हूल दिवसानिमित्त पंतप्रधानांनी शूरवीरांना वाहिली श्रद्धांजली

June 30th, 06:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हूल दिवसानिमित्त, परकीयांच्या जुलमी राजवटीविरुद्ध खंबीरपणे लढा देणाऱ्या, सिदो-कान्हू, चांद-भैरव आणि फूलो-झानो यासारख्या आदिवासी वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. आदिवासी समुदायाची प्रतिष्ठा आणि सन्मान याच्या संरक्षणासाठी, त्यांचा संघर्ष आणि बलिदान कायमच देशवासीयांच्या हृदयात ऊर्जा आणि अभिमानाची भावना निर्माण करणारा असेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.