थ सेवा, समर्पण आणि परोपकारी वृत्ती राष्ट्राला एक नवीन दिशा देते, असे त्यांनी म्हटले आहे.

Prime Minister pays homage to former Prime Minister Shri Rajiv Gandhi

August 20th, 10:41 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to former Prime Minister, Shri Rajiv Gandhi, on the occasion of his birth anniversary.