आर्थिक वर्ष 2026-27 ते आर्थिक वर्ष 2030-31 या कालावधीसाठीच्या 'लघु जलविद्युत (एसएचपी) विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 18th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, सुमारे 1500 मेगावॅट क्षमतेचे लघु जलविद्युत (एसएचपी) प्रकल्प उभारण्यासाठी, 2584.60 कोटी रुपये खर्चासह आर्थिक वर्ष 2026-27 ते आर्थिक वर्ष 2030-31 या कालावधीसाठीच्या लघु जलविद्युत (एसएचपी) विकास योजनेला मंजुरी दिली.