एमएसएमई वृद्धी आणि उत्पादन विस्तारासाठी जीएसटी सुधारणा उत्प्रेरक ठरणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
September 04th, 08:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार निर्मिती, नवोन्मेष आणि आर्थिक विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सक्षम करण्याबाबत सरकारची दृढ वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. गेल्या काही वर्षांत सरकारने कर्ज उपलब्धता सुलभ करण्यासाठी, बाजारपेठेतील संधी वाढविण्यासाठी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवरील कामकाजाचा भार कमी करण्यासाठी अनेक सुधारणा सुरू केल्या आहेत. #NextGenGST उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या वस्तू आणि सेवा कर सुधारणा या प्रवासात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.