प्रमिलाताई मेढे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

July 31st, 07:28 pm

राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका राहिलेल्या प्रमिलाताई मेढे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त शोक व्यक्त केला आहे. त्यांचे अनुकरणीय जीवन भावी पिढ्यांसाठी, विशेषतः सर्वसमावेशक सामाजिक विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ असल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.