हैदराबाद इथल्या सिंधू रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
May 10th, 07:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबादमध्ये 'सिंधू रुग्णालयाचे' उद्घाटन केले. हे रुग्णालय, हैदराबाद शहर आणि आसपासच्या परिसरातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने उचललेले एक कौतुकास्पद पाऊल आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसेच, रुग्णालयाच्या व्यवस्थापन व वैद्यकीय चमूने उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतींच्या वापराला दिलेल्या विशेष प्राधान्याचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.