आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
September 11th, 08:51 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे आणि भारताच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले.आंध्र प्रदेशातील अमरावती येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि प्रकल्पांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 02nd, 03:45 pm
आंध्र प्रदेशचे राज्यपाल सैयद अब्दुल नजीर जी, मुख्यमंत्री आणि माझे मित्र चंद्राबाबू नायडू जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी मंत्री, उत्साही उप-मुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारचे मंत्री, सर्व खासदार आणि आमदार आणि आंध्र प्रदेशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशात अमरावती येथे, 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांची केली पायाभरणी आणि उद्घाटन
May 02nd, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात अमरावती येथे 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. अमरावतीच्या या पवित्र भूमीवर उभे राहून, आपल्याला केवळ एक शहर दिसत नाही, तर एक स्वप्न साकार होताना दिसत आहे—एक नवीन अमरावती, एक नवीन आंध्र, अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. अमरावती ही एक अशी भूमी आहे जिथे परंपरा आणि प्रगती या परस्परांसोबत वाटचाल करतात, बौद्ध वारशाची शांतता आणि एका विकसित भारताची ऊर्जा या दोहोंचा अंगिकार केला जातो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे, ते प्रकल्प केवळ काँक्रीटच्या संरचना नाहीत, तर आंध्र प्रदेशच्या आकांक्षा आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीकोनाचा मजबूत पाया आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान वीरभद्र, भगवान अमरलिंगेश्वर आणि तिरुपती बालाजी यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनाही शुभेच्छा दिल्या.For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.'एक भारत, श्रेष्ठ भारत' ची भावना आपल्या देशाला बळकट करते: पंतप्रधान मोदी 'मन की बात'मध्ये
March 26th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आम्ही अशा हजारो लोकांची चर्चा केली आहे, जे इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. अनेक लोक असे असतात की आपल्या कन्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण निवृत्तीवेतन पणाला लावतात, काही जण आपली सारी कमाई पर्यावरण आणि इतरांच्या जीव सेवेसाठी समर्पित करून टाकतात. आमच्या देशात परमार्थाला इतक्या उच्च स्थानी ठेवलं आहे की इतरांच्या सुखासाठी लोक आपलं सर्वस्व अर्पण करायला मागेपुढं पाहात नाहीत. यासाठी तर आम्हाला लहानपणापासून राजा शिबी आणि दधीच ऋषी यांच्यासारख्या देह दान करणाऱ्यांच्या कथा ऐकवल्या जातात.हरियाणातील फरिदाबाद इथे अमृता रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 24th, 11:01 am
अमृता रुग्णालयाच्या रूपाने आपल्या सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या माता अमृतानंदमयी जी यांना मी वंदन करतो. स्वामी अमृतास्वरूपानंद पुरी जी, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, कृष्णपाल जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनीनो,पंतप्रधानांनी फरीदाबाद येथे केले अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन
August 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फरीदाबाद येथे अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौताला, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर, माता अमृतानंदमयी उपस्थित होते.जुनागडमधील गठिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिनानिमित्त राम नवमीला होणाऱ्या सोहोळ्याला पंतप्रधान संबोधित करणार
April 09th, 04:33 pm
राम नवमीनिमित्त उद्या 10 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील जुनागड येथील गठिला परिसरात होणाऱ्या उमिया माता मंदिराच्या 14व्या स्थापना दिन सोहोळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.सूरत इथल्या सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर रोजी भूमीपूजन
October 14th, 02:33 pm
गुजरातच्या सूरत इथल्या सौराष्ट्र पटेल सेवा समाजाने बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे (मुलांचे वसतिगृह) भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या म्हणजेच, 15 ऑक्टोबर रोजी, सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.निर्यातदार आणि बँकांना सहाय्य पुरवण्यासाठी ईसीजीसी लिमिटेड अर्थात निर्यात पत हमी महामंडळ मर्यादितमध्ये पाच वर्षात 4,400 कोटी रुपयांच्या भांडवली सहाय्याला केंद्र सरकारची मान्यता
September 29th, 04:18 pm
निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उपायांची मालिका हाती घेतली आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारने निर्यात पत हमी महामंडळ मर्यादित मध्ये ( याआधी भारतीय निर्यात पत हमी महामंडळ ओळखले जाणारे) पाच वर्षात म्हणजेच वित्तीय वर्ष 2021-2022 ते वित्तीय वर्ष 2025- 2026 या काळात 4,400 कोटी रुपयांचे भांडवल ओतण्याला मंजुरी दिली आहे.लडाख या केंद्रशासित प्रदेशातील एकिकृत बहुउद्देशीय महामंडळाच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
July 22nd, 04:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इंटिग्रेटेड मल्टीपर्पज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉर युनियन टेरिटरी ऑफ लडाखच्या निर्मितीला मान्यता दिली आहे.वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, (सीएसआयआर) बैठकीतील पंतप्रधानांचे संबोधन
June 04th, 10:28 am
कोणत्याही देशातील विज्ञान, तंत्रज्ञान तितकीच प्रगती करु शकतं, जितका त्याचा उत्तम संबंध तिथल्या उद्योग, बाजाराशी असतो, समन्वय असतो, परस्परांशी जोडलेली अंतर्गत व्यवस्था असते. आपल्या देशात CSIR , विज्ञान, समाज आणि उद्योगाची हीच व्यवस्था कायम राखण्यासाठी एक संस्थात्मक व्यवस्था म्हणून काम करत आहे. आपल्या या संस्थेने देशाला कितीतरी प्रतिभावान दिले आहेत. कितीतरी वैज्ञानिक दिले आहेत. शांतीस्वरूप भटनागर यांच्यासारख्या महान वैज्ञानिकांनी या संस्थेचं नेतृत्व केलं आहे. जेव्हाही मी इथे आलो, आणि याचसाठी , प्रत्येकवेळी यावर भर दिला की जेव्हा एखादया संस्थेचा वारसा इतका महान असेल तेव्हा भविष्याकरता त्यांची जबाबदारीही तितकीच वाढते. आजही माझ्या, देशाच्या, अगदी मानवजातीच्याही आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. वैज्ञानिकांकडून, तंत्रज्ञांकडून खूप अपेक्षा आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची बैठक
June 04th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची बैठक दूरसंवाद पद्धतीने पार पडली.डॉ. हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओडिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 09th, 12:18 pm
कार्यक्रमाला माझ्याबरोबर उपस्थित असलेले लोकसभेतले केवळ खासदारच नाही तर संसदीय जीवनामध्ये एक उत्तम खासदार कशा पद्धतीने काम करू शकतो, याचे आदर्श उदाहरण ज्यांना म्हणता येईल असे भाई भर्तृहरी महताब जी, धर्मेंद्र प्रधान जी, इतर वरिष्ठ मान्यवर, देवी आणि सज्जन हो! मला ‘ उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब यांच्याशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळतेय, हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी आम्ही सर्वांनी ‘उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब जी यांची 120 वी जयंती आम्ही अतिशय प्रेरणादायी संधी म्हणून साजरी केली होती. आज आपण त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘ओडिशा इतिहास’ याची हिंदी आवृत्ती लोकार्पण करीत आहोत. ओडिशाचा व्यापक आणि विविधतेने नटलेला इतिहास देशातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे काम करणे खूप आवश्यक आहे.ऊडिया आणि इंग्रजी यांच्यानंतर आता हिंदी आवृत्तीच्या माध्यमातून आपण ही आवश्यकता पूर्ण केली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयत्नासाठी भाई भर्तृहरी महताब यांना, हरेकृष्ण महताब प्रतिष्ठानला आणि विशेषत्वाने शंकरलाल पुरोहित यांना त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.डॉ. हरेकृष्ण महताब यांच्या ‘ओदिशा इतिहास’ च्या हिंदी आवृत्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
April 09th, 12:17 pm
‘उत्कल केसरी’ डॉ हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओदिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाशन केले. ओडिया आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध असलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद शंकरलाल पुरोहित यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि कटक लोकसभा मतदारसंघाचे खासदार भर्तृहरी महताब यावेळी उपस्थित होते.PM Modi requests spiritual leaders to promote Aatmanirbhar Bharat by going vocal for local
November 16th, 12:46 pm
PM Modi unveiled ‘Statue of Peace’ to mark the 151st birth anniversary celebrations of Jainacharya Shree Vijay Vallabh Surishwer Ji Maharaj. Reiterating his stress on ‘vocal for local’ Shri Modi requested that as happened during the freedom struggle, all the spiritual leaders should amplify the message of Aatmanirbhar Bharat.जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ चे अनावरण
November 16th, 12:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंती उत्सवानिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण करण्यात आले. जैन आचार्यांच्या सन्मानार्थ अनावरण करण्यात आलेल्या पुतळ्याला ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ असे नाव देण्यात आले आहे. 151 इंच उंचीचा पुतळा अष्टधातूपासून तयार करण्यात आला आहे, यात तांब्याचे प्रमाण जास्त आहे आणि विजय वल्लभ साधना केंद्र, जेतापूर, पाली, राजस्थान येथे उभारण्यात आला आहे.Balasaheb Vikhe Patil Ji's work for the progress of poor, efforts towards education in Maharashtra will inspire generations to come: PM
October 13th, 11:01 am
PM Narendra Modi released the biography of late Dr. Balasaheb Vikhe Patil. Speaking on the occasion, PM Modi said, Balasaheb’s work for the progress of poor, efforts towards education and success of cooperative in Maharashtra will inspire generations to come.PM releases the autobiography of Dr. Balasaheb Vikhe Patil titled ‘Deh Vechwa Karani’
October 13th, 11:00 am
PM Narendra Modi released the biography of late Dr. Balasaheb Vikhe Patil. Speaking on the occasion, PM Modi said, Balasaheb’s work for the progress of poor, efforts towards education and success of cooperative in Maharashtra will inspire generations to come.