हस्तलिखितांच्या जतनासाठी आचार्य श्री कैलाससागरसूरी ज्ञानमंदिराच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

March 31st, 01:10 pm

हस्तलिखितांच्या जतनासाठी आचार्य श्री कैलाससागरसूरी ज्ञानमंदिर करत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. ''अशा प्रकारचे कार्य हिरीरीने करणारे आणि भावी पिढ्या आपल्या समृद्ध इतिहासाशी जोडलेल्या राहतील, याची सुनिश्चिती करणारे असे अनेक उत्साही समूह आपल्या देशात आहेत, याचा मला अभिमान वाटतो,'' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.