भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबूबक्र अहमद यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
February 16th, 08:16 pm
भारताचे ग्रँड मुफ्ती- शेख अबूबक्र अहमद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली. सामाजिक सौहार्द आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी आणि देशभरात शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी ग्रॅन्ड मुफ्ती करत असलेल्या कौतुकास्पद प्रयत्नांची पंतप्रधानांनी विशेष दखल घेतली.