आसाममधील सिलचर इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 14th, 11:10 am

आसाम राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल , इथे उपस्थित असलेले राज्य सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील सिल्चर येथे 23,550 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

March 14th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील सिल्चर येथे अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संस्कृती आणि चैतन्यशीलता अशी खास ओळख असलेल्या बराक खोऱ्याला भेट देणे हा माझ्यासाठी नेहमीच विशेष अनुभव असतो. इतिहास आणि भाषांच्या मिलाफामुळे अद्वितीय प्रादेशिक ओळख निर्माण करणाऱ्या या खोऱ्याचे सिल्चर हे प्रवेशद्वार म्हणून काम करते,असे मोदी यांनी नमूद केले. या प्रदेशाची ताकद त्याच्या विविधतेत आहे, बंगाली, आसामी आणि आदिवासी परंपरा इथे एकोप्याने बहरतात. बराक खोऱ्याची विविधता ही त्याची सर्वात मोठी संपत्ती असून ती येथील नागरिकांमध्ये बंधुत्वाच्या भावनेस चालना देते, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

आसाममधल्या गुवाहाटी इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

March 13th, 05:30 pm

आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, राज्य सरकारचा उपस्थित मंत्री वर्ग, लोकप्रतिनिधी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी देशभरातून जोडले गेलेले आपले सर्व अन्नदाता,चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या माझ्या बंधू-भगिनी, आणि मी पाहत आहे आपले अनेक ज्येष्ठ मुख्यमंत्री देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेले आहेत, सर्वाना माझा नमस्कार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुवाहाटीत ₹19,480 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, देशभरातील शेतकऱ्यांना ₹18,000 कोटींचा पीएम किसान सन्मान निधी वितरित

March 13th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे सुमारे 19,480 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. गुवाहाटीतील भव्य सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुवाहाटीवासीयांबरोबर देशभरातून सहभागी शेतकऱ्यांचे तसेच चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या बंधू आणि भगिनीनांही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला ‘माँ कामाख्या’च्या पवित्र भूमीवर उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “नवरात्रीचा आरंभ होण्यापूर्वी माँ कामाख्येच्या या पवित्र भूमीवर तुमचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले आहे.”

सिक्कीमच्या राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

July 18th, 09:35 pm

सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

सिक्कीमच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

August 02nd, 04:41 pm

सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.