The fact sheet on India's growth is a success story of the Reform-Perform-Transform mantra: PM Modi in Rajkot

January 11th, 02:45 pm

PM Modi inaugurated the Vibrant Gujarat Regional Conference for the Kutch and Saurashtra region in Rajkot. Recalling the devastating earthquake in Kutch and drought in Saurashtra, the PM said these regions are now emerging as major drivers of Aatmanirbhar Bharat and India’s rise as a global manufacturing hub. He highlighted the achievements India has made over the past 11 years.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये कच्छ आणि सौराष्ट्र विभागांसाठी व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे केले उद्घाटन

January 11th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या राजकोट येथे कच्छ आणि सौराष्ट्र क्षेत्रासाठी व्हायब्रंट गुजरात या प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, 2026 वर्षाच्या सुरुवातीनंतरचा त्यांचा हा गुजरातचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी अधोरेखित केले की, आज सकाळीच त्यांनी भगवान सोमनाथांचे दिव्य दर्शन घेतले आणि आता ते राजकोटमधील या भव्य कार्यक्रमात सहभागी होत आहेत. विकास भी, विरासत भी हा मंत्र सर्वत्र घुमत आहे, असे त्यांनी नमूद केले.

नवी दिल्लीत एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 17th, 11:09 pm

श्रीलंकेच्या पंतप्रधान महामहीम हरिणी अमरसूर्या महोदया, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, माझे मित्र टोनी ऍबट महोदय, यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक महोदय, मान्यवर अतिथी, स्त्री-पुरुषहो नमस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला केले संबोधित

October 17th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद उत्सवाच्या वातावरणात आयोजित केली जात आहे. त्यांनी सत्राची संकल्पना अजेय भारत ची प्रशंसा केली आणि ते खरोखरच समर्पक असल्याचे नमूद केले, कारण आज भारत थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. पंतप्रधान म्हणाले की भारत थांबणार नाही किंवा वेग कमीही करणार नाही, 140 कोटी भारतीय पूर्ण गतीने एकत्रितपणे पुढील वाटचाल करत आहेत.

ओडिशातील झारसुगुडा येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

September 27th, 11:45 am

येथे काही तरुण बांधव अनेक कलाकृती घेऊन आलेले आहेत. ओडिशातील कला प्रेम जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. आपण दिलेली ही भेट मी आदरपूर्वक स्वीकारतो. माझे एसपीजी सहकारी या सर्व कलाकृती आपल्याकडून गोळा करतील. जर तुम्ही मागे तुमचे नाव व पत्ता लिहून दिलात, तर माझ्याकडून तुम्हाला पत्र अवश्य मिळेल. मागे एक लहान मूलही कलाकृती घेऊन उभे आहे, त्याचे हात दुखत असतील, कृपया त्याचीही मदत करा आणि वस्तू गोळा करून घ्या. मी या स्नेहपूर्ण भेटीसाठी आणि या कलाकृती भेट देणाऱ्या सर्व युवक-युवती व बालकांचे मनःपूर्वक आभार मानतो.

ओदिशात झारसुगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी

September 27th, 11:30 am

सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओदिशातील जनतेने त्यावेळी विकसित ओदिशा या ध्येयाने पुढे जाण्याचा दृढ संकल्प केला होता. आज केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ओदिशा वेगाने प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले. पंतप्रधानांनी ओदिशा तसेच देशाच्या विकासासाठी हजारो कोटींच्या विविध प्रकल्पांची सुरुवात झाल्याची घोषणा केली. या प्रसंगी त्यांनी बीएसएनएलच्या स्वदेशी 4G सेवांचा शुभारंभ करत बीएसएनएलचा नवा अवतार जनतेसमोर सादर केला. याशिवाय, देशभरातील आयआयटी संस्थांच्या विस्तारालाही आज औपचारिक सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. ओदिशामध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि संपर्क सुविधा यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. बेरहमपूर ते सुरत या मार्गावर धावणाऱ्या आधुनिक अमृत भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी जनतेसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात मधील सुरत येथून दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. या सर्व विकास उपक्रमांबद्दल ओदिशातील जनतेचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

जपानच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना निवेदन

August 29th, 03:59 pm

आज आम्ही आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीत एका नवीन आणि सोनेरी अध्यायाचा मजबूत पाया रचला आहे. आम्ही आगामी दशकासाठी एक रूपरेषा आखली आहे. आमच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी गुंतवणूक, नवोन्मेष, आर्थिक सुरक्षा, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, गतिशीलता, लोकांमधील आदानप्रदान आणि राज्य-प्रादेशिक भागीदारी या प्रमुख बाबी आहेत. आम्ही आगामी दहा वर्षांमध्ये जपानमधून भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारत आणि जपानमधील लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांना जोडण्यावर विशेष भर दिला जाईल.

आयएनएस सुरत,आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचा नौदलात समावेश करण्याप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

January 15th, 11:08 am

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहकारी राजनाथ सिंह जी, संजय सेठ जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्यासमवेत आज दोन्ही उपमुख्यमंत्रीही आहेत,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी, सीडीएस,सीएनएस, नौदलाचे सर्व सहकारी, माझगाव गोदी मध्ये काम करणारे सर्व सहकारी, इतर अतिथी वर्ग,महिला आणि पुरुष वर्ग,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर या प्रमुख युद्धनौकांचे (एक लढाऊ जहाज, एक विनाशिका आणि एक पाणबुडी) राष्ट्रार्पण

January 15th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या तीन आघाडीच्या युद्धनौका, आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगून पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या शूर वीरांना अभिवादन केले.त्यांनी सर्व शूर सैनिकांचे अभिनंदन केले.