गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 03:35 pm
आज या पवित्र प्रसंगी मनामध्ये खोलवर शांतता भरली आहे. साधू-संतांच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर आपोआपच आध्यात्मिक अनुभव येत असतो. इथे विशाल संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांमुळे लक्षात येते की, या मठाची शतकांपासूनच प्राचीन जीवंत शक्ती आजही वृद्धिंगत होत आहे. आज या समारंभाला मला उपस्थित राहता आले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. इथे येण्यापूर्वी मला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. त्या शांत वातावरणाने या कार्यक्रमाच्या आध्यात्मिकतेला आणखी सखोलता प्राप्त झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
November 28th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.हरियाणातील गुरुग्राम येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उद्घाटन/ पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
March 11th, 01:30 pm
हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, कष्टाळू मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रातील माझे वरिष्ठ सहकारी नितीन गडकरी जी, राव इंद्रजीत सिंह, कृष्ण पाल गुर्जर जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत जी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी नायब सिंह सैनी जी, इतर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!पंतप्रधानांच्या हस्ते विविध राज्यांतील सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
March 11th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणातील गुरुग्राम येथे देशभरातील सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातून लाखो लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले.माँ कामाख्या कॉरिडॉर हा ऐतिहासिक उपक्रम ठरेल: पंतप्रधान
April 19th, 03:39 pm
काशी विश्वनाथ धाम आणि श्री महाकाल महालोक कॉरिडॉर प्रमाणे माँ कामाख्या कॉरिडॉर हा देखील ऐतिहासिक उपक्रम ठरेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.