उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
November 03rd, 11:00 am
आजचा कार्यक्रम विज्ञानाशी संबंधित आहे, मात्र मी आधी भारताच्या क्रिकेटमधील दिमाखदार विजयाबद्दल बोलेन. आपल्या क्रिकेट संघाच्या यशाने संपूर्ण भारत आनंदित आहे. हा भारताचा पहिला महिला विश्वचषक आहे. मी आपल्या महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या यशामुळे देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा मिळेल.पंतप्रधानांनी उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष 2025 बैठकीला केले संबोधित
November 03rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष 2025 (ईएसटीआयसी) बैठकीला संबोधित केले.याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी देश-परदेशातील विज्ञानिक, नवोन्मेषकर्ते, शिक्षण क्षेत्राचे सदस्य तसेच इतर सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत केले. आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल बोलताना, भारतीय क्रिकेट संघाच्या या यशामुळे संपूर्ण देश आनंदित झाला आहे हे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. भारताने मिळवलेला हा पहिलाच महिला क्रिकेट विश्वचषक होता यावर अधिक भर देत त्यांनी महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. देशाला या क्रिकेटपटूंचा अभिमान आहे असे सांगत या खेळाडूंचे यश देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणाचा मजकूर
October 24th, 11:20 am
यंदाचा प्रकाशाचा उत्सव 'दिवाळी' तुमच्या सर्वांच्या जीवनात प्रकाशाची एक नवी तिरीप घेऊन आला आहे. सणासुदीच्या काळात कायमस्वरूपी नोकरीचे नियुक्तीपत्र मिळणे, म्हणजेच, उत्सवाचा उत्साह आणि यशाचा दुहेरी आनंद! हाच आनंद आज देशातील 51 हजारहून अधिक तरुण-तरुणींना मिळाला आहे. मला जाणवतंय की, तुम्हा सर्वांचे कुटुंबिय देखील किती आनंदले असतील. मी तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन करतो. जीवनाच्या या नवीन प्रारंभासाठी मी तुम्हाला अनेक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याला केले संबोधित
October 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावर्षीच्या दिव्यांच्या सणाने अर्थात दिवाळीने प्रत्येकाचे आयुष्य नव्याने उजळून टाकले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सण साजरे करत असताना कायमस्वरूपी नोकरीची नियुक्ती पत्रे हातात येणे म्हणजे सणांचा उत्साह आणि रोजगार मिळाल्याचे यश असा द्विगुणित आनंद होय. हा आनंद आज देशभरातील 51,000 युवकांपर्यंत पोहोचला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे सर्वांच्या कुटुंबियांना अमाप आनंद मिळाल्याचे सांगून त्यांनी सर्व उमेदवारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. त्यांच्या आयुष्यातील नवीन आरंभाबद्दल त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.मुंबईत येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 09th, 02:51 pm
माननीय पंतप्रधान कीर स्टार्मर, आरबीआयचे गव्हर्नर, फिनटेक विश्वातील नवप्रवर्तक, नेतेमंडळी, उद्योग जगतातील दिग्गज आणि गुंतवणूकदार, भगिनी आणि बंधूंनो! मुंबईत आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले
October 09th, 02:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत पंतप्रधान मोदी यांनी उर्जावान शहर, उद्योगांचे शहर आणि अमर्याद शक्यतांचे शहर अशा शब्दांत मुंबईचे वर्णन केले. त्यांनी त्यांचे मित्र पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे खास स्वागत केले आणि ग्लोबल फिनटेक महोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी वेळ काढल्याबद्दल विशेष उल्लेख केला.दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 04th, 10:45 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 62,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या युवा केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ करताना, कौशल दीक्षांत समारोह कार्यक्रमाला केले संबोधित
October 04th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कौशल्य दीक्षांत समारोहादरम्यान 62,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिकणारे लाखो विद्यार्थी, तसेच बिहारमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची नवी परंपरा सुरू केली होती. आजचा दिवस त्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.मध्य प्रदेशातील धार येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 17th, 11:20 am
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव जी, केंद्रातील माझ्या सहकारी सावित्री ठाकुर जी, देशातील कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व केंद्रीय मंत्री, राज्यांचे राज्यपाल, राज्यांचे मुख्यमंत्री, मंचावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि देशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले
September 17th, 11:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधान धार भोजशाळेची पूज्य माता, ज्ञानदेवता, वाग्देवीच्या चरणी नतमस्तक झाले. आज कौशल्य आणि निर्मितीचे दैवत, भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे, असे सांगून मोदी यांनी भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले. आपली कारागिरी आणि समर्पणातून राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देणाऱ्या कोट्यवधी बंधू-भगिनींप्रति त्यांनी आदर व्यक्त केला.दिल्लीमध्ये यशोभूमी इथे सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 02nd, 10:40 am
केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी,ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी जी, केंद्रीय राज्य मंत्री जितिन प्रसाद जी, सेमीचे अध्यक्ष अजित मनोचा जी,देश-विदेशातून आलेले सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सहकारी,विविध देशांतले इथे उपस्थित आमचे अतिथी, स्टार्ट अपशी संबंधित उद्योजक,विविध भागांमधून आलेले माझे युवा विद्यार्थी मित्र, उपस्थित स्त्री-पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सेमिकॉन इंडिया 2025 चे उद्घाटन
September 02nd, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी येथे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित 'सेमिकॉन इंडिया - 2025' चे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतातील आणि परदेशातील सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीची दखल घेतली. त्यांनी विविध देशांमधील प्रतिष्ठित पाहुणे, स्टार्ट-अपशी संबंधित उद्योजक आणि देशातील विविध राज्यांमधून आलेल्या युवा विद्यार्थ्यांचे स्वागत केले.गुजरातमधील हंसलपूर येथे पर्यावरणपूरक वाहतूक उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
August 26th, 11:00 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, भारतातील जपानचे राजदूत केइची ओनो सान, सुजुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुजुकी सान, मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हिसाशी ताकेउची सान, अध्यक्ष आर. सी. भार्गव, हंसलपूर प्रकल्पातील सर्व कर्मचारी आणि उपस्थित मान्यवर.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन
August 26th, 10:30 am
हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने मोठी प्रगती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात भारताच्या 'मेक इन इंडिया' प्रवासात एक नवीन अध्याय जोडला जात आहे. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या सामायिक ध्येयाच्या दिशेने ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे असे ते म्हणाले. आजपासून भारतात उत्पादित होणारी इलेक्ट्रिक वाहने 100 देशांमध्ये निर्यात केली जाणार आहेत यावर मोदी यांनी भर दिला. देशात हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादन सुरू झाल्याची घोषणा त्यांनी केली. आजचा दिवस भारत आणि जपानमधील मैत्रीला एक नवीन आयाम जोडत आहे यावर भर देत, पंतप्रधानांनी भारतातील सर्व नागरिकांचे , जपानचे आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे मनापासून अभिनंदन केले.अहमदाबाद येथील कन्या वसतिगृह - सरदारधाम दुस-या टप्प्याच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 24th, 10:39 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, गुजरात सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार, सरदारधामचे प्रमुख गगजी भाई, विश्वस्त व्ही. के. पटेल, आणि इतर सर्व मान्यवर, आणि माझ्या प्रिय बंधून भगिनींनो, विशेषत्वाने प्रिय कन्या !!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबादच्या सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह येथील भूमिपूजन सोहळ्यातील भाषण
August 24th, 10:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह भूमिपूजन सोहळ्यास व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. उपस्थितांना उद्देशून बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सरदारधाम हे नाव जितके पवित्र आहे तितकेच त्याचे कार्यही पवित्र आहे. मुलींच्या शिक्षण व सेवेसाठी समर्पित अशा या वसतिगृहाच्या उद्घाटनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या वसतिगृहात राहणाऱ्या मुली आपल्या सोबत स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन येतील व त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर संधी येथे उपलब्ध होतील. या मुली आत्मनिर्भर आणि सक्षम झाल्यानंतर स्वाभाविकपणे राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतील तसेच त्यांचे कुटुंबही सक्षम होईल, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी या वसतिगृहात प्रवेश मिळविणाऱ्या सर्व मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.Our government is working with full strength to transform the lives of farmers: PM Modi in Varanasi
August 02nd, 11:30 am
In his address while launching multiple development works in Varanasi, PM Modi said that this was his first visit to the holy city following Operation Sindoor. He asserted that during Operation Sindoor, the world witnessed the Rudra form of India. The PM announced that ₹21,000 crore had been transferred to the bank accounts of 10 crore farmers across the country under the PM-Kisan Samman Nidhi scheme.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन
August 02nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर वाराणसीतील कुटुंबांना भेटल्याबद्दल मनस्वी भावना व्यक्त केल्या. वाराणसीतील लोकांशी असलेल्या त्यांच्या घट्ट भावनिक संबंधावर भर देत, मोदींनी शहरातील आपल्या प्रत्येक कौटुंबिक सदस्याविषयी आदरपूर्वक सद्भावना व्यक्त केली. मोदींनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
July 24th, 04:20 pm
सर्वप्रथम, मी पंतप्रधान स्टार्मर यांचे त्यांच्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मनापासून आभार मानू इच्छितो. आजचा दिवस दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आज दोन्ही देशांमध्ये व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झाला आहे याचा मला आनंद आहे.कौशल्य भारत अभियानाच्या माध्यमातून कुशल आणि आत्मनिर्भर युवा शक्ती घडवण्यासाठी केंद्र सरकारची दृढ वचनबद्धता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केली व्यक्त
July 15th, 09:14 pm
कौशल्य भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या अभियानाच्या माध्यमातून कुशल आणि आत्मनिर्भर युवा शक्ती घडवण्यासाठी केंद्र सरकारची दृढ वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. कौशल्य भारत अभियान हा एक परिवर्तनकारी उपक्रम असून, हा उपक्रम देशभरातील लाखो लोकांना सक्षम करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.