पंतप्रधानांची सेशेल्सला अधिकृत भेट
June 28th, 08:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 27 ते 29 जून 2026 या कालावधीतील सेशेल्सच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग म्हणून, आज व्हिक्टोरिया, माहे येथील 'स्टेट हाऊस'मध्ये आयोजित बैठकीत पंतप्रधान आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्यात अधिकृत चर्चा झाली. या चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा समावेश होता. आरोग्य, शिक्षण, क्षमता बांधणी, डिजिटल परिवर्तन, शाश्वत विकास, सामाजिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, सागरी सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. तसेच, त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली; यामध्ये बेकायदेशीर मासेमारी, अमली पदार्थांची तस्करी आणि समुद्री चाचेगिरी यांसह हिंदी महासागर क्षेत्रातील आव्हाने या मुदद्यांचाही समावेश होता. भारताने जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत विविध प्रकल्प आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.पंतप्रधानांचा सेशेल्स दौरा : फलनिष्पत्तीची यादी
June 28th, 08:17 pm
सेशेल्स सरकारला एक जलदगती गस्ती नौका भेट म्हणून देणेसेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीतील पंतप्रधानांचे भाषण
June 28th, 05:00 pm
पंतप्रधान म्हणून मी हिंदी महासागर क्षेत्रातील ज्या देशाला 2015 मध्ये सर्वप्रथम भेट दिली होती, तो देश म्हणजे 'सेशेल्स' होता. माझी ती पहिली आफ्रिका भेटही होती. मी इथे आलो कारण माझा हा दृढ विश्वास होता की, हिंदी महासागराबाबतच्या भारताच्या दृष्टिकोनात सेशेल्सला एक अतिशय विशेष स्थान आहे. आज, एका दशकानंतर जेव्हा मी इथे पुन्हा आलो आहे, तेव्हा माझा हा विश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाला आहे.सेशेल्सच्या अध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
June 28th, 02:02 pm
त्यांच्याकडून गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या पुरस्काराने सन्मानित होणे हा माझ्यासाठी आणि 140 कोटी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या सन्मानाचा मी विनम्रतेने स्विकार करत असताना तो त्या सर्व देशांना समर्पित करत आहे जे हवामान बदलाच्या आव्हानाशी लढत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाला भावी पिढ्यांप्रति आपली जबाबदारी मानत आहेत.भारत-सेशल्स उच्च स्तरीय व्हर्च्युअल कार्यक्रम (8 एप्रिल 2021)
April 07th, 06:02 pm
सेशेल्स येथे विविध भारतीय प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल 2021 रोजी सेशल्सच्या राष्ट्रपतींसमवेत उच्च स्तरीय आभासी कार्यक्रमात सहभागी होतील.