संयुक्त निवेदन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासकीय कुवेत दौरा (डिसेंबर 21-22, 2024)
December 22nd, 07:46 pm
कुवेतचे महामहीम अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21-22 डिसेंबर 2024 दरम्यान कुवेतचा शासकीय दौरा केला. हा त्यांचा पहिला कुवेत दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2024 ला कुवेत मध्ये 26 व्या अरेबियन गल्फ करंडकाच्या उद्घाटन समारंभात अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांचे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले.