पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील मियागी या राज्यातील सेंडाय येथील सेमीकंडक्टर प्रकल्पाला दिली भेट
August 30th, 11:52 am
भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान माननीय श्री. शिगेरू इशिबा यांच्यासह आज मियागी राज्यामधील सेंडाय चा दौरा केला. सेंडायमध्ये दोन्ही नेत्यांनी टोकियो इलेक्ट्रॉन मियागी लिमिटेड (TEL Miyagi) या सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीच्या जपानी कंपनीला भेट दिली. TEL कंपनीची जागतिक सेमीकंडक्टर मूल्यसाखळीत असलेली भूमिका, तिची प्रगत उत्पादन क्षमता तसेच भारतासोबत सध्या सुरू असलेल्या आणि नियोजित सहकार्याबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देण्यात आली. या कारखान्याच्या भेटीद्वारे दोन्ही नेत्यांना सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, उत्पादन (फॅब्रिकेशन) आणि चाचणी( टेस्टिंग) या क्षेत्रांत भारत–जपान यांच्यातील सहकार्याच्या संधींचा प्रत्यक्ष आढावा घेता आला.जपानच्या प्रशासनिक राज्यपालांशी संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले मनोगत
August 30th, 08:00 am
या सभागृहात मला सैतामाची वेगवान धडपड जाणवते, मियागीचे जिद्दीपण जाणवते, फुकुओकाची चैतन्य आणि नाराच्या वारशाची सुगंधी झुळूक अनुभवायला मिळते. आपल्यामध्ये कुमामोतोची आत्मीयता आहे, नागानोची ताजेपणा आहे, शिझुओकाची रमणीयता आहे, आणि नागासाकीचे स्पंदन आहेत. आपण सर्व फुजी पर्वताच्या सामर्थ्याचे आणि साकुराच्या आत्म्याचे प्रतीक आहात. एकत्रितपणे आपण जपानला शाश्नत बनवत आहात.15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेतील संयुक्त निवेदन: आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी भागीदारी
August 29th, 07:06 pm
जपानचे पंतप्रधान महामहीम इशिबा शिगेरू यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला अधिकृत कार्य भेट दिली. 29 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत पंतप्रधान इशिबा यांनी पंतप्रधान कार्यालयात (कांटेई) केले, जिथे त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दोन्ही पंतप्रधानांनी शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा केली. यावेळी त्यांनी भारत आणि जपानमधील दीर्घकाळापासून कायम राहिलेल्या मैत्रीची आठवण केली, जी ऐतिहासिक संबंध, सामायिक मूल्ये आणि हितसंबंध, समान धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्परांबद्दलचा आदर यामध्ये रुजलेली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी गेल्या दशकात भारत-जपान भागीदारीने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे कौतुक केले आणि आगामी दशकात परस्पर सुरक्षितता आणि समृद्धी साधण्यासाठी धोरणात्मक आणि दूरगामी भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर रचनात्मक चर्चा केली.जपानच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना निवेदन
August 29th, 03:59 pm
आज आम्ही आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीत एका नवीन आणि सोनेरी अध्यायाचा मजबूत पाया रचला आहे. आम्ही आगामी दशकासाठी एक रूपरेषा आखली आहे. आमच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी गुंतवणूक, नवोन्मेष, आर्थिक सुरक्षा, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, गतिशीलता, लोकांमधील आदानप्रदान आणि राज्य-प्रादेशिक भागीदारी या प्रमुख बाबी आहेत. आम्ही आगामी दहा वर्षांमध्ये जपानमधून भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारत आणि जपानमधील लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांना जोडण्यावर विशेष भर दिला जाईल.भारत -जपान आर्थिक मंचाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 29th, 11:20 am
मी तुमच्यापैकी अनेकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. गुजरातमधील माझ्या मुख्यमंत्री काळात तसेच दिल्लीला आल्यानंतरच्या काळात भेटलो आहे. तुमच्यापैकी अनेकांशी माझे निकटचे संबंध आहेत. आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे.भारत-जपान आर्थिक मंचाच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी
August 29th, 11:02 am
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या यशावर, विशेषत: गुंतवणूक, वस्तुनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर प्रकाश टाकला. जपानी कंपन्यांना भारतात आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आमंत्रित करताना, त्यांनी नमूद केले की, भारताच्या विकासगाथेने त्यांच्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्याच्या अशांत जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विश्वासू मित्रांमधील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे अधिक प्रासंगिक असल्याचे ते म्हणाले. राजकीय स्थैर्य, धोरणात्मक अंदाज, सुधारणांप्रति बांधिलकी आणि व्यवसाय सुलभतेच्या प्रयत्नांमुळे भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला असून, जागतिक संस्थांनी भारताच्या पतमानांकनात नुकत्याच केलेल्या सुधारणेत ते योग्यरित्या प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान मोदींचे जपानमध्ये टोकियो येथे आगमन
August 29th, 06:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच जपानमध्ये दाखल झाले. जपानमध्ये पंतप्रधान 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा आढावा घेतील आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.जपान आणि चीन दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन
August 28th, 08:40 pm
पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून, मी 15 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे.पंतप्रधानांचा जपान आणि चीन दौरा
August 22nd, 06:15 pm
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अनुक्रमे 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला आणि 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनला भेट देणार आहेत. जपानमध्ये, पंतप्रधान 15 व्या वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होणार असून जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्याशी चर्चा करतील. चीनमध्ये पंतप्रधान तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -7 शिखर परिषदेत जपानच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
June 18th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या 51 व्या जी -7 शिखर परिषदेमध्ये जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याबरोबर विस्तृत चर्चा केली. विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी पुनरुच्चार केला.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
April 24th, 03:29 pm
जम्माू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात, अनेक निरपराध लोकांचा बळी गेला त्या घटनेनंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी जागतिक नेत्यांची रीघ लागली होती. साऱ्या जगातून मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच भारत दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून हुडकून काढेल असाही निर्धार व्यक्त केला.