This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi

March 23rd, 08:30 pm

PM Modi addressed the TV9 Summit and emphasized that India's economy is progressing rapidly, leaving behind the pre-2014 conditions. He affirmed that India stands with its own interests, with peace and with dialogue and gave a detailed account of the country's development momentum over the last 23 days. Asserting that national interest must be placed above party interest, the PM drew inspiration from icons who always placed the nation above self.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्क शिखर परिषदेला केले संबोधित

March 23rd, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि जग' या विषयावरील टीव्ही9 शिखर परिषदेला संबोधित केले. जगातील अभूतपूर्व आणि गंभीर परिस्थितीची दखल घेत, पंतप्रधानांनी एका अत्यंत कठीण प्रसंगी विचारांच्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल टीव्ही9 नेटवर्कचे कौतुक केले.

आसाममधील सिलचर इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 14th, 11:10 am

आसाम राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल , इथे उपस्थित असलेले राज्य सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील सिल्चर येथे 23,550 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

March 14th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील सिल्चर येथे अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संस्कृती आणि चैतन्यशीलता अशी खास ओळख असलेल्या बराक खोऱ्याला भेट देणे हा माझ्यासाठी नेहमीच विशेष अनुभव असतो. इतिहास आणि भाषांच्या मिलाफामुळे अद्वितीय प्रादेशिक ओळख निर्माण करणाऱ्या या खोऱ्याचे सिल्चर हे प्रवेशद्वार म्हणून काम करते,असे मोदी यांनी नमूद केले. या प्रदेशाची ताकद त्याच्या विविधतेत आहे, बंगाली, आसामी आणि आदिवासी परंपरा इथे एकोप्याने बहरतात. बराक खोऱ्याची विविधता ही त्याची सर्वात मोठी संपत्ती असून ती येथील नागरिकांमध्ये बंधुत्वाच्या भावनेस चालना देते, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान 13-14 मार्च रोजी आसामला भेट देणार

March 12th, 05:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13-14 मार्च 2026 रोजी आसामच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान कोक्राझार, गुवाहाटी आणि सिलचर इथे 47,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी, भूमीपूजन आणि लोकार्पण करतील.

सिलचर आणि आजूबाजूच्या परिसरात विकसित ‘जीवन सुलभता’ वाढवणाऱ्या विकासकामांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

April 03rd, 09:55 am

एका ट्विट शृंखलेच्या माध्यमातून खासदार डॉ. राजदीप रॉय यांनी सिलचरच्या विकास यात्रेबद्दल माहिती दिली. शिक्षण, स्वच्छता, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, पर्यावरण, वाहतूक, परवडणाऱ्या दरातील घरांची उपलब्धता, सुरक्षितता आणि सार्वजनिक सेवा असो, या प्रदेशाच्या आर्थिक क्षमतेसोबत जीवनमान सुधारले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय कर्मचारी आरोग्य सेवा केंद्र (सीजीएचएस), प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (पीएमजीएसवाय), प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पीएमएवाय -जी) आणि अन्य विकासात्मक उपक्रमांबद्दल माहिती देत, हे उपक्रम सिलचर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे जीवन सुसह्य करत आहेत, असे ते म्हणाले.