पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार
November 27th, 12:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमाराला पंतप्रधान कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार आहेत. त्यांनतर ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दुपारी सव्वा तीनच्या सुमारास येथे भेट देणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.Amazing, incomparable and unimaginable! Many congratulations to the people of Ayodhya for the grand and divine Deepotsav:PM
October 30th, 10:45 pm
Prime Minister Shri Narendra Modi has extended warm congratulations and heartfelt wishes to the people of Ayodhya and the entire nation on the occasion of the grand and pine Deepotsav celebrations.श्री रामजन्मभूमी मंदिरात झालेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राष्ट्रपतींनी लिहिलेल्या पत्राला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले उत्तर
January 23rd, 06:54 pm
श्री राम जन्मभूमी मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लिहिलेल्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे.अरिचल मुनई या राम सेतूच्या प्रारंभ स्थानाला पंतप्रधानांनी दिली भेट
January 21st, 03:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम सेतूचा प्रारंभ असलेल्या अरिचल मुनईला भेट दिली.अयोध्या दीपोत्सवाच्या ऊर्जेपुढे पंतप्रधान नतमस्तक
November 12th, 08:14 pm
अयोध्या दीपोत्सवाची ऊर्जा देशात नवीन चैतन्य निर्माण करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. प्रभू श्रीराम सर्व देशवासीयांना आशीर्वाद देतील आणि सर्वांसाठी प्रेरणास्थान बनतील अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.